शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:01 IST

1 / 15
Weekly Horoscope: दि. १६ रोजी रवि मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी शुक्र आणि हर्षल वृषभ राशीत, रवि आणि गुरू मिथुन राशीत असून, बुधवारी रवि कर्क राशीत जाईल. तेथे त्याची युती बुधाशी होईल. मंगळ आणि केतु सिंह राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मकर, कुंभ, मीन आणि मेष राशींमधून राहील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवसांत पंचक आहे. गुरुवार, १७ जुलै रोजी कालाष्टमी आहे. शनिवार, १९ जुलै रोजी सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश होणार आहे.
3 / 15
एकंदरीत ग्रहस्थिती पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? या आगामी काळात जुळून येत असलेल्या गुरुआदित्य, बुधादित्य अशा राजयोगांचा तसेच सूर्याच्या कर्क संक्रांतीचा कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतील? जाणून घ्या...
4 / 15
मेष: हा आठवडा काही गोंधळ घेऊन येणारा आहे. काही गैरसमज झाल्याने प्रेमीजनांत भांडण होण्याची संभावना असून त्यामुळे त्यांच्या नात्यात समस्या निर्माण होऊ शकतील. विवाहितांच्या जीवनात काही कारणांमुळे समस्या येतील, ज्या ते जोडीदाराबरोबर बसून दूर करण्याचा प्रयत्न करतील. ह्या आठवड्यात पैशांची रेलचेल असेल. आवडत्या काही वस्तूंची खरेदी करून खुश व्हाल. आर्थिक गुंतवणूक केल्याने चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांनी ह्या आठवड्यात सावध राहून कामावर लक्ष केंद्रित करावे. कामात चुका होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. अन्यथा वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. व्यापाऱ्यांना योजना आखून वाटचाल करावी लागेल. कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचा सल्ला घेऊ नये. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्यास समस्या वाढू शकतात. तेव्हा त्यांनी सावध राहून अध्ययन करावे. कामा निमित्त आपणास बाहेर जावे लागेल व त्यात खाण्या-पिण्यात गडबड होऊ शकते. तेव्हा आहारावर नियंत्रण ठेवावे.
5 / 15
वृषभ: हा आठवडा खुश करणारा आहे. विवाहितांना त्यांच्या कौटुंबिक समस्येतून दिलासा मिळेल. जीवन आनंदमय होऊन जोडीदाराशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न आपण कराल. प्रेमीजनांनी प्रेमिकेशी बोलून मनातील शंकांचे निरसन करून घेताना सामंजस्य दाखवावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. चैनीच्या वस्तूंवर जास्त लक्ष द्याल. त्यात जास्त पैसा खर्च होईल. ह्या आठवड्यात व्यवसायात चढ-उतार येतील. परंतु काही जुने संपर्क चांगला लाभ मिळवून देतील. व्यापारास नवीन उंची मिळेल. नोकरी करणाऱ्यांना एका मागून एक खुशखबर मिळेल. त्यांची पदोन्नती संभवते. तेव्हा त्यांनी सध्याची नोकरी कायम ठेवावी. विद्यार्थ्यांनी इकडे-तिकडे नुसते बसून वेळ न दवडता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. सरकारी नोकरीसाठी परीक्षा देण्याचा विचार करू शकता, ज्यात मेहनतीचे यथोचित फळ मिळू शकेल. एखाद्या नवीन विषयात आपली रुची जागृत होऊ शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. अन्यथा नुकसान होऊ शकते.
6 / 15
मिथुन: ह्या आठवड्यात भांडण तंटे टाळावे लागतील. वैवाहिक जीवनातील सामंजस्य नाते दृढ करेल. कुटुंबातील वयस्करांच्या बोलण्यास महत्त्व द्याल. ह्या आठवड्यात प्राप्तीत झालेली वाढ खुश करेल. शेअर बाजार किंवा इतरत्र आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. भविष्यात लाभ होईल. एखादी नवीन वस्तू खरेदी करावयाची असल्यास ती ह्या आठवड्यात करू शकता. ह्या आठवड्यात एखाद्या कामासाठी हवे असलेले कर्ज सहजपणे मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या कामामुळे एक नवीन ओळख मिळेल. त्यांना एखादी खुशखबर मिळू शकते. ह्या आठवड्यात काही माहिती गुप्त ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात सतर्क राहावे लागेल. इतरत्र कामात व्यस्त न राहता त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. एखादे संशोधन केल्यास ते हितावह होईल. त्यासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करावा. काही कारणांमुळे टेन्शन आले असेल तर ध्यान-धारणा करून ते कमी करण्याचा प्रयत्न करावा.
7 / 15
कर्क: ह्या आठवड्यात प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेचा सहवास लाभल्याने नात्यात ऊर्जा निर्माण होऊन नाते दृढ होण्यास मदत होईल. विवाहितांच्या जीवनात काही तणाव असल्याने नात्यातील समस्या वाढून कटुता निर्माण होऊ शकते. नाते सांभाळण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक नियोजन करावे लागेल. हरवलेले किंवा खोळंबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जर एखादी आर्थिक चिंता सतावत असली तर ती ह्या आठवड्यात संपुष्टात येईल. मनःस्थिती मनोरंजनात रमण्याची असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामगिरीने वरिष्ठांना प्रसन्न करतील. त्यामुळे नवीन संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांच्या नवीन ओळखी होतील, ज्या व्यवसाय वृद्धी करण्यास उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात मिश्र परिणाम मिळतील. काही कौटुंबिक समस्यांमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग पावेल व इच्छा असून अभ्यासावर त्यांचे लक्ष केंद्रित होऊ शकणार नाही. परीक्षेच्या तयारीसाठी त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावेच लागेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा विवाहितांना खुश करणारा आहे. वैवाहिक जीवनातील समस्या जोडीदार व कुटुंबीय ह्यांच्या सहयोगाने दूर होऊन नात्यातील प्रेम व जवळीक वाढेल. आर्थिक गुंतवणूक करण्यावर लक्ष द्यावे लागेल. काही फुटकळ वस्तूंवर पैसे खर्च कराल, ज्यामुळे आर्थिक स्थिती नाजूक होईल. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. व्यापाऱ्यांनी घाईघाईत काम केल्यास नुकसान होण्याची संभावना आहे. तेव्हा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना एखादी खुशखबर मिळू शकते. कदाचित जुन्या नोकरीच्या ठिकाणाहून बोलावणे येऊ शकते. असे असले तरी सध्याच्या नोकरीत चांगले काम मिळू शकते. निव्वळ मेहनत सुरू ठेवावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत एखादा निर्णय कुटुंबियांच्या सल्ल्याने घ्यावा. ह्या आठवड्यात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. एखाद्या चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
9 / 15
कन्या: हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा आहे. विवाहितांना त्यांच्या जोडीदारास दोषासकट स्वीकारावे लागेल. भांडण होण्याची शक्यता असली तर गप्प राहावे. भांडण वाढल्याचा त्रास होईल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. जर ह्या आधी कोणाला उसने पैसे दिले असतील तर ते ह्या आठवड्यात मिळण्याची संभावना आहे. जर एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्यावा. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना मेहनतीचे यथोचित फळ मिळेल. परंतु, काही कामांचा कंटाळा आल्याने समस्या निर्माण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामासाठी एखाद्या वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल. कामात एखादी समस्या असल्यास चर्चा करून त्याचे निराकरण करून पूर्ण करावे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची इच्छा होऊ शकते. विषयात काही बदल करावयाचा असेल तर वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात.
10 / 15
तूळ: हा आठवडा खुशखबर घेऊन येणारा आहे. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवनात काही नव्या समस्या उद्भवतील ज्याचा विपरीत परिणाम आपल्या कुटुंबियांवर होईल. परंतु त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. मुलांच्या कारकिर्दीमुळे काहीसे चिंतीत व्हाल. प्रेमीजनांना त्यांच्या प्रेमिकेच्या भावनांचा सन्मान करावा लागेल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. दीर्घ कालावधीसाठी आर्थिक गुंतवणूक करणे हितावह होईल. कोणाकडून उसने पैसे घेण्याचा विचार करत असाल तर सहजपणे ते मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांनी मेहनत चालूच ठेवावी. मेहनत वाढवली तर कार्यक्षेत्री त्यांची नव्याने ओळख होईल. व्यापाऱ्यांना काही जुन्या संपर्कातून लाभ होईल. हे संपर्क त्यांच्या व्यापारास एक नवीन ओळख देतील. ह्या आठवड्यात विद्यार्थी प्रसन्न राहतील. त्यांच्यात आत्मविश्वास चांगला असेल. कोणताही अभ्यासक्रम पूर्ण विश्वासाने पूर्ण करण्यात ते यशस्वी होतील. ते एखाद्या स्पर्धेत सहभागी होतील. नोकरीसाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम ते करू शकतील.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा मिश्र फळे देणारा आहे. विवाहितांना सामंजस्याने वाटचाल करावी लागेल. वैवाहिक जीवनात जर एखादी समस्या असेल तर दोघांनी एकत्र बसून चर्चा करून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात आर्थिक नियोजन न करता वाटचाल कराल. मनसोक्त खर्च कराल, त्यामुळे आर्थिक चिंता सतावतील. दीर्घ काळासाठी आर्थिक गुंतवणूक केली तर ती हितावह होईल. नोकरीच्या ठिकाणी कोणालाही न मागता सल्ला देऊ नका. कार्यक्षेत्री जर काही समस्या असली तर वरिष्ठांशी चर्चा करणे हितावह होईल. व्यापारात नवीन कामाने लाभ होईल. नवीन योजना लाभ मिळवून देऊ शकतील. विद्यार्थी तणावाच्या वातावरणात अध्ययन चालूच ठेवतील. पूर्वीच्या अभ्यासातील चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
12 / 15
धनु: हा आठवडा मौजमस्ती करण्याचा आहे. विवाहितांना जोडीदारास समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या लहानशा गोष्टीने त्यांच्या भावना दुखावल्या जाण्याची संभावना असल्याने शक्यतो अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करून नात्यातील प्रेम टिकवून ठेवावे. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात भरपूर खर्च केलात तरी आर्थिक स्थिती मजबूतच राहील. जर कर्जासाठी अर्ज केला असेल तर कर्ज मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांना विरोध करू नये. अन्यथा त्यांचे संबंध बिघडू शकतात. व्यापाऱ्यांना ह्या आठवड्यात चांगला लाभ होण्याची संभावना आहे. योजनांतून चांगला लाभ होईल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांच्या समस्या वाढतील. तेव्हा त्यांनी एकाग्रचित्ताने होईल तितका अभ्यास करावा. एखाद्या नोकरीची तयारी करत असतील तर त्यात ते यशस्वी होण्याची संभावना आहे.
13 / 15
मकर: हा आठवडा खुशखबर घेऊन येणारा आहे. विवाहितांना त्यांच्या जोडीदारास प्राधान्य द्यावे लागेल. हा आठवडा आर्थिक बाबतीत मिश्र फलदायी आहे. एखाद्या पूजेचे आयोजन करू शकता. एखाद्या मित्रास आर्थिक मदत करू शकाल. एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला फायदा होईल. एखाद्या नवीन कामाप्रती रुची जागृत होऊ शकते. व्यापाऱ्यांना ओळखी वाढविण्याची संधी मिळेल. व्यापारात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात सतर्क राहावे लागेल. नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर थोडे दिवस थांबा. विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना विषय विचारपूर्वक बदलावे लागतील.
14 / 15
कुंभ: हा आठवडा प्रगती करणारा आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासाने प्रसन्न होतील. विवाहित व्यक्तीच्या जीवनात काही कारणाने भांडण होण्याची संभावना आहे. त्याचा विपरीत परिणाम कौटुंबिक नात्यांवर होईल. विवाहितांनी एकमेकांच्या बरोबरीने वाटचाल करावी. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. शेअर बाजारात दीर्घ काळासाठी आर्थिक गुंतवणूक करून मोठा आर्थिक फायदा मिळविण्यात यशस्वी व्हाल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. नोकरी करणाऱ्यांची ह्या आठवड्यात पदोन्नती होण्याची संभावना आहे. कनिष्ठ कामात पूर्ण सहकार्य करतील. ज्ञानात नवीन भर घालाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या योजना कार्यान्वित करून वाटचाल करावी लागेल. त्याने त्यांच्या व्यवसायास नव्याने ओळख मिळेल. ह्या आठवड्यात विद्यार्थी सतर्क राहून अभ्यास करतील. इतर कामे सोडून त्यांना अभ्यासास प्राधान्य द्यावे लागेल.
15 / 15
मीन: हा आठवडा विचारपूर्वक कामे करण्याचा आहे. जोडीदाराशी संबंध दृढ करण्याचा प्रयत्न कराल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांचे एकत्र चर्चा करून निराकरण करण्याचा प्रयत्न करतील. जोडीदाराशी कौटुंबिक विषयांवर चर्चा कराल. त्यामुळे सर्वांना एकत्रित करण्यास मदत होईल. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. कर्जासाठी अर्ज केला असेल तर तो मंजूर होऊ शकेल. काही नवीन कपडे, लॅपटॉप, मोबाईल इत्यादींची खरेदी करू शकता. ज्ञानाचे प्रदर्शन करण्यात व्यस्त राहाल. नोकरी करणाऱ्यांनी कामे वेळेवर करावीत, अन्यथा त्यांच्या कामात खोळंबा होण्याची संभावना आहे. त्याच बरोबर वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. व्यापाऱ्यांना घाई करण्याच्या सवयीमुळे एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. तेव्हा धीराने काम करणे त्यांच्यासाठी हितावह होईल. विद्यार्थी आत्मनिर्भर होतील. अध्ययन ते वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी त्यांना वरिष्ठांची मदत घ्यावी लागेल, जी सहजपणे मिळू शकेल. एखादे टेन्शन असल्यास योगासन व ध्यान-धारणा करून ते सहजपणे दूर करून शरीरास तंदुरुस्त ठेवू शकाल.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक