म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 22:48 IST2025-09-16T22:42:35+5:302025-09-16T22:48:48+5:30
दीर्घकालीन SIP मध्ये चक्रवाढ व्याजाची शक्ती दिसून येते.

कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाच्या (Canara Robeco Mutual Fund) कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंडाने 22 वर्षे पूर्ण केली आहेत. या फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत मालामाल केले आहे.
सप्टेंबर 2003 मध्ये सुरू झाल्यापासून, कॅनरा रोबेको फ्लेक्सी कॅप फंडातील ₹10,000 प्रति महिन्याची गुंतवणूक (SIP) 29 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढून ₹1.79 कोटींवर पोहोचली आहे. या कालावधीतील एकूण गुंतवणूक रक्कम ₹26.4 लाख एवढी होती, जिने 15.04% चा XIRR प्रदान केला आहे.
जाणून घ्या सविस्तर - जर एखाद्याने या योजनेच्या सुरुवातीलाच ₹10,000 ची गुंतवणूक केली असती, तर ती रक्कम वाढून आज 29 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढून ₹3.37 लाख रुपयांवर पोहोचली असती. तर बेंचमार्क (BSE 500 TRI) मध्ये हीच गुंतवणूक केवळ ₹2.69 लाखपर्यंतच वाढली.
ही एक ओपन-एंडेड डायनॅमिक इक्विटी योजना अथवा स्कीम आहे, जी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूक करते. हिचा मुख्य उद्देश इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करून भांडवल वाढवणे हा आहे.
सामान्य परिस्थितीत, फंड आपल्या मालमत्तेच्या 65% ते 100% इक्विटीमध्ये, 0% ते 35% डेब्ट आणि मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये, तसेच 0% ते 10% REITs व InvITs मध्ये गुंतवणूक करतो. या योजनेचे व्यवस्थापन श्रीदत्त भंडवालदार (हेड इक्विटीज) आणि प्रणव गोखले (फंड मॅनेजर) करत आहेत.
दीर्घकालीन SIP मध्ये चक्रवाढ व्याजाची शक्ती दिसून येते. फ्लेक्सी-कॅप फंड बाजारातील अस्थिरता आणि क्षेत्र-विशिष्ट जोखिमांच्या अधीन असतात. तज्ज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्यायला हवा.
(टीप - येथे केवळ म्युच्युअल फंडाच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)