तुम्ही आयकराच्या कक्षेत येत नसलात तरी भरा रिटर्न, लगेच मिळेल कर्ज अन् व्हिसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 12:09 IST2023-04-07T11:58:54+5:302023-04-07T12:09:18+5:30
ITR filing : ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही ते देखील आयटीआर फाइल करू शकतात.

नवी दिल्ली : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न (ITR filing) भरण्याची अंतिम तारीख (ITR Filing Last date) 31 जुलै 2023 आहे. भारतात फार कमी लोक आयकराच्या कक्षेत येतात. त्यामुळेच येथे आयटीआर रिटर्न भरणाऱ्यांची संख्या कमी आहे. ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न कराच्या कक्षेत येत नाही ते देखील आयटीआर फाइल करू शकतात. आरटीआय भरण्यात कोणतेही नुकसान होता नाही.
आयटीआर फाइल करण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु, त्यांविषयी माहिती नसल्याने लोक हे फायदेशीर काम करत नाहीत. त्यामुळे, तुमचे उत्पन्न जरी आयकर भरण्याच्या कक्षेत येत नसले तरी, तरीही तुम्ही आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. यामुळे कर्ज मिळणे सोपे होते आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करणे देखील सोपे होते. कोणत्याही देशाचा व्हिसा घेताना किंवा मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवताना आयटीआर खूप उपयुक्त आहे.
लगेच मिळेल कर्ज
आयटीआर हा तुमच्या उत्पन्नाचा पुरावा आहे. सर्व सरकारी आणि खाजगी संस्था ते उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वीकारतात. जर तुम्ही आयटीआर भरत असाल आणि भविष्यात तुम्ही कार लोन किंवा होम लोनसह कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुम्हाला जलद कर्ज मिळेल.
TDS रिफंडसाठी आवश्यक
तुमचे उत्पन्न आयकराच्या कक्षेत येत नसले तरी काही कारणास्तव टीडीएस कापला जातो. अशा परिस्थितीत, जेव्हा तुम्ही RTR दाखल करता तेव्हाच तुम्हाला रिफंड मिळेल. आयटीआर फाइल केल्यानंतरच तुम्ही कर भरण्यास जबाबदार आहात की नाही याचे आयकर विभाग मूल्यांकन करते.
व्हिसासाठी होऊ शकते मदत
तुम्ही दुसऱ्या देशात जात असाल, तर तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता, तेव्हा तुम्हाला आयकर रिटर्नसाठी विचारले जाऊ शकते. अनेक देश व्हिसा देताना लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरावा विचारतात. आयटीआर रिसिप्ट तुमच्या उत्पन्नाचा भक्कम पुरावा आहेत. आयटीआर इतर देशातील अधिकाऱ्यांना आश्वासन देते की, तुम्ही तुमच्या प्रवासाचा खर्च भागवण्यास सक्षम आहात.
विमा कव्हर करण्यासाठी गरजेचे
आता विमा कंपन्यांनीही मोठ्या मुदतीच्या योजना घेणाऱ्यांकडून आयटीआर रिसिप्ट मागायला सुरुवात केली आहे. किंबहुना, विमाधारकाच्या उत्पन्नाचा स्रोत जाणून घेण्यासाठी आणि त्याची नियमितता तपासण्यासाठी ते फक्त आयटीआरवर अवलंबून असतात.
लॉस सेट ऑफ करण्यात मदत होईल
शेअर्स किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठीही आयटीआर खूप उपयुक्त आहे. यामध्ये नुकसान झाल्यास, अशा स्थितीत तोटा पुढील वर्षासाठी पुढे नेणे आणि आयकर रिर्टन भरणे आवश्यक आहे. पुढील वर्षात भांडवली नफा झाल्यावर तोटा नफ्याशी समायोजित केला जाईल आणि तुम्हाला कर सूटचा लाभ मिळेल.