साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 10:42 IST
1 / 15Weekly Horoscope: या सप्ताहात शेवटच्या दिवशी शनिवारी मंगळ तूळ राशीत प्रवेश करेल. अन्य कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी- हर्षल वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शुक्र कर्क राशीत आहेत. रवि, बुध आणि केतु सिंह राशीत आहे. मंगळ कन्या राशीत असून, शनिवारी तो तूळ राशीत जाईल. प्लूटो मकर राशीत, राहु कुंभ राशीत, तर शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत.2 / 15चंद्राचे भ्रमण कुंभ, मीन, मेष आणि वृषभ राशींमधून राहील. या सप्ताहात रविवारी खग्रास चंद्रग्रहण आहे. सोमवारपासून पितृ पंधरवडा सुरू होत आहे. रविवार, सोमवार, मंगळवार या तिन्ही दिवशी पंचक आहे. बुधवारी दुपारी ४.०३ पर्यंत पंचक राहील. 3 / 15सोमवारी ग्रहणाची कर, बुधवारी संकष्टी चतुर्थी, गुरुवारी भरणी श्राद्ध आहे. एकूण ग्रहमान पाहता हा आगामी आठवडा अनेक राशींना तापदायक तर काही राशींना उत्तम, अनुकूल, सकारात्मक ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमची रास कोणती? तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया... 4 / 15मेष: हा आठवडा मिश्र फळे देणारा आहे. वैवाहिक जीवनात नाते दृढ करण्याच्या प्रयत्नात राहाल. त्यासाठी जोडीदाराचे म्हणणे समजून घ्याल. आर्थिक बाबीत आपणास सतर्क राहावे लागेल. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. एखादी नवीन खरेदी करण्यापूर्वी कुटुंबियांशी चर्चा करावी. हा आठवडा कारकिर्दीत लाभ देणारा आहे. थोडी जास्त मेहनत कराल, व त्यामुळे सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांची एकाग्रता न झाल्याने त्यांना अभ्यासाचे टेन्शन राहील. अशा वेळी घरापासून दूर जाऊन अभ्यास केला तर ते हितावह होऊ शकेल.5 / 15वृषभ: ह्या आठवड्यात सावध राहावे लागेल. वैवाहिक जीवनात थोडी कटुता येण्याची संभावना असल्याने वाणीवर नियंत्रण ठेवावे. ह्या आठवड्यात प्राप्तीत वृद्धी झाल्याने खुश व्हाल. परंतु, खर्चांवर नियंत्रण ठेवावेच लागेल. आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करणे हिताचे होईल. कारकिर्दीवर लक्ष ठेवावे लागेल. एखाद्या कामगिरीमुळे त्रास होण्याची संभावना आहे. काही नवीन लोकांत मिळून-मिसळून राहिल्यास कारकिर्दीत सुधारणा होऊ शकते. इतर प्रवृत्तींना महत्व दिल्याने अभ्यासाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होऊ शकते, जे त्यांच्या यशाच्या आड येण्यास कारणीभूत ठरेल. त्यांना एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्याची तयारी करण्यासाठी घरापासून दूर जाणे त्यांच्यासाठी हितावह ठरेल. 6 / 15मिथुन: हा आठवडा सकारात्मक फळे देणारा आहे. वैवाहिक जीवनात सामंजस्य दाखवावे लागेल, अन्यथा दोघात दुरावा येण्याची संभावना आहे. ह्या आठवड्यात भरपूर पैसा येईल. जर कोणाला वचन दिले असल्यास ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. भविष्यासाठी काही आर्थिक गुंतवणूक करावी लागेल. व्यापाऱ्यांना खोळंबलेल्या योजनांतून चांगला लाभ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अन्यथा वरिष्ठांशी संबंधात कटुता येऊ शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थी अभ्यासामुळे त्रासून जातील. ते आपले मित्र व हिंडण्या - फिरण्यावर नियंत्रण ठेवू शकतात. नोकरीच्या तयारीसाठी वेळ काढावा लागेल. 7 / 15कर्क: हा आठवडा तणावग्रस्त आहे. वैवाहिक जीवनातील समस्याने आपण त्रासून जाल. जोडीदाराच्या सहवासात वेळ घालविण्याचा प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात चांगली प्राप्ती होईल. मौजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. कुटुंबियांच्या गरजांकडे लक्ष द्याल. ह्या आठवड्यात एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतला तर तो हितावह ठरेल. कारकिर्दीत नुकसान होण्याची संभावना असल्याने सतर्क राहावे लागेल. व्यापारात भागीदारी करू नये. विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत करतील. अभ्यासात एखादी समस्या असली तर ती गुरुजनांच्या मदतीने दूर करण्याचा प्रयत्न ते करतील. एखाद्या स्पर्धेत यशस्वी होण्याची संभावना आहे. एखाद्या टेन्शनमुळे त्रस्त व्हाल.8 / 15सिंह: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. सामंजस्य दाखवावे लागेल. वैवाहिक जीवन सुखद होईल. ह्या आठवड्यात प्राप्तीचे स्रोत वाढणार असल्याने कोणत्याही प्रकारे पैशांची काळजी करावी लागणार नाही. प्रलंबित कामे होण्याची संभावना सुद्धा आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क राहावे. हा आठवडा कारकिर्दीच्या दृष्टीने चांगला आहे. ह्या आठवड्यात अपेक्षित यश प्राप्त होईल. व्यापारी योजनेतून चांगला लाभ मिळवू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पदोन्नती संभवते. विद्यार्थी इतर प्रवृतींवर जास्त लक्ष घालतील. त्यांनी अभ्यासाकडे लक्ष दिले नाही तर त्यांना परीक्षेस परत बसावे लागू शकते. तेव्हा त्यांनी अति आत्मविश्वासात राहू नये. 9 / 15कन्या: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात एखाद्या गैरसमजामुळे तणाव वाढेल. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. ह्या दरम्यान एखाद्या व्यक्तीकडून दगा-फटका होण्याची संभावना असल्याने कोणालाही उसने पैसे देऊ नये. हा आठवडा महिलांशी संबधित वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला आहे. त्यांना मोठ्या ऑर्डर्स मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मेहनतीने एक चांगला पडाव गाठू शकतील. त्यामुळे त्यांची पदोन्नती होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा समस्याग्रस्त आहे. ह्या दरम्यान ते एखादा विषय किंवा अभ्यासक्रम बदलण्याचा विचार करू शकतील. त्यांनी आपले ज्ञान वाढविण्याची मिळालेली संधी हातून जाऊ देऊ नये.10 / 15तूळ: ह्या आठवड्यात विचारपूर्वक वाटचाल करावी लागेल. काही कौटुंबिक समस्येने विवाहितांचे जीवन प्रभावित होईल. ह्या आठवड्यात आर्थिक समस्येने त्रासून जाल. धन प्राप्तीचे मार्ग आखडून जातील. आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन खर्च करावेत. ह्या दरम्यान कोणाला पैशासंबंधी वचन देऊ नये. व्यापाऱ्यांनी कोणतेही काम घाईघाईत करू नये. अन्यथा त्यात गडबड होऊ शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी नोकरी बदलण्याचा विचार करू नये. अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांनी इतर प्रवृतीं ऐवजी अभ्यासास प्राधान्य दिल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडू शकेल. हा आठवडा उच्च शिक्षणास अनुकूल आहे. कामाबरोबरच विश्रांतीसाठी वेळ काढावा. सकाळी फिरावयास जाणे तसेच थोडा व्यायाम करणे हितावह होईल.11 / 15वृश्चिक: हा आठवडा समस्याग्रस्त आहे. प्रेमात धोका मिळाल्यामुळे त्रस्त व्हाल. विवाहित व्यक्तींनी जोडीदारास वेळ न दिल्याने वैवाहिक जीवनात निष्कारण समस्या वाढू शकतात. खर्चात वाढ झाल्याने त्रासून जाल. एखाद्या ठिकाणाहून पैसे येणे असले तर त्यात विलंब होईल. कारकिर्द उसळी घेत असल्याचे दिसून येईल. काही सरकारी आस्थापनातून लाभ होऊ शकतो. व्यापारी व्यवसायानिमित्त नवीन लोकांशी ओळखी वाढवतील. नोकरी करणाऱ्यांनी निष्कारण वाद-विवादात सहभागी होऊ नये. अन्यथा समस्या वाढण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावे लागल्याने त्यांची एकाग्रता भंग पावेल. ते मित्रांच्या सहवासात काही सुखद क्षण घालवतील.12 / 15धनु: हा आठवडा सकारात्मक परिणाम घेऊन येत आहे. विवाहितांनी जोडीदारास वेळ न दिल्याने ते समस्या ओढवून घेऊ शकतात. तणावग्रस्त राहाल. ह्या आठवड्यात प्राप्तीचे स्रोत वाढल्याने आर्थिक समस्या दूर होतील. थकबाकी मिळण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. दुसरी चांगली नोकरी मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. त्यांचा एखादा प्रलंबित सौदा पूर्णत्वास जाऊ शकेल. एखाद्या कामामुळे अति उत्साहित झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्यांनी अभ्यासाप्रती सजग राहावे. हा आठवडा उच्च शिक्षणासाठी अनुकूल आहे.13 / 15मकर: हा आठवडा सामान्य फलदायी आहे. विवाहितांच्या जीवनात नात्यातील समस्या वाढण्यास त्यांच्यातील दुरावा कारणीभूत ठरेल. विचारपूर्वक खर्च करावा लागेल. एखादी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे हितावह होईल. हा आठवडा कारकिर्दीसाठी काहीसा प्रतिकूल आहे. व्यापारात चढ-उतार येतील, जे आर्थिक स्थिती कमकुवत करतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी अंतर्गत राजकारणापासून दूर राहावे. कामात घाई करू नये. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. एखाद्या अभ्यासक्रमात सुद्धा त्यांना सहजपणे प्रवेश मिळू शकेल. तसेच ते यशाची पायरी चढू शकतील. आपण जर नोकरीसाठी एखादी परीक्षा दिली असली तर त्याचे परिणाम येण्याची शक्यता आहे. 14 / 15कुंभ: हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. दीर्घ काळापासून आपल्या वैवाहिक जीवनात काही समस्या आल्या असतील तर त्या आता दूर होतील. वाढीव खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार कराल. व्यापारी व्यवसायात एखादी नवीन योजना घेऊन येतील. त्यांना ह्या आठवड्यात मोठी जोखीम न घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नोकरी करणाऱ्यांनी खूपच विचारपूर्वक एखाद्याशी वार्तालाप करावा, अन्यथा प्रगतीच्या आड एखादी गोष्ट येऊ शकते. विद्यार्थी अभ्यासाविषयी सतर्क राहतील. त्यांचा अति आत्मविश्वास त्यांना त्रासदायी ठरू शकेल. 15 / 15मीन: ह्या आठवड्यात कोणत्याही वादात सहभागी होऊ नये. ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीने त्रासून जाल. विवाहितांच्या जीवनात काही गैरसमज होऊ शकतात, जे त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ह्या आठवड्यात हौस-मौजेच्या वस्तूंची खरेदी करण्यात पैसे खर्च करण्याऐवजी बचत करण्यावर भर द्यावा. दीर्घ काळासाठी एखादी आर्थिक गुंतवणूक केलीत तर ती लाभदायी ठरेल. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष ठेवावे लागेल. कारकिर्दीत मेहनत वाढवावी लागेल. असे केल्यासच स्थगित झालेली कामे व एखादा मोठा सौदा पूर्णत्वास जाऊ शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या आवडीचे काम मिळाल्याने ते खुश होतील. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहतील. ते एखादा अभ्यासक्रम करण्याची योजना तयार करू शकतील. कोणालाही महत्त्वाच्या गोष्टींविषयी सांगू नका. ह्या आठवड्यात मेहनतीवर लक्ष द्यावे लागेल. अन्यथा एखादी लहान समस्या मोठे रूप धारण करू शकेल.