भारतापेक्षा अमेरिकेवर १० पट कर्ज, जाणून घ्या जगातील दहा सर्वात मोठे कर्जदार देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 09:36 IST2024-12-24T09:21:27+5:302024-12-24T09:36:20+5:30
भारतापेक्षाही अमेरिकेवर जास्त कर्जाचा बोजा आहे.

जगात सगळ्यात देशात कर्ज असते. आताही अनेक देशावर मोठा कर्जाचा बोजा आहे.याचा आकडा १०२ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या हवाल्याने कर्जदार देशांची यादी शेअर केली आहे. यामध्ये अमेरिकेवर सर्वाधिक कर्ज आहे, तर चीन आणि जपान दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतावरही मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे. जगातील एकूण कर्जाच्या ३.२% वाटा भारतावर आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जाहीर केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर, सध्या जगावर एकूण १०२ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे आणि त्यात सर्वात मोठा भागधारक अमेरिका आहे, यावर ३६ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे, ते जगातील सर्वात मोठे कर्ज आहे. जागतिक कर्ज ३४.६ टक्के आहे.
जगातील दुसरा सर्वात मोठा कर्जदार देश चीन आहे. चीनवर १४.६९ ट्रिलियन डॉलर्स इतके मोठे कर्ज आहे. हे संपूर्ण जगाच्या कर्जाच्या १६.१ टक्के आहे.
कर्जामध्ये अमेरिका आणि चीननंतर जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयएमएफच्या आकडेवारीनुसार, जगातील एकूण कर्जांपैकी १० टक्के कर्ज जपानवर आहे. अहवालानुसार, ते सुमारे १०.८० ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे.
टॉप-१० सर्वात मोठ्या कर्जदार देशांच्या यादीत पुढील नाव ब्रिटन आहे. हा देश जागतिक कर्जाच्या ३.६ टक्के आहे. याशिवाय फ्रान्सचा वाटा ३.५ टक्के आणि इटलीचा ३.२ टक्के आहे.
कर्जामध्ये भारत टॉप-१० यादीत सातव्या स्थानावर आहे आणि अमेरिकेपेक्षा १० पट कमी कर्ज आहे. जगातील एकूण कर्जामध्ये भारताचा वाटा ३.२% आहे. यानंतर जर्मनी (२.९%), कॅनडा (२.३%), ब्राझील (१.९%) यांचा समावेश आहे.