शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

खूशखबर... रेल्वेमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी; IRCTC ची शेअर बाजारात एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 1:12 PM

1 / 6
नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय रेल्वेने देशवासियांना मोठी संधी उपलब्ध केली आहे. रेल्वेची सर्वात मोठी कंपनी आयआरसीटीसीने आजपासून आयपीओ सुरू केला आहे. कंपनी याद्वारे बाजारातून 645 कोटी रुपये जमा करणार आहे. यासाठी शेअरची किंमत 315 ते 320 रुपये ठेवण्यात आली आहे.
2 / 6
रेल्वेने जारी केलेल्या ड्राफ्टनुसार कंपनी 10 रुपयांच्या प्रारंभी किंमतीचे दोन कोटी 60 हजार शेअर बाजारात आणणार आहे. यापैकी निम्मे शेअर क्वालिफाईड इन्सि्टट्युशनल खरेदीदारांसाठी असणार आहेत. तर 15 टक्के शेअर्स नॉन-इन्स्टिट्यूश्नल इन्वेस्टर कैटेगरी ( HNI ) साठी असणार आहेत. उरलेले 35 टक्के शेअर हे रिटेलसाठी असणार आहेत.
3 / 6
तीन दिवसांसाठी रेल्वेचा हा आयपीओ उघडणार असून 14 ऑक्टोबरला शेअर बाजारात लिस्टिंग करण्यात येणार आहे. या आयपीओची प्रमुख प्रतिनिधी आईडीबीआई कॅपिटल मार्केट अँड सिक्योरिटीज, एसबीआय कॅपिटल मार्केट आणि येस सिक्युरिटीज असणार आहेत.
4 / 6
कमीतकमी बोली 40 इक्वीटी शेअरसाठी लावण्यात येणार आहे. यानंतरच्या प्रत्येक खेपेसही 40 च्या पटींमध्येच शेअर खरेदी करता येणार आहेत. कंपनीने काही गुंतवणूकदार आणि पात्र कर्मचाऱ्यांना आधार मुल्यावर 10 रुपयांची सूट दिली आहे.
5 / 6
आयआरसीटीसीचा 2018-19 मध्ये निव्वळ फायदा 272.60 कोटी रुपयांचा असून 1956.66 कोटींचा महसूल मिळतो. या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. कंपनीची शेअर संपत्ती 160 कोटी रुपये आणि नेटवर्थ 1042.84 कोटी रुपये आहे.
6 / 6
सध्या या कंपनीमध्ये रेल्वेचा संपूर्ण वाटा आहे. आयपीओ आल्यावर ही मालकी कमी होणार आहे.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीshare marketशेअर बाजारIndian Railwayभारतीय रेल्वे