साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम काळ, मोठा आर्थिक लाभ; पदोन्नती संभवते, अपार यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 09:26 AM2023-08-13T09:26:35+5:302023-08-13T09:38:01+5:30

Weekly Horoscope: ऑगस्टचा १३ ऑगस्ट २०२३ ते १९ ऑगस्ट २०२३ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात रवी आणि मंगळ यांचा राशीपालट आहे. १७ ऑगस्ट रोजी रवी सिंहेत तर १८ ऑगस्ट रोजी मंगळ कन्येत जाईल. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत रवी आणि शुक्र कर्केत असून, १७ रोजी रवी सिंहेत मंगळ व बुधाशी युती करेल. १८ रोजी मंगळ सिंहेतून कन्या राशीत जाईल.

केतू तूळ राशीत प्लुटो मकरेत, शनी कुंभेत तर नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. बुधवारी अधिक मास समाप्त होईल. गुरुवारपासून निज श्रावण सुरु होत आहे.

आगामी आठवड्याचे एकूण ग्रहमान पाहता, निज श्रावण मासाची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? आर्थिक आघाडी, करिअर, कार्यक्षेत्र, बिझनेस, शिक्षण, कुटुंब, वैवाहिक जीवन या आघाड्यांवर आगामी आठवडा कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ होतील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या...

मेष: एखादा छोटासा प्रवास करण्याचा प्रयत्न कराल, जो आपल्यासाठी नवीन तजेला निर्माण करू शकेल. सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल. व्यापारात उत्तम यश प्राप्ती संभवते. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात खूप कष्ट करतील. आपले कष्ट वरिष्ठांच्या नजरेस सुद्धा पडतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. त्यांचे अभ्यासातील लक्ष सुद्धा वाढेल व त्यामुळे अभ्यास सुद्धा चांगला होईल. आठवड्याची सुरुवात प्रवासास अनुकूल आहे. प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल.

वृषभ: हा आठवडा चांगला असला तरी कौटुंबिक जीवनातील तणाव वाढतील. वाद संभवतात. मातेची प्रकृती बिघडू शकते. वडिलांशी मतभेद संभवतात. एखाद्या मित्रास सांगितलेली एखादी व्यक्तिगत गोष्ट आपल्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा तणावाचा आहे. काही उलट सुलट बोलल्याने एखाद्याशी आपले भांडण होऊ शकते. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. व्यापाऱ्यांना परदेशाशी केलेल्या व्यापारातून लाभ होईल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा चांगला असला तरी आपणास खूपच विचारपूर्वक बोलावे लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस वगळता इतर सर्व दिवस विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचे आहेत. अभ्यासात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन: हा आठवडा उत्तमच आहे. एखादा मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबीय पैसे देतील. कदाचित ते आर्थिक मदतीच्या स्वरूपात असतील किंवा बक्षिसाच्या स्वरूपात. वडिलांचे सहकार्य मिळेल. भाग्य प्रबळ राहील. कामात यश प्राप्ती होईल. नोकरीत काही नवीन कामे हाती येतील की, ज्यामुळे आपले पद व प्रतिष्ठा उंचावण्यास मदत होऊ शकेल. व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धी करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रयत्नशील राहा. वैवाहिक जीवनात काही नवीन गोष्टी समजतील. जोडीदारासह फिरावयास जाण्याची एखादी योजना आखतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी भरपूर वेळ मिळेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कर्क: हा आठवडा चांगला आहे. कामात मग्न राहाल. काही चिंता किंवा खर्च दोन्ही झाले तरी आठवड्याच्या मध्यापर्यंत ते कमी होऊ लागतील. आत्मविश्वासाचा अतिरेक मात्र टाळावा लागेल. खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती सुद्धा भरपूर होणार असल्याने समस्या कमी होतील. त्यामुळे खुश असल्याचे दिसू शकते. नोकरीच्या ठिकाणी काही नवीन प्रयोग करण्याची ही वेळ आहे. काही नवीन प्रकल्प आपल्या हाती येतील, जे वेळेवर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. व्यापारासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्याप्तीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. वैवाहिक जीवनात तणावासह प्रेम राहील. जोडीदाराशी उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा लागेल. नात्यातील प्रेम वृद्धिंगत होईल. विद्यार्थ्यांना योग्य दिशेने मेहनत करण्याची गरज भासेल.

सिंह: आपणास तंदुरुस्त राहण्यासाठी काही नवीन प्रयोग करावे लागतील. उदाहरणार्थ नवीन आहारशैली प्रमाणे आहार करणे, एखाद्या ठिकाणी फिरावयास जाणे, थोडा व्यायाम करणे इत्यादी. असे केल्याने सुद्धा आपणास फायदा होईल. आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवा. कोणाशीही उलट सुलट बोलू नका. विशेषतः आपल्या वैवाहिक जोडीदाराशी उलट सुलट बोलल्यास दांपत्य जीवनातील तणाव वाढण्याची संभावना आहे. सृजनशील विचारांमुळे नात्यातील प्रत्येकास खुश ठेवण्यात मागे राहणार नाहीत. तसेच ते खुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत धावपळ होईल. बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. अशी संधी हातून जाऊ देऊ नका. काही खर्च वाढतील, परंतु प्राप्ती सुद्धा चांगली होईल. व्यापारात काही नवीन सौदे करावे लागतील. काही प्रलंबित योजनांवर काम करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे.

कन्या: हा आठवडा कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. प्राप्ती व खर्च ह्यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न कराल. खर्च नियंत्रित कराल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने काहीसा प्रतिकूल असल्याने आहारात सुधारणा करावी. तसेच थोडा व्यायाम करावा. असे केल्याने शरीर तंदुरुस्त राहू शकेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आधी जी धावपळ केली होती त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. पदोन्नती होण्याची दाट संभावना आहे. वरिष्ठच मदत करू शकतील. व्यापाऱ्यांच्या काही योजना की ज्यांच्या कडून त्यांनी खूप अपेक्षा बाळगल्या होत्या त्यात खोळंबा होण्याची संभावना असल्याने त्यांना मेहनत वाढवावी लागेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील समस्यांतून बाहेर पडण्यासाठी ईश्वर शरणी जाऊ शकतात. एखाद्या मंदिरात जाऊन थोडा वेळ घालविल्यास मानसिक शांतता लाभेल. विद्यार्थी एकाहून अधिक विषयांचा लक्षपूर्वक अभ्यास करतील, व त्याचा त्यांना चांगला फायदा होईल.

तूळ: हा आठवडा अनुकूल आहे. एखाद्या दूरवरच्या प्रवासास जाऊ शकाल. नोकरीत स्थिती मजबूत राहिली तरी आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागावे. वरिष्ठांशी समन्वय उत्तम असेल. वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. किरकोळ खर्च झाले तरी प्राप्ती चांगली झाल्याने काहीच त्रास होणार नाही. हा आठवडा व्यापारासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. ते जोडीदारासह दूरवरच्या प्रवासास जाऊ शकतील. विद्यार्थ्यांना कौशल्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी काही ऑनलाईन अभ्यासक्रम त्यांना मदत करू शकतील.

वृश्चिक: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. आठवड्याची सुरवात विशेष अनुकूल नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नये. घेतल्यास तो विरुद्ध जाऊ शकतो. धनहानी संभवते. खर्चात वाढ होईल. त्यामुळे प्राप्ती कमी असल्याची जाणीव होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहीतरी करून दाखविण्याचा आहे. व्यर्थ बडबड करण्या ऐवजी काम करून दाखवावे, ज्यामुळे चांगले फळ मिळू शकेल. व्यापाऱ्यांना कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. हे प्रवास एखादा प्रलंबित सौदा पूर्णत्वास नेऊ शकतील. त्यामुळे फायदा होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. असे केल्याने नात्यात पुन्हा एक ताजेपणा येऊन पुन्हा एकमेकांच्या जवळ याल. खूपच रोमँटिक व्हाल. विद्यार्थ्यांना काही नवीन विषयांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

धनु: हा आठवडा सामान्यच आहे. एखादा मोठा व्यापारी सौदा होण्याची संभावना आहे. विशेषतः एखाद्या महिलेद्वारा व्यापारात गुंतवणूक होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. कार्यालयात एखाद्याशी भांडण होण्याची शक्यता आहे, जे आपल्या बदलीस किंवा नोकरी बदलण्यास कारणीभूत ठरू शकेल. तेव्हा सावध राहावे. प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नात्यात रोमांसा व्यतिरिक्त आपुलकी राहील. एकमेकांच्या अधिक जवळ याल. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करून प्रगती करण्याची संधी मिळेल.

मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. खर्चात वाढ होईल. थोडा मानसिक ताण राहील. वैवाहिक जीवनात संतुलनाच्या अभावामुळे एकमेकांना समजून घेणे अवघड होईल. प्रेमिकेसह सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला असून ते व्यापारात काही नवीन प्रयोग करतील, ज्यात त्यांना फायदा सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्यांना थोडा त्रास होऊ शकतो, परंतु प्रलंबित असलेली पदोन्नती होऊ शकते. कामावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा सामान्य आहे. त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. बाहेरील तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

कुंभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव जाणवेल. कोणत्याही प्रकारच्या भांडणापासून दूर राहावे. दुसऱ्याच्या गोष्टीत ढवळाढवळ करू नये. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. परिश्रम यशस्वी होतील. पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. त्यांना त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळाल्याने ते खूपच खुश झाल्याचे दिसून येईल. असे असल्र तरी व्यावसायिक भागीदाराशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.

मीन: हा आठवडा चांगला आहे. कामात मजबुती असल्याचे दिसेल. त्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. व्यापारी व्यापारास मजबुती देण्यासाठी काही नवीन सौदे करतील. काही नवीन मार्गदर्शक तत्वे तयार करतील. त्याचा त्यांना चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष केंद्रित करून परिश्रम करावे लागतील. असे केल्याने त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतील. प्रकृतीत सुधारणा झाली तरी आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा पुन्हा त्रास होऊ शकतो. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल.