१ जुलैपासून State Bank च्या ग्राहकांसाठी ATM मधून पैसे काढणं होणार महाग; बदलणार अनेक नियम
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 15:25 IST
1 / 8भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून अनेक नियम बदलणार आहेत. नवे नियम लागू झाल्यानंतर एटीएमममधून रोख रक्कम काढणं (ATM Cash Withdrawal) आणि चेकबुकचा (Cheque Book) वापर करणं थोडं महाग होणार आहे.2 / 8नवं शुल्क हे बेसिक सेव्हिंग अकाऊंट डिपॉझिट (BSBD) अकाऊंड होल्डर्ससाठी लागू होती. जाणून घेऊया कोणत्या सेवांसाठी आता तुम्हाला किती शुल्क द्यावं लागणार आहे.3 / 8स्टेट बँकेच्या BSBD खातेधारकांना आर्थिक वर्षाला १० चेकच्या कॉपीज देण्यात येतात. परंतु आता १० चेकच्या कॉपीजसाठीही शुल्क द्यावं लागणार आहे. १० चेकसाठी आता बँक ४० रूपये आणि जीएसटी आकारेल.4 / 8याव्यतिरिक्त २५ चेक लिव्हसाठई बँक ७५ रुपये आणि जीएसटी आकारणार आहे. तर दुसरीकडे इमर्जन्सी चेकबुकच्या १० लिव्हसाठी बँक ५० रूपये आणि जीएसटी आकारेल. परंतु ज्येष्ठ नागरिकांना चेक बुकवर सेवा शुल्कापासून सूट दिली जाईल.5 / 8BSBD खातेधारकांना बँक चार मोफत ATM ट्रान्झॅक्शन देतं. मोफत वापराची मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांकडून शुल्क आकारलं जातं. ब्रान्च किंवा एटीएममधून रोख रक्कम काढल्यास बँक १५ रूपये आणि जीएसटी आकारते.6 / 8स्टेट बँकेनं नुकाताच चेकचा वापर करून रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवून १ लाख रूपये प्रति दिन केली आहे. बचत बँक पासबूकच्या माध्यमातून स्लीपचा वापर करत पैसे काढण्याची मर्यादाही २५ हजार रूपये प्रति दिवस करण्यात आली आहे. 7 / 8स्टेट बँकेच्या BSBD च्या अकाऊंटचेही अनेक फायदे आहेत. कोणत्याही शुल्काशिवाय किंवा चार्जेसशिवाय हे खातं उघडता येणं शक्य आहे. 8 / 8या खात्या झीरो बॅलन्स खातं असंही म्हटलं जातं. यामध्ये कोणत्याही प्रकारे कमाल आणि किमान रक्कम ठेवण्याचं बंधन नाही. याशिवाय हे खातं असलेल्या ग्राहकांना एटीएम कार्डही देण्यात येतं.