शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:46 PM

1 / 8
आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देशभरातील सराफा बाजारात ग्राहकांची खरेदी पाहायला मिळत आहे. अक्षय्य तृतीयेच्यानिमित्ताने लोक सोन्याची खरेदी शुभ मानतात. जर तुम्हीही आज सोने खरेदी करणार असाल तर खरेदीशी संबंधित काही गोष्टी नक्कीच जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळू शकता.
2 / 8
सोने खरेदी करताना लोक अनेकदा सोन्याच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंग आणि कॅरेटची किंमत पाहतात, परंतु इतर काही गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. अनेकदा लोक सोने खरेदी करताना रिसेलिंग पॉलिसीकडे लक्ष देत नाहीत.
3 / 8
जर तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोन्याच्या रिसेल व्हॅल्यूसंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे दागिने खरेदी करताना, ज्वेलर्सकडून बायबॅक पॉलिसीबद्दल स्पष्टपणे जाणून घ्या. दरम्यान, 24, 22 आणि 20 कॅरेट सोन्याची किंमत वेगवेगळी असते. त्यानुसार सोन्याची रिसेल व्हॅल्यू सुद्धा ठरवली जाते.
4 / 8
24 कॅरेट हे सोन्याचे सर्वात शुद्ध असते. त्यामुळे त्याची रिसेल किंमतही जास्त असते. कमी शुद्धतेचे सोने विकत घेतल्यास ते विकायला गेल्यावर कमी किंमत मिळते. दुसरीकडे, असे सोने तारण ठेवल्यास, तुम्हाला कमी कर्ज मिळेल. कारण वेगवेगळ्या कॅरेटच्या सोन्याच्या किमतीत 25 टक्के फरक आहे.
5 / 8
खरेदीच्या वेळी सोन्याची नेमकी किंमत जाणून घ्या. यासाठी तुम्ही इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर किंमत पाहू शकता. सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करताना मेकिंग चार्जेसकडे लक्ष द्या. सामान्यतः सोन्याच्या दागिन्यांचा मेकिंग चार्ज 3 ते 25 टक्क्यांपर्यंत असतो.
6 / 8
काही क्लिष्ट डिझाइन केलेले दागिन्यांचा चार्ज 30 टक्क्यांपर्यंत असतो. त्यामुळे ज्वेलर्सनी बिलात दागिने बनवण्यासाठी काय चार्ज आकारले ते पाहा. सोन्याच्या खरेदीवर 3 टक्के जीएसटी भरावा लागतो, तसेच सोने विकून झालेल्या नफ्यावर कर भरावा लागतो.
7 / 8
सोने खरेदी केल्यानंतर 3 वर्षांच्या आत त्याची विक्री केल्यास शॉर्ट टर्म कॅपिटल गेन द्यावा लागतो. तसेच, 3 वर्षांनंतर विक्रीवर दीर्घकालीन भांडवली लाभ कर भरावा लागतो. सोन्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर प्राप्तिकराच्या दरानुसार कर भरावा लागतो.
8 / 8
गोल्ड हॉलमार्किंग हा एक स्टॅम्प आहे, जो सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता दर्शवतो. यासाठी 6 डिजिट असलेले अल्फान्यूमेरिक नंबर लिहिलेले असतात. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग प्रिंटिंग तपासणे आवश्यक आहे. यासाठी BIS Care हे सरकारी अॅप वापरले जाते.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसायAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया