कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 14:30 IST
1 / 8पाकिस्तानचे शेपूट अखेर ते वाकडे ते वाकडेच राहणार असल्याचे दिसत आहे. स्वतः कंगाल असतानाही भारताला दर्पोक्ती देण्याची खोड जात नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर. 2 / 8ते सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून सतत भारताला धमक्या देत आहेत. कधी क्षेपणास्त्रांचा, तर कधी अणुहल्ल्याचा इशारा देत आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे, पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खराब होत असताना, तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांची संपत्ती मात्र वाढत आहे.3 / 8पाकिस्तानी लष्कर हे फक्त देशाचे सैन्य नसून, एक मोठा व्यावसायिक समूह देखील आहे. लष्कराच्या नावाखाली १०० पेक्षा जास्त कंपन्या चालवल्या जातात. या कंपन्या प्रचंड नफा कमावतात. त्यामुळे, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाचे पद केवळ लष्करी प्रमुख नसून, एका मोठ्या कंपनीच्या सीईओसारखे असते, ज्याच्याकडे अमाप संपत्ती आणि अधिकार असतात.4 / 8फौजी फाउंडेशन, आर्मी वेल्फेअर ट्रस्ट, शाहीन फाउंडेशन आणि बहरिया फाउंडेशन यांसारख्या संस्था लष्कराच्या नियंत्रणाखाली आहेत. या संस्था रिअल इस्टेटसह बँकिंग, सिमेंट, डेअरी आणि वाहतूक अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करतात. बाहेरून त्या कल्याणकारी संस्था वाटत असल्या तरी, प्रत्यक्षात त्या अब्जावधी रुपयांचा व्यवसाय करतात.5 / 8पाकिस्तानी सैन्याचा सर्वात मोठा व्यवसाय रिअल इस्टेटमध्ये आहे. डीएचए (डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी) ही त्यांची सर्वात प्रसिद्ध गृहनिर्माण कंपनी आहे. कराची, लाहोर, इस्लामाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये जमीन विकत घेऊन त्याचे फायदेशीर गृहनिर्माण प्रकल्पात रूपांतर करणे, हे त्यांचे मुख्य काम आहे. 6 / 8पाकिस्तानी लेखिका आयेशा सिद्दिका यांनी त्यांच्या 'मिलिटरी इंक' या पुस्तकात सांगितले आहे की, पाकिस्तानी लष्कराच्या व्यवसायाचे एकूण मूल्य ४० ते १०० अब्ज डॉलर्सच्या दरम्यान आहे.7 / 8एका रिपोर्टनुसार, जनरल असीम मुनीर यांची एकूण संपत्ती सुमारे ८ लाख डॉलर्स (अंदाजे ७ कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. पाकिस्तानच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, ही रक्कम खूप मोठी आहे. 8 / 8यावरून हे स्पष्ट होते की, लष्करप्रमुख पद हे केवळ सैन्य चालवण्याचे पद नसून, सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचे एक मोठे साधन बनले आहे.