शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 18:17 IST

1 / 6
२२ जून रोजी योगिनी एकादशी आहे. ही तिथी रविवारी आली असून या दिवसाचा स्वामी ग्रह सूर्य असेल. सूर्य आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करेल, तर बुध कर्क राशीत प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, दिवसभर बुधादित्य योग तयार होईल. चंद्र दिवसभर मेष राशीत शुक्रासोबत संक्रमण करेल आणि वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच, ग्रहांच्या योगाचे मूल्यांकन पाहता भरणी नक्षत्राच्या युतीत, सुकर्मा आणि त्रिपुष्कर नावाचे शुभ योग देखील तयार होतात. ज्याचा लाभ पाच राशींना संभवतो.
2 / 6
मेष : वार हा मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ दिवस असणार आहे. कामात यश मिळेल. तुमच्या योजना योग्य दिशेने पुढे जातील. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमच्या विचारांनी प्रभावित होतील. व्यावसायिकांना व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक सुखसोयी वाढतील, तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकाल. यासोबतच, तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल. आदर वाढेल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. विशेषतः पालक आणि जोडीदाराशी तुमचे नाते खूप गोड होईल. नोकरदारांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल. धनवृद्धी होईल. चांगल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक कराल.
3 / 6
कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी रविवार, अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देणारा ठरेल. व्यावसायिक आपल्या व्यवसायात प्रचंड कमाई करतील. करिअरमध्ये प्रगती होईल. तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुमच्या प्रगतीवर खूश असतील. तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील आणि तुमच्या कोणत्याही जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतील. यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा सुधारेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश होतील. पगारवाढीची संधी मिळेल. येत्या आठवड्यात सरकारी कामे मार्गी लागतील. रविवार आपल्या कुटुंबासोबत आनंदात, समाधानात घालवाल.
4 / 6
सिंह : रविवार हा सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यवान दिवस ठरणार आहे. सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे तुमचे नशीबही उजळून निघेल. मोठ्या संकटातून बाहेर पडाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप हलके वाटेल. यासोबतच, तुम्ही व्यवसायात अडकलेले तुमचे पैसे परत मिळवू शकाल. तुम्हाला वडील किंवा वडीलधाऱ्या लोकांचा पाठिंबा मिळेल. त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. हा प्रवास तुमच्यासाठी यशस्वी आणि शुभ राहणार आहे. तुम्हाला नवीन लोकांशी संपर्क वाढवण्याची संधी मिळेल. व्यवसायही वाढेल. प्रसिद्धीसाठी तुम्ही नवीन तांत्रिक माध्यमांची मदत घेऊ शकता. उच्च शिक्षणाच्या योजनांना गती मिळेल. जर तुम्ही अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कुठूनतरी आशेचा किरण दिसू शकेल. कुटुंबातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवन आनंदी असेल.
5 / 6
तूळ : रविवार हा तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास दिवस असणार आहे. तुम्हाला भागीदारीत फायदा होईल. चांगली गुंतवणूक करू शकता. नशीब साथ देईल. नोकरीत पदवाढ आणि वेतनवाढ होईल. तुम्हाला कुटुंबाकडून वारसा म्हणून काही मौल्यवान वस्तू मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही भावनिक व्हाल. यासोबतच, आरोग्याच्या बाबतीत हा काळ अनुकूल ठरेल. जोडीदाराची साथ आणि कौटुंबिक आनंद मिळेल. नवीन वस्तूंची खरेदी कराल. धार्मिक ठिकाणी दान धर्म कराल.
6 / 6
कुंभ : रविवार हा कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंददायी दिवस असणार आहे. कामात आत्मविश्वास वाढेल. लोकप्रियता वाढेल. व्यवसायात नफा होईल. नोकरदारांना पगार वाढीच्या संधी चालून येतील. प्रकाशन, लेखन, संशोधन, रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अतिरिक्त फायदे मिळू शकतात. यासोबतच, वाहनसौख्य मिळेल. जेणेकरून तुमचे मन आनंदी होईल. कुटुंबात लहान भावंडांमध्ये मतभेद असतील तर ते दूर होईल. तुमच्यातील सुसंवाद वाढेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यIndian Festivalsभारतीय उत्सव-सणekadashiएकादशी