शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अमेरिकन बाजारातील 'वादळाचा' अब्जाधिशांच्या संपत्तीला तडाखा, मस्कपासून अदानी-अंबानींपर्यंत अनेकांना मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 5:03 PM

1 / 6
अमेरिकन शेअर बाजारात आलेल्या वादळाची किंमत जगभरातील अनेक अब्जाधीशांना मोजावी लागली आहे. या वादळामुळे जगातील टॉप 70 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांना सर्वाधिक किंमत मोजावी लागली असून भारतातील गौतम अदानी यांनाही याचा मोठा फटका बसला आहे.
2 / 6
कुणाला किती फटका बसला? - ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, इलॉन मस्क यांची संपत्ती 245 बिलियन डॉलर एवढी आहे. त्यांना 9.03 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या गौतम अदानी यांची संपत्ती 3.50 बिलियन डॉलरने घटून 142 बिलियन डॉलरवर आली आहे.
3 / 6
अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती 3.72 डॉलर्सनी कमी झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 137 बिलियन डॉलर्स एवढी आहे. ते जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.
4 / 6
कशी आहे मुकेश अंबानी यांची स्थिती - रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांची संपत्ती 1.77 बिलियन डॉलरने घटली आहे. तसेच ते 85.2 बिलियन डॉलरसह नव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.
5 / 6
असं आहे घसरणीचं कारण - अमेरिकेचा शेअर बाजार कोसळल्याने या अब्जाधिशांना फटका बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. खरे तर, फेड रिझर्व्हकडून व्याज दर वाढवण्यात आल्याने आणि भविष्यासंदर्भातही काही संकेत देण्यात आल्याने गुंतवणूकदारांत भीतीचे वातावरण आहे.
6 / 6
यामुळेच, काल इंडेक्स- डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज, एसअँडपी 500 आणि नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 2 टक्के अथवा त्याहून अधिक घसरण दिसून आली. शुक्रवारी भारतीय बाजारातही मोठी घसरण दिसून आली होती. यामुळे भारतातील अब्जाधिशांची संपत्ती घटली आहे.