शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ATM मध्ये दोनदा 'कॅन्सल' बटन दाबल्यास तुमचे पैसे सुरक्षित राहतात? व्हायरल दाव्याचे सत्य काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:15 IST

1 / 10
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज पीआयबी फॅक्ट चेकद्वारे १००% खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. आरबीआय किंवा सरकारने असा कोणताही सल्ला किंवा मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत.
2 / 10
एटीएममधील 'कॅन्सल' बटण केवळ व्यवहार रद्द करण्यासाठी असते. जर तुम्ही चुकून कोणतेही बटन दाबले किंवा व्यवहार थांबवायचा असेल, तर तुम्ही हे बटन दाबून व्यवहार थांबवू शकता. याचा पिन चोरी किंवा हॅकिंगशी कोणताही संबंध नाही.
3 / 10
एटीएमचे 'कॅन्सल' बटन तुम्हाला फसवणुकीपासून वाचवू शकत नसले तरी, काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता.
4 / 10
एटीएममध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कार्ड स्लॉट आणि की-पॅडची काळजीपूर्वक तपासणी करा. जर तुम्हाला काही 'संशयास्पद' किंवा एखादे अतिरिक्त डिव्हाईस लावलेले दिसले, तर ते एटीएम वापरू नका आणि लगेच बँकेकडे तक्रार करा.
5 / 10
एटीएम फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही तुमचा ४ अंकी पिन नियमितपणे, म्हणजे दर ३ ते ६ महिन्यांत बदलणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हॅकर्सना तुमचा पिन मिळणे कठीण होते आणि तुमची सुरक्षा वाढते.
6 / 10
पिन निवडताना १२०४, ११११ किंवा २२२२ यांसारखे सोपे आकडे वापरणे टाळा. तुमचा पिन नेहमी अधिक सुरक्षित आणि लक्षात ठेवायला कठीण असेल असा निवडा, ज्यामुळे अंदाज लावला जाऊ शकत नाही.
7 / 10
तुमच्या बँक खात्यातून पैसे काढताच तुम्हाला लगेच माहिती मिळावी यासाठी एसएमएस आणि ईमेल अलर्ट सेवा सक्रिय ठेवा. यामुळे कोणतीही अनधिकृत कृती झाल्यास तुम्हाला त्वरित कळेल आणि तुम्ही त्वरित कारवाई करू शकाल.
8 / 10
जर तुमचे एटीएम कार्ड चोरीला गेले किंवा हरवले, तर अजिबात वेळ न घालवता तत्काळ बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला कॉल करून कार्ड ब्लॉक करा. यामुळे कोणीही तुमच्या कार्डचा गैरवापर करू शकणार नाही.
9 / 10
अनेकदा एटीएममध्ये कार्ड अडकते किंवा मशीन अचानक खराब होते, अशा वेळी अनोळखी व्यक्तीकडून मदत घेऊ नका. तो व्यक्ती फ्रॉड करणारा असू शकतो आणि तुमच्या कार्डची माहिती चोरू शकतो. गरज पडल्यास फक्त बँक कर्मचाऱ्याची मदत घ्या.
10 / 10
बँकेचे नाव घेऊन येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद ईमेल किंवा मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नका आणि एटीएम कार्डची किंवा पिनची माहिती कोणालाही फोनवर देऊ नका. बँक कधीही फोनवर गोपनीय माहिती मागत नाही.
टॅग्स :atmएटीएमfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक