शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

प्रेमानंद महाराजांचे खरे नाव काय? वय किती? पाहा, वाढदिवसाची तारीख अन् काही रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:11 IST

1 / 9
Premanand Maharaj Original Name And Birth Date: भारत ही संत-महंतांची भूमी म्हणूनही ओळखली जाते. प्राचीन काळापासून अनेक विद्वान संत, महंत व्यक्ती होऊन गेल्या. संतांच्या शिकवणीमुळे आणि मार्गदर्शनामुळे देशाला अनेकदा दिशा मिळाल्याचेही म्हटले जाते. धार्मिक, अध्यात्मिक मार्गावर जाण्याचा तसेच भगवंताची भक्ती, परमार्थ असे अनेक उपदेश संत-महंत देत असतात. संतांचे उपदेश कालातीत असून, आजही त्याचे अनुभव लोकांना येत असतात.
2 / 9
Who is Premanand Maharaj: आजच्या Reel च्या जगात अनेक संत-महंत, महाराज लोकप्रिय होत आहेत. त्यांचे अनुयायी आणि फॉलोअर्स वाढत आहेत. Real जगातही महाराज तसेच संत-महंताच्या शिकवणीचा उपयोग होत असल्याचे फॉलोअर्सचे अनुभव आहेत. असेच एक लोकप्रिय महाराज म्हणजे वृंदावन येथील प्रेमानंद महाराज. अगदी विराट कोहली, अनुष्का शर्मा यांच्यापासून अनेक जण त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. परंतु, प्रेमानंद महाराजांचे खरे नाव काय आहे, त्यांचा वाढदिवस कधी असतो, जाणून घेऊया...
3 / 9
प्रेमानंद महाराज, राधाराणीचे परम भक्त आहेत, हे वृंदावनचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भजन आणि सत्संगामुळे ते देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी अनेक भक्त, सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि नेते वृंदावनला येतात. प्रेमानंद महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला आहे.
4 / 9
प्रेमानंद महाराजांच्या कुटुंबात आध्यात्मिक वातावरण होते. त्यांचे वडील, आजोबा आणि मोठा भाऊ भगवंताची भक्ती करत असत, याचा प्रभाव प्रेमानंद महाराजांच्या जीवनावर पडला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे पठण सुरू केले. तेराव्या वर्षी त्यांनी ब्रह्मचारी होण्याचा निर्णय घेतला आणि घराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
5 / 9
संन्यास घेतल्यानंतर प्रेमानंद महाराज वाराणसीला गेले, जिथे ते गंगा नदीत दररोज तीन वेळा स्नान करत आणि ध्यान करत. ते दिवसातून एकदाच जेवण घेत. भिक्षा मागण्याऐवजी, ते काही वेळ वाट पाहत आणि अन्न मिळाले तर ग्रहण करत, अन्यथा गंगाजलावर उपवास करीत.
6 / 9
प्रेमानंद महाराजांना एक अपरिचित संत भेटले. एका चैतन्य लीला व रासलीला कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले. सुरुवातीला महाराजांनी नकार दिला, पण आग्रहामुळे ते गेले आणि कार्यक्रम पाहून प्रभावित झाले. कार्यक्रम संपल्यावर त्यांना पुन्हा रासलीला पाहण्याची तीव्र इच्छा झाली. त्या संताने सांगितले की, वृंदावनला या, इथे रासलीला रोज पाहता येईल. हे ऐकताच महाराज वृंदावनला आले.
7 / 9
वृंदावनमध्ये त्यांनी राधा वल्लभ संप्रदाय स्वीकारला. राधाराणी व श्रीकृष्णाच्या भक्तीत जीवन समर्पित केले. वृंदावनात आल्यानंतर महाराजांच्या सत्संगासाठी आणि दर्शनासाठी हजारो भक्त आश्रमाला येतात. भक्तांना दर्शनासाठी आधार कार्ड आवश्यक आहे, आणि टोकनद्वारे भेट दिली जाते. त्यांच्या भजनांनी व भक्तीने ते लाखो भक्तांचे मार्गदर्शन करत आहेत.
8 / 9
प्रेमानंद महाराज यांचे खरे नाव अनिरुद्ध कुमार पांडे असे आहे. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा दिवशी झाला. प्रेमानंद महाराजांना त्यांच्या वयाबद्दल आणि शारिरीक स्थितीबाबत जास्त चर्चा करायला आवडत नाही. प्रेमानंद महाराज ५७ वर्षांचे आहेत, असा दावा केल्याचे म्हटले जात आहे.
9 / 9
अलीकडेच त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रेमानंद महाराजांनी भक्तांना भगवंत नामाचा जप करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. ईश्वरभक्ती हेच जीवनातील खरे सुख आहे, असे त्यांनी सांगितले.
टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक