1 / 15Aadhaar Card हे भारतीयांसाठी एका महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी सध्या आधार कार्डाची आवश्यकता असते. 2 / 15लोकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागू नये आणि चांगली सुविधा मिळावी यासाठी आधार कार्ड तयार करणारी संस्था Unique Identification Authority of India (UIDAI) चांगलं कामही करत आहे. 3 / 15सध्या एक मोठा निर्णय घेतला असून एक सेवा बंद केली आहे. UIDAI नं एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. जाणून घेऊया नक्की कोणती सेवा आधार कार्डासंबंधी कोणती सेवा UIDAI नं बंद केली आहे. 4 / 15UIDAI घरी येणारं मोठं आधार कार्ड रीप्रिन्ट करून देणं आता बंद केलं आहे. यापूर्वी आधार कार्डाचा रीप्रिन्ट फॉर्मेट वेगळा होता. परंतु UIDAI नं आता त्यात मोठा बदल केला आहे. आता UIDAI हे PVC आधार कार्ड जारी करणार आहे. 5 / 15या आधार कार्डाची साईज ही आपल्या डेबिट कार्ड इतकी लहान आहे. तसंच हे कार्ड सहजरित्या कोणत्याही ठिकाणी नेणं शक्य आहे. 6 / 15एका युझरनं आधार कार्ड हेल्पलाईनला (Aadhaar Help Centre) एक प्रश्न विचारला होता. त्यात त्या व्यक्तीनं आपण आधार कार्ज रीप्रिन्ट करू शकतो का असं विचारलं होतं. तसंच आपल्याला वेबसाईटवर यासंदर्भातील ऑप्शन दिसत नसल्याचंही सांगितलं होतं.7 / 15यावर आधार हेल्प सेंटरनं उत्तर देत आपण ती सेवा बंद केली असल्याचं म्हटलं. ऑनलाइन माध्यमातून आता पीव्हीसी कार्डासाठी अर्ज करता येणार आहे. 8 / 15तसंच आधार कार्ड फ्लेक्सिबल फॉर्मेटमध्ये ठेवायचं असल्यास तुम्ही ते प्रिन्ट करू शकता असंही त्यांनी उत्तर देताना म्हटलं.9 / 15आता तुम्ही आपल्या मोबाईलद्वारे PVC आधार कार्ड ऑर्डर करू शकता किंवा आपल्या फोनमध्येही डाऊनलोड करू शकता. 10 / 15जर तुम्हाला हे कार्ड बनवायचं असेल तर तुम्हाला UIDAI ची वेबसाईट uidai.gov.in किंवा resident.uidai.gov.in यावर जावं लागेल. 11 / 15त्यानंतर माय आधार कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा. त्यानंतर एक पेज ओपन होईल. 12 / 15वेबसाईटवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून व्हर्च्युअल आयडी नंबर आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला एक कॅप्चा कोड किंवा सिक्युरिटी कोड भरावा लागेल जो अल्फान्युमरिक असेल.13 / 15त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे किंवा नाही याचा एक कॉलम दिसेल त्यात योग्य ठिकाणी टीक करा. 14 / 15आता त्या ठिकाणी तुम्ही जो क्रमांक टाकला असेल त्यावर तुम्हाला एक OTP मिळेल. तो ओटीपी टाकल्यानंतर तुमचं आधारकार्ज रीप्रिन्ट होईल. 15 / 15यांतर तुम्हाला आणखी एक पर्यायही मिळतो. तुम्ही ५० रूपये शुल्क भरून ते आधार कार्ड तुमच्या घरी मागवता येईल