Vastu Tips: घरसजावटीसाठी फोटो फ्रेम निवडताना टाळा 'या' चुका; अन्यथा होईल आर्थिक नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:24 IST
1 / 6वास्तुशास्त्र आपल्या परिचयाचे, अभ्यासाचे नसेलही, परंतु चित्र निवड करताना त्याच्या पडसादाचा सामान्य विचार, तर्क आपल्याला नक्कीच करता येईल. म्हणून युद्धाचे, प्रसंग, वाळवंट, गरिबी, काटेरी झुडपं, जंगली श्वापदे यांची चित्र ठेवू नयेत. तसेच निसर्ग चित्रांचीही तार्किक बाजू लक्षात घेऊन निवड करावी. 2 / 6त्याचप्रमाणे झरा, धबधबा, समुद्र, नदी हे देखावे निसर्गात जाऊन पाहणे जितके सुखावह ठरतात, तेवढे घरातल्या चार भिंतींच्या तसबिरीत आकर्षक वाटत नाहीत. त्यातही वास्तुशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर त्याचे वाईट परिणाम लक्षात येतात. 3 / 6कारंजे किंवा धबधब्याचे चित्र दिसायला सुंदर असते, परंतु असे मानले जाते की जसे पाणी वाहते तसेच आपले पैसे व्यर्थ कामांमध्ये खर्च होऊ शकतात. पैसा पाण्यासारखा वाहत जातो. 4 / 6जलप्रपात किंवा कारंजेचे चित्र वास्तु शास्त्रज्ञांना विचारल्यानंतरच लावावे. ईशान्येकडील कोन निश्चित करण्यासाठी असे चित्र बर्याचदा वापरले जाते, परंतु अन्य कोठे हे चित्र लावताना सल्ला जरूर घ्यावा. 5 / 6काही लोक मत्स्यालय ठेवतात किंवा त्या जागी माशाचे चित्र लावतात. परंतु तेही उचित जागेवर नसेल तर त्याचे अपाय आपल्या वास्तूवर पडतात. म्हणून कोणतीही गोष्ट घेताना ती केवळ शोभेची म्हणून वापरू नका, तर त्याचे घरावर, आरोग्यावर काय पडसाद पडतील, याची माहिती करून घ्या आणि मगच लावा. 6 / 6घरात सूर्योदयाची, नैसर्गिक देखाव्याची, फुलपाखरांची, पक्षी, प्राण्यांची, लहान मुलांची, देवांची फोटो फ्रेम लावली असता घरात प्रसन्नता कायम राहते. शिवाय अशा फ्रेममुळे कोणतेही वास्तुदोष तसेच मानासिक दोष उद्भवत नाहीत, त्यामुळे आर्थिक नुकसानही संभवत नाही.