नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
आयुष्मान भारत हेल्थ कार्ड आता गुगलवर सुद्धा मिळणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 16:01 IST
1 / 6देशातील जनतेला आरोग्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) लागू करण्यात आली आहे. या योजनेबाबत आता एक मोठे अपडेट समोर आली आहे. 2 / 6जेणेकरून लोकांना या योजनेचा लाभ घेताना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांचे काम सोपे व्हावे म्हणून आता गुगलच्या सहकार्याने एक प्रणाली विकसित केली जात आहे, ज्यामुळे लोकांना गुगलवरच आयुष्मान भारत हेल्थ कार्ड मिळू शकेल.3 / 6आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांना हेल्थ कार्ड तयार करावे लागते. लवकरच हे हेल्थ कार्ड गुगल वॉलेटवर उपलब्ध होणार असून यामुळे सर्वसामान्यांना अनेक फायदे मिळण्यची शक्यता आहे.4 / 6गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, आयुष्मान भारत हेल्थ कार्ड (ABHA ID) २०२५ पासून गुगल वॉलेटवर उपलब्ध होईल. आयुष्मान भारत योजनेचे लाभ लोकांपर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचवण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशन (ABDM) हा एक भाग आहे. या मिशनची देखरेख करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने गुगलसोबत एकत्र काम केले आहे. यामुळे या योजनेशी संबंधित हेल्थ कार्ड लोकांना फक्त गुगल वॉलेटवर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ लोकांपर्यंत जलद पोहोचण्यास मदत होईल.5 / 6गुगलने सांगितले की, ज्या कामासाठी आधी सहा महिने लागत होते. आता ते दोन आठवड्यांत पूर्ण होऊ शकते. गुगल वॉलेटवर उपलब्ध असलेल्या ABHA आयडी कार्डमुळे, लोक त्यांचे वैद्यकीय रेकॉर्ड, जसे की लॅब चाचणी अहवाल आणि औषधांच्या स्लिप्स, देशभरातील आरोग्य केंद्रांसोबत सहज शेअर करू शकतील. दरम्यान, आरोग्यासंबंधी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युजर्स त्यांचा फोनवर फिंगरप्रिंट, पिन किंवा पासकोडसह सुरक्षित करू शकतील. दरम्यान, ABHA आयडी कार्ड नंबर आपल्या आरोग्याच्या नोंदी ठेवत असते. हे देशातील डिजिटल आरोग्यास प्रोत्साहन देते.6 / 6आयुष्मान भारत योजना मुख्यत्वे गावांमध्ये आणि गरीब लोकांमध्ये आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेद्वारे, भारतातील पात्र कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो. या विम्याच्या मदतीने तुम्ही रुग्णालयात उपचार घेऊ शकता. यामध्ये अनेक गंभीर आजारांवर उपचारांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबरमध्ये या योजनेला मुदतवाढ दिली. आता या योजनेंतर्गत देशातील ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षण मिळणार आहे