३ महिन्यांत उभी केली ₹९८०० कोटींची कंपनी! देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाला ओळखता का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 08:49 IST
1 / 6आजवर आपण अनेक अब्जाधीशांच्या यशोगाथा ऐकल्यात. गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांसारखे उद्योगपती जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. असे अनेक लोक आहेत ज्यांनी अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आपल्याला सिद्ध केलंय.2 / 6एक अशीही व्यक्ती आहे जिनं अगदी तरुण वयात आपली यशोगाथा लिहिली आहे. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पर्ल कपूर आहे. वयाच्या २७ व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. चला, तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊ.3 / 6पर्ल कपूर यांचं हे यश हे त्यांच्या Zyber 365 स्टार्टअपचे परिणाम आहे. Zyber 365 या कंपनीची सुरुवात मे २०२३ मध्ये झाली. अवघ्या तीन महिन्यांत या कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला. 4 / 6युनिकॉर्न कंपन्या या स्टार्टअप कंपन्या आहेत ज्यांचं मूल्य १ अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक आहे. Zyber 365 हे Web3 आणि AI-आधारित OS स्टार्ट-अप आहे. यानं रिटेल क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केलंय.5 / 6कंपनीचं मुख्यालय लंडनमध्ये आहे आणि कामकाज अहमदाबादमध्ये आहे. भारत आणि आशियातील सर्वात वेगानं वाढणारा युनिकॉर्न म्हणून याकडे पाहिलं जातंय. कंपनीचं मूल्यांकन १.२ अब्ज डॉलर्स (अंदाजे ९,८४० कोटी रुपये) आहे. पर्ल कपूर हे Zyber 365 चे संस्थापक आणि सीईओ आहेत. 6 / 6पर्ल कपूर यांची एकूण संपत्ती १.१ अब्ज डॉलर्स (९,१२९ कोटी रुपये) आहे. त्यांच्याकडे कंपनीचे ९० टक्के शेअर्स आहेत. स्टार्टअपनं अलीकडेच सीरिज A फंडिंगमध्ये १० कोटी डॉलर्स मिळवले. यामध्ये ८.३ टक्के गुंतवणूक एसआरएएम आणि एमआरएएम ग्रुपकडून आली आहे जी एक कृषी कंपनी आहे.