शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

5 वर्षाच्या आतही मिळू शकतो ग्रेच्युटीचा लाभ? जाणून घ्या!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 02, 2021 4:49 PM

1 / 8
देशात पेमेंट अँड ग्रेच्युटी अॅक्ट, हा सर्वच कंपन्या, खाणी, ऑईल फिल्ड, बंदरं आणि रेल्वेंसाठी लागू असतो. याशिवाय, 10 पेक्षा अधिक लोकांना नोकरी देणारी दुकानं आणि कार्यालयांतील कर्मचाऱ्यांनाही ग्रेच्युटीचा लाभ मिळतो.
2 / 8
ग्रॅच्युटी म्हणजे काय? ग्रॅच्युटी कायद्यानुसार, कुठल्याही कर्मचाऱ्याला आपल्या एम्पलॉयर सोबत सलग पाच वर्षांपर्यंत काम करावे लागते. तेव्हाच त्याला ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकतो.
3 / 8
मात्र, कायद्याच्या कलम-2A मध्ये ‘सलग काम करण्याची’ व्याख्या करण्यात आली आहे. यानुसार, 5 वर्ष काम न करणारेही अनेक कर्मचारी ग्रॅच्युटीचा लाभ घेऊ शकतात.
4 / 8
कलम-2A नुसार, कुणा-कुणाला मिळते सूट - ग्रॅच्युटी कायद्याच्या कलम-2A नुसार, भूमिगत खाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, आपल्या कंपनीसोबत 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर 190 दिवस आणखी काम केल्यास त्यांना ग्रॅच्युटीचा लाभ मिळतो.
5 / 8
आठवड्यात 6 दिवसांपेक्षा कमी काम करणाऱ्यांसाठी हा नियम - याच पद्धतीने एम्पलॉयरसोबत आठवड्यात 6 दिवसांपेक्षा कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ग्रॅच्युटीचा लाभ घेण्यासाठी 4 वर्ष आणि 190 दिवसांचा नियम लागू आहे. इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा कालावधी 240 दिवसांचा आहे.
6 / 8
नोटिस पिरियडमधील कामही ग्रॅच्युटीचा भाग - लोकांच्या मनात नेहमीच शंका असते, की नोटिस पिरियडदरम्यान करण्यात येणारे काम, ग्रेच्युटीसाठी आवश्यक असलेल्या दिवसांत ग्राह्य धरले जाते का?
7 / 8
नोटिस पिरियडमधील कामासंदर्भात, पैसाबाजार डॉट कॉमचे संचालक साहिल अरोडा यांनी म्हटले आहे, की नोटिस पिरियडदरम्यान करण्यात आलेले काम त्याच कर्मचाऱ्याच्या एम्प्लॉयर बरोबर सलग करण्यात आलेल्या कामाचा भाग आहे. त्यामुळे, ग्रॅच्युटीच्या लाभात नोटिस पिरियडमधील कामही ग्राह्य धरले जाते.
8 / 8
नोटिस पिरियडमधील कामासंदर्भात, पैसाबाजार डॉट कॉमचे संचालक साहिल अरोडा यांनी म्हटले आहे, की नोटिस पिरियडदरम्यान करण्यात आलेले काम त्याच कर्मचाऱ्याच्या एम्प्लॉयर बरोबर सलग करण्यात आलेल्या कामाचा भाग आहे. त्यामुळे, ग्रॅच्युटीच्या लाभात नोटिस पिरियडमधील कामही ग्राह्य धरले जाते.
टॅग्स :Employeeकर्मचारीMONEYपैसा