शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'कुबेर' मुकेश अंबानींच्या खजिन्यातील या वस्तूंची किंमत पाहून डोळे दीपतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 19:56 IST

1 / 9
ब-याचदा मित्रांसोबत असंच गप्पा मारत असताना अनेकजण, अरे माझ्याकडे पैसे असते तर मी सोन्याचं विमान खरेदी केलं असतं, दुसरा म्हणतो मी मोठ्ठा बंगला बांधला असता तर तिसरा आणखी काहीतरी सांगतो. खूप पैसा कमवणे आणि त्यातून आपल्या इच्छा पूर्ण करणे ही अनेकांची फॅंटसी असते. पण आधीच ज्या लोकांकडे खूप पैसा आहे त्यांचं काय? ते पैसे कुठे आणि कसे खर्च करत असतील. अशावेळी सर्वात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचं... मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. तर जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत ते 19 व्या स्थानावर आहेत. ते पैसे कुठे खर्च करत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत कोणत्या महागड्या वस्तू खरेदी केल्या याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत.
2 / 9
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी हे त्यांच्या BMW760Li या कार ने प्रवास करतात. ही कार देशतील सर्वात महागडी कार आहे. तशी या कारची किंमत 1.9 कोटी रुपये इतकी आहे. मात्र अंबानी यांना देण्यात आलेल्या झेड सुरक्षेमुळे ही कार खास तयार करुन घेण्यात आली आहे. त्यानुसार या कारची किंमत 8.5 कोटू रुपये इतकी झाली आहे.
3 / 9
मुकेश अंबानी यांच्या अॅंटीला बिल्डींगची सध्याची किंमत 1 बिलियन डॉलर इतकी आहे. 4 हजार स्क्वेअर फूटापेक्षा जास्त जागेवर बांधण्यात आलेल्या या बिल्डींगमध्ये 27 मजले आहेत. महत्वाची बाब म्हणजे या इमारतीत केवळ पार्किंगसाठी अनेक मजले आहेत. ज्यात तब्बल 168 गाड्या पार्क केल्या जाऊ शकतात. तसेच या इमारतीवर हेलिकॉप्टरसाठी 3 हेलिपॅड आहेत.
4 / 9
मुकेश अंबानी यांच्याकडे फॅल्कन 900 हे केवळ 14 जण बसू शकतील इतकं एक प्रायव्हेट प्लेन आहे. या प्लेनची प्रवासाची क्षमता 8 हजार 340 किमी इतकी आहे. या प्लेनची किंमत 43.3 मिलियन डॉलर इतकी आहे.
5 / 9
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांनी एअरबस-319 हे विमानही विकत घेतलं आहे. या विमानाची बैठक क्षमता 180 प्रवासी इतकी आहे. या विमानाची किंमत 230 कोटी असल्याची माहिती आहे.
6 / 9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सर्वात लक्झुरिअस आणि महाग प्रायव्हेट जेट खरेदी केलंय. 73 मिलियन डॉलर इतकी या जेटची किंमत आहे.
7 / 9
मुकेश अंबानी यांची सर्वात आवडती कार म्हणजे Maybach 62. भारतात ही कार खरेदी करणारे ते पहिले व्यक्ती आहेत. या कारमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. या कारमध्ये 5513 सीसी इंजिन असून ही कार केवळ 5.4 सेकंदात 0 ते 100 किमीचा प्रवास पार करु शकते.
8 / 9
मुकेश अबांनी यांच्याकडे अॅस्टन मार्टिन रॅपिड मॉडिफाईड ही आलिशाम कारही आहे. या कारची किंमत 4.5 कोटी रुपये आहे.
9 / 9
मुकेश अंबानी यांच्याकडे रोल्स रॉयस फॅंटम ही आलिशान कारही आहे. अशीच कार मुकेश अंबानी यांचे मित्र आणि प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याकडेही आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी