साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 09:16 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात शेवटच्या दिवशी शनिवारी रवि सिंह राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी हर्षल वृषभ राशीत, गुरू आणि शुक्र मिथुन राशीत, रवी आणि बुध कर्क राशीत, केतु सिंह राशीत, मंगळ कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ या राशींमधून राहील. या सप्ताहात मंगळवारी अंगारिका चतुर्थी, शुक्रवारी जन्माष्टमी, तर शनिवारी गोपालकाला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार पूर्ण काळ पंचक राहील. तर शुक्रवारी सकाळी ९.०६ वाजेपर्यंत पंचक राहील. 3 / 15तिसरा श्रावण सोमवार ११ ऑगस्ट रोजी असून, या दिवशी शिवामूठ मूग आहे. एकंदरीत ग्रहमान पाहता, आगामी आठवड्याचा कालावधी कोणत्या राशींना कसा असेल? कोणत्या राशींना उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतील? जाणून घेऊया...4 / 15मेष: ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल. प्रेमीजनांचे एखादे भांडण होण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात सढळहस्ते खर्च करून आर्थिक गुंतवणुकीचा विचार कराल. आर्थिक स्थिती उंचावून आर्थिक चिंतामुक्त व्हाल. दिखाऊपणासाठी पैसा खर्च कराल. व्यापाऱ्यांना व्यवसायात मनमानी करून चालणार नाही. अन्यथा एखादे नुकसान संभवते. अशा वेळी एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार मार्गक्रमण करणे हिताचे होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जबाबदारी इतरांवर सोपवून कामात चूक करू शकतात. त्यामुळे त्यांच्या समस्या वाढून ते त्रस्त होतील. काही कौटुंबिक कारणाने विद्यार्थ्यांचे मन अभ्यासा पासून विचलित होऊ शकते. परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा चांगला लाभ होईल.5 / 15वृषभ: हा आठवडा समस्याग्रस्त आहे. विवाहितांना वैवाहिक जोडीदाराशी विचारपूर्वक बोलावे लागेल. ह्या आठवड्यात आर्थिक स्थिती मजबूत राहील. पण, सतर्क राहावे लागेल. कोणत्याही योजनेत डोळेझाक गुंतवणूक करू नये. व्यापाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळणार असले तरी एखाद्या समस्येस सामोरे जावे लागू शकते. एखादा सौदा विलंबाने पूर्ण झाल्याने ते त्रासून जातील. नोकरी करणाऱ्यांच्या जवाबदारीत वाढ होईल. त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांना प्रवास सुद्धा करावे लागू शकतात.6 / 15मिथुन: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. ह्या आठवड्यात विवाहितांना जोडीदारास समजून घ्यावे लागेल. प्रेमीजन प्रसन्न राहतील. ह्या आठवड्यात कोणतीही आर्थिक चिंता सतावणार नाही. प्राप्तीत वाढ होईल. मनसोक्त खर्च करू शकाल. त्याचबरोबर आर्थिक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित कराल. ह्या आठवड्यात व्यापारी त्यांच्या कामाच्या बाबतीत सावध राहतील. जर घाईघाईत एखादा निर्णय घेतला तर त्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्यांना एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती तर होईलच, शिवाय एखाद्या दुसऱ्या नोकरीची ऑफर मिळू शकते. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. इतर कोणत्याही कामाकडे ते लक्ष देणार नाहीत. ह्या दरम्यान एखाद्या नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो.7 / 15कर्क: हा आठवडा आनंददायी आहे. प्रेमीजन प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत करतील. ह्या आठवड्यात आर्थिक बाबतीत कोणावरही डोळेझाक विश्वास ठेवू नये. एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून दगा-फटका होण्याची संभावना आहे. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांचे ह्या आठवड्यात नुकसान होण्याची संभावना आहे. कोणाशी भागीदारी करावयाची असेल तर त्याची नीट चौकशी करावी. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांना खुश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी त्यांना कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. असे केल्यानेच ते वरिष्ठांना खुश करू शकतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना जर एखादी परीक्षा द्यावयाची असेल तर त्यांना आपली उत्कृष्ट कामगिरी करून दाखवावी लागेल. कोणताही तणाव असल्यास त्याचा परिणाम आपल्या कामगिरीवर होऊ देऊ नये. असे केल्यासच आपणास यश प्राप्त होऊ शकते. 8 / 15सिंह: हा आठवडा काहीसा गोंधळाचा आहे. विवाहितांना वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच कोणतीही जुनी गोष्ट उकरून काढू नये. ह्या आठवड्यात आर्थिक योजना विचारपूर्वक करावी लागेल. एखाद्या प्रॉपर्टीत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केलीत तर ती हितावह ठरेल. ह्या आठवड्यात कोणालाही उसने पैसे देऊ नये. व्यापारी योजनांसह इतर कामांवर लक्ष केंद्रित करतील. काही नवीन लोकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामगिरीने आनंद होईल. ज्या व्यक्ती शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना ह्या आठवड्यात खुशखबर मिळेल. असे असले तरी त्यांनी मेहनतीत कोणतीही कसूर ठेवू नये. 9 / 15कन्या: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. कुटुंबियांना जास्त महत्व दिल्याने वैवाहिक जीवनातील समस्या वाढतील. दुरावा येण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात खर्चाचा ताळमेळ ठेवावा लागेल. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च केलेत तर ते हितावह होईल. रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती भरपूर पैसा कमावू शकतील. व्यापारी जर एखादा सौदा करू शकले तर त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत होण्यास मदत होईल. नोकरी करणाऱ्यांचे जीवन काहीसे संघर्षमय राहील. त्यांना मेहनीतच्या प्रमाणात अपेक्षित यश न मिळाल्याने थोडे नैराश्य येऊ शकते. असे असले तरी त्यांनी नोकरीत बदल करण्याचा विचार करू नये. विद्यार्थ्यांनी मेहनत चालूच ठेवावी, त्यामुळे त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील. एखादे नवीन संशोधन करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. जर त्यात अपेक्षित यश मिळाले नाही तर घाबरून जाऊ नका. 10 / 15तूळ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. विवाहितांना नाते सांभाळून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. वैवाहिक जोडीदारास एखादी नवीन नोकरी लागू शकते. काही आवश्यक वस्तूंसाठी खर्च करावा लागेल, ज्यामुळे समस्येस सामोरे जावे लागू शकते. अर्थात खर्चाच्या जोडीने प्राप्ती वाढेल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करणे हितावह होईल. व्यापाऱ्यांनी जबाबदारीत थोडा सैलपणा ठेवला तर त्यांच्या व्यवसायात काहीसे नुकसान होऊ शकते. त्यांच्या काही नवीन ओळखी होतील. ते व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करतील. कोणतीही मोठी जोखीम घेऊ नये. नोकरी करणाऱ्यांच्या कामात थोडी गडबड होऊ शकते. त्यासाठी त्यांना वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. त्यांनी जबाबदारी इतरांवर सोपवू नये. विद्यार्थी एखाद्या स्पर्धेची तयारी करण्यात व्यस्त राहतील. एखाद्या संशोधनासाठी ते योजना तयार करू शकतात. 11 / 15वृश्चिक: हा आठवडा विचारपूर्वक काम करण्याचा आहे. प्रेमीजनांनी प्रेमिकेवर डोळेझाक भरंवसा केल्यास ते नुकसानदायी होऊ शकते. कोणतेही काम घाई गडबडीत करू नये. विवाहित व्यक्ती त्यांच्या जीवनातील समस्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक योजना विचारपूर्वक तयार करावी लागेल. गुंतवणुकीसंबंधी कोणी एखादी योजना दाखविली तरी त्यात विचारपूर्वक गुंतवणूक करावी. नोकरी करणाऱ्या व्यक्तींवर कामाचे आधिक्य असल्याने ते त्रासून जातील. त्यामुळे ते नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात. व्यवसायात प्रलंबित कामे पूर्ण करावी लागतील. योजनांवर लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून व्यवसाय उंचावू शकेल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. असे असून त्यांचे मित्र लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे पुढे होणाऱ्या परीक्षेत समस्येस सामोरे जावे लागू शकते. 12 / 15धनु: हा आठवडा उत्तम फलदायी आहे. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना प्रेमिकेसाठी वेळ काढावा लागेल. विवाहित यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश राहतील. जोडीदाराच्या नोकरीशी संबंधित खुशखबर मिळण्याची संभावना आहे. आर्थिक नियोजन करावे लागेल. चुकीच्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केलीत तर मोठे नुकसान सोसावे लागू शकते. व्यापारी व्यापार उंचावण्यात यशस्वी होतील. त्यासाठी त्यांना काही नवीन लोकांशी संपर्क वाढवावे लागतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना चांगल्या पगारवाढीसह पदोन्नती मिळाल्याने ते खुश राहतील. काही कारणाने विद्यार्थी तणावात राहतील. त्यांना ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा होता त्यात तो मिळू शकेल.13 / 15मकर: हा आठवडा चांगला आहे. प्रेमीजनांना नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विवाहितांना जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल, जेणेकरून दोघात समन्वय साधला जाऊ शकेल. त्यामुळे दोघात जर काही वाद असला तर तो एकत्र बसून सहजपणे दूर करता येऊ शकेल. आर्थिक बाबतीत सावध राहावे लागेल. फुटकळ खर्च वाढतील, ज्यामुळे त्रासून जाल. असे होऊ नये म्हणून आर्थिक गुंतवणूक योग्य नियोजन करून करावे. काही खर्च अचानकपणे करावे लागू शकतात. व्यापाऱ्यांना एखाद्या कामाच्या बाबतीत काही शंका असल्यास ते काम त्यांनी करू नये. अन्यथा त्यांना मोठे नुकसान सोसावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. ही कामे त्यांनी जर इतरांवर सोपविली तर ते अडचणीत सापडू शकतात. विद्यार्थी जर एखाद्या स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांनी सोशल मीडियापासून दूर राहावे. मित्रांच्या सहवासात वेळ दवडू नये. अन्यथा नंतर त्यांच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते. 14 / 15कुंभ: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येणारा आहे. प्रेमीजन प्रेमिकेशी असलेले नाते दृढ करण्याचा प्रयत्न करतील. वैवाहिक जीवन दृढ करण्याचा प्रयत्न करावा. कोणावर जास्त विश्वास ठेवू नये. प्राप्तीत वाढ होणार आहे. अनोळखी लोकांपासून सावध राहावे लागेल. कोणाच्या सांगण्यावरून आर्थिक गुंतवणूक करू नये, अन्यथा नुकसान संभवते. नोकरी करणाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून नोकरीत बदल करू नये. विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. अन्यथा समस्या निर्माण होऊ शकते. व्यापारी व्यवसायात प्रगती साधण्यासाठी काही नवीन लोकांशी संपर्क वाढवतील, जे त्यांच्या हिताचेच असेल. त्यामुळे त्यांना व्यवसायात चांगला लाभ मिळण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांनी एकाग्रता भंग पावणार नाही ह्याची दक्षता घेऊन मेहनत करावी. मेहनतीचा चांगला लाभ त्यांना होऊ शकेल. 15 / 15मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजन त्यांचा उत्तम समन्वय साधला जाईल. विवाहितांना नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादे भांडण त्यांच्या नात्यातील तणाव वाढविण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करण्याची योजना आपणास आखावी लागेल. अशी गुंतवणूक जर एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यानुसार केलीत तर आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या योजनांचा चांगला लाभ मिळेल. काही नवीन लोकांमुळे व्यवसायात लाभ होऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांची त्यांच्या कामगिरीमुळे वेगळी ओळख निर्माण होईल. कामे मन लावून करतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे यथोचित फळ मिळेल.