शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 07:57 IST

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात येईल. दि. २४ रोजी बुध वृश्चिक राशीत जाईल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी की, हर्षल वृषभ राशीत, गुरू कर्क राशीत, केतु सिंह राशीत, शुक्र कन्या राशीत, रवी, मंगळ आणि बुध तूळ राशीत असून, शुक्रवारी बुध वृश्चिक राशीत जाईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत, शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ आणि वृश्चिक, या राशींमधून राहील. दि. २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, दि. २० रोजी लक्ष्मीपूजन, दर्श अमावास्या, भगवान महावीर निर्वाण दिन आहे. दि. २२ रोजी दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, तर दि. २३ रोजी भाऊबीज (यमद्वितीया) आहे. दि. २५ रोजी विनायकी चतुर्थी आहे.
3 / 15
ही दिवाळी सर्वांना उत्तम आरोग्य, प्रगती, भरभराट, समृद्धी देणारी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ग्रहमानाची स्थिती पाहता दिवाळीचा आठवडा कोणत्या राशींना दमदार भरभराट, समृद्धी, भाग्योदय करणारा, मालामाल करणारा ठरू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात पैशासंबंधी चिंता करण्याची आवश्यकता नाही. अर्थप्राप्ती उत्तम असेल. गरजा सहजपणे पूर्ण करू शकाल. कोणाकडून उसने पैसे घ्यावयाचे असले तर ते सहजतेने मिळवू शकाल. व्यापारात काही गोंधळ झाल्यामुळे लाभ मिळण्यात काही समस्या उद्भवू शकतात. असे असून आवश्यक तितका लाभ मिळविण्यात यशस्वी व्हाल. अनोळखी व्यक्तींपासून जर थोडे दूर राहिलात तर ते आपल्या हिताचे होईल. नोकरीत थोडे सावध राहून कामे केलीत तर चांगला लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष ठेवावे लागेल. आत्मविश्वास उंचावलेला असेल. उपयुक्त ठरेल अशा एखाद्या नोकरीची तयारी करू शकता. वाहन चालवताना सावध राहावे. लहान-सहान गोष्टींवरून निष्कारण वाद घालत बसू नये.
5 / 15
वृषभ: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थितीवर लक्ष घालाल. प्राप्तीचे स्रोत वाढविण्याचा प्रयत्न कराल. परंतु खर्च सढळ हस्ते कराल, ज्यामुळे नंतर एखादी आर्थिक समस्या उद्भवू शकेल. तेव्हा ह्या आठवड्यात खर्चांवर अंकुश ठेवावा. व्यापारात आपण खुश व्हाल. मनात चांगल्या कल्पना येतील की, ज्यामुळे व्यापार वृद्धिंगत होईल. फळाची अपेक्षा न ठेवता मेहनतीवर विश्वास ठेवावा. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांवर काम सोपविल्यास आपले नुकसान होऊ शकते. कामात त्यांच्या भरपूर चुका होण्याची संभावना असून वरिष्ठ नाराज होऊ शकतात. विद्यार्थी एखाद्या सरकारी नोकरीच्या परीक्षेची तयारी करू शकतात. अति आत्मविश्वासामुळे अभ्यास थोडा कमी केल्यास परीक्षेस पुन्हा बसावे लागू शकते. ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करू शकता.
6 / 15
मिथुन: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. ह्या आठवड्यात आर्थिक बचतीवर लक्ष ठेवावे लागेल. दिखाऊपणाच्या नादात महागड्या वस्तूंची खरेदी कराल. ह्या दरम्यान एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. आर्थिक बाबतीत सावध राहावे. व्यापारात काही नवीन ओळखींमुळे लाभ होईल. नवीन ओळखीमुळे ज्ञानात भर पडेल. तसेच ह्यामुळे व्यवसायास प्रसिद्धी मिळून खुश व्हाल. हा आठवडा नोकरीत बदल करण्यासाठी अनुकूल आहे. सध्याच्या नोकरीत वरिष्ठांना खुश करू शकता. ह्या आठवड्यात विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्यामुळे कोणतीही परीक्षा देण्यात समस्या उद्भवणार नाही. एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा असेल तर तो सहजपणे होऊ शकेल. कामाच्या बरोबरीने आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्यावे.
7 / 15
कर्क: हा आठवडा चांगला आहे. खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. परंतु प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित कराल. शेअर्स बाजारात गुंतवणूक केल्याने चांगला लाभ होण्याची संभावना आहे. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. व्यापाऱ्यांनी ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते. त्यांना एखादा मोठा प्रकल्प मिळाल्याने ते खुश होतील. नोकरी करणाऱ्यांना एखादा पुरस्कार मिळण्याची संभावना आहे. त्यांच्या कामगिरीवर वरिष्ठ खुश होतील. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते एखाद्या स्पर्धेची तयारी करू शकतात. एखादा नवीन विषय शिकणे त्यांच्या हिताचे होईल. अभ्यासात जर एखादी समस्या असलीच तर त्यांनी अध्यापकांशी बोलून ती दूर करून घ्यावी. दिनचर्येत व्यायाम समाविष्ट करावा.
8 / 15
सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवन सुखद होण्याची संभावना आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या पूर्वी पेक्षा जास्त चांगला आहे. व्यावसायिकांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापाराची प्रगती होईल. परदेशातून लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना शासकीय कामात यश प्राप्ती होईल. काही जण नोकरी बदलू शकतात. विद्यार्थ्यांनी वेळ वाया दवडू नये. प्रकृतीत चढ-उतार संभवतात. प्रवृत्तीत सुधारणा करण्यावर लक्ष द्यावे लागेल. काही समस्या सतत त्रास देत राहतील. आर्थिक बाबतीत कोणतीही चिंता करावी लागणार नाही. सढळ हस्ते खर्च करू शकाल. असे असले तरी बचतीवर लक्ष द्यावे लागेल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालविलात तर उत्तमच.
9 / 15
कन्या: हा आठवडा आनंददायी आहे. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने काही आर्थिक समस्या उद्भवतील. एखादे जुने देणे आपणास त्रस्त करेल, जे फेडण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करणे लाभदायी ठरेल. व्यापाऱ्यांनी इतरांसमोर अति आत्मविश्वासात राहू नये. कामावर लक्ष केंद्रित करून एखादी योजना तयार करावी. कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेणे त्रासदायी ठरू शकते. नोकरीत निष्कारण एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. एखादी चूक महागात पडू शकते. अशा वेळी वरिष्ठांची माफी मागावी. विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. कोणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी आपले विषय बदलू नये. ह्या आठवड्यात तंदुरुस्त राहण्यासाठी दिनचर्येकडे लक्ष द्यावे लागेल. कामात गर्क होऊन आहाराकडे दुर्लक्ष केलेत तर त्रास होऊ शकतो. काही टेन्शन असलेच तर कुटुंबियांशी चर्चा करून दूर करण्याचा प्रयत्न करावा.
10 / 15
तूळ: ह्या आठवड्यात विचारपूर्वक आपली कामे करावी लागतील. ह्या आठवड्यात पैसे कमविण्यासाठी नवनवीन मार्ग सापडतील. आर्थिक बाबतीत कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणालाही उसने पैसे देऊ नये. एखादे महागडे वाहन इत्यादी खरेदी करावयाचे असेल तर सध्या थांबावे. व्यवसायात एखादा स्थगित झालेला प्रकल्प पुन्हा सुरू होऊ शकतो. एखादा सौदा पूर्णत्वास गेल्याने आपण खुश झालात तरी मेहनत वाढवावी लागेल. नोकरीच्या ठिकाणी विरोधकांचा पवित्रा ओळखावा लागेल. राजकारण खेळण्यात येऊ शकते. सतर्क राहून कोणालाही महत्त्वाची माहिती देऊ नये. ह्या आठवड्यात विद्यार्थी ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करतील. ते नवीन काही शिकण्यात गर्क राहतील. त्यांचे मित्र अभ्यासात अडथळे आणण्याची शक्यता असल्याने त्यांनी मित्रांपासून थोडे दूर राहावे. अध्ययनात अध्यापक मदत करतील.
11 / 15
वृश्चिक: ह्या आठवड्यात विचारपूर्वक आपली कामे करावी लागतील. ह्या आठवड्यात आपली इच्छा नसताना काही खर्च करावे लागतील. काही महागड्या वस्तूंप्रती आकर्षित व्हाल. एखाद्याच्या आजारपणावर पैसा खर्च करावा लागू शकतो. कामावर लक्ष द्यावे लागेल. कोणालाही वचन देऊ नका. नवीन ओळखींमुळे व्यवसायात फायदा होईल. कोणाशीही आर्थिक देवाण-घेवाण लेखी व्यवहारात करणे हितावह ठरेल. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. नोकरी करणाऱ्यांच्या कामात काहीसा गोंधळ उडाल्यास त्यांनी घाबरून न जाता कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. योजनांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे काहीसे दुर्लक्ष होईल. त्यांना इतरत्र कामाची चिंता सतावत राहील. अभ्यासातील समस्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीस सांगू नये. एखादा विषय बदलावयाचा असेल तर तो आपण बदलू शकता. एखाद्या शासकीय नोकरीसाठी अर्ज करू शकता.
12 / 15
धनु: हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. आपल्या समोर काही आव्हाने असतील, परंतु त्याने घाबरून जाऊ नये. खर्चा व्यतिरिक्त बचतीकडे लक्ष द्यावे. ह्या आठवड्यात कोणतेही काम विचारपूर्वकच करावे. व्यवसायात कोणाशी भागीदारी करण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करावी. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नये. नोकरीत कामात काही समस्या असतीलच, परंतु बुद्धिचातुर्याने त्यांना सहजपणे आपण दूर करू शकाल. कामात इतरांची मदत घ्यावी लागू शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना एखादी परीक्षा द्यावयाची असेल तर त्यात त्यांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. विश्रांतीसाठी वेळ काढावा लागेल.
13 / 15
मकर: हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. आर्थिक स्थिती काहीशी नाजूक होईल. ह्या आठवड्यात कोणतेही काम घाईघाईत करू नये. व्यापारात नुकसान होण्याची संभावना आहे. व्यावसायिक भागीदारी करण्यापूर्वी त्या व्यक्तीची चौकशी करावी. नवीन ओळखी व्यवसायात मदत करतील. नोकरीच्या ठिकाणी विरोधक आपल्याविरुद्ध राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतील. तेव्हा त्यांच्यापासून सावध राहावे. कामात एखाद्या मित्राची मदत घ्यावी लागू शकते. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. एखादा अभ्यासक्रम सुटला असला तर तो पुन्हा करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात कामात इतके गुंतून जाल की, त्यामुळे प्रकृतीकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते. तेव्हा सतर्क राहावे.
14 / 15
कुंभ: हा आठवडा गोधळवून टाकणारा आहे. हौसमौज करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. शेअर्स बाजाराशी संबंधित लोकांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. व्यापाऱ्यांनी विचारपूर्वक कामात वाटचाल करावी. काही लोक व्यवसायात बदल करण्यास मार्गदर्शन करतील. व्यवसायाची प्रगती करण्यासाठी बाजारातील नवनवीन गोष्टी समजून घ्याव्या लागतील. काही नवीन ओळखी होतील. नोकरीत जर एखादी समस्या असली तर ती आता दूर होईल. एखादी नवीन नोकरी मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर पूर्ण विश्वास असेल. त्यांच्यात आत्मविश्वास दांडगा असेल. एखादा अंशकालीन काम करण्याची योजना आखू शकाल. कुटुंबियांशी कौटुंबिक समस्यांविषयी चर्चा कराल. कोणतीही समस्या चर्चेद्वारा सोडवू शकाल. कामांवर लक्ष ठेवावे लागेल. एखादे संशोधन करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे.
15 / 15
मीन: हा आठवडा उत्तम फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपल्या जीवनात नवीन व्यक्तीचे आगमन होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात उत्तम प्राप्ती होणार असल्याने कोणत्याही आर्थिक समस्येस सामोरे जावे लागणार नाही. भविष्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आखाल. असे असले तरी आपण हिंडण्या-फिरण्यावर व इतर कामांवर भरपूर पैसा खर्च कराल. व्यापाऱ्यांची एखादी योजना सुरू होता-होता स्थगित होऊ शकते. त्यामुळे त्यांचे टेन्शन वाढण्याची संभावना आहे. परंतु काळजी करू नये. व्यवसायात भरपूर पैसा कमवू शकाल. नोकरी करणाऱ्यांनी कार्यस्थळी वाद होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागल्यास ते कामे पूर्ण करण्यात मदत करतील. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात खुशखबर मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. त्यांच्या ज्ञानात भर पडेल. ज्ञान प्राप्तीची कोणतीही संधी ते सोडणार नाहीत. एखादा नवीन अभ्यासक्रम करावयाचा असेल तर त्यासाठी मदत मिळू शकेल.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकDiwaliदिवाळी २०२५