शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: 'या' सात वस्तू प्रत्येक श्रीमंत घरात हमखास सापडणारच; तुम्हीही घरी आणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:37 IST

1 / 8
वास्तुशास्त्रानुसार निवडक विशिष्ट वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा होते. म्हणून वास्तू तज्ज्ञ या मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला देतात. या मूर्ती घरात ठेवल्याने नोकरी, व्यवसायात प्रगती होते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रीमंतांच्या घरात डोकावलात तर या वस्तू तुम्हाला त्यांच्या घरी निश्चितपणे आढळतील. चला तर त्या सात वस्तू कोणत्या ते जाणून घेऊया आणि त्या घरी आणून वास्तूची भरभराट करूया!
2 / 8
हत्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. असे मानले जाते की घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि तुमचे उत्पन्न वाढते. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतिक देखील मानले जाते, त्यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवा.
3 / 8
भगवान विष्णूचा दुसरा अवतार कूर्म अवतार होता. त्याचे प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणे शुभ मानले जाते. भगवान विष्णूंचा निवास जेथे असेल तेथे लक्ष्मीचाही निवास असेल हे उघड आहे. लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात कोणत्याही धातूपासून बनवलेले कासव ठेवले जाते. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते.
4 / 8
पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी!
5 / 8
घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच, जर स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टल किंवा धातूचा पिरॅमिड ठेवावा. यामुळे तुमचे घर घेण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. घरात क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते.
6 / 8
करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्कीच ठेवतात. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. असे म्हणतात की घुबडांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो, म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती ठेवतात. यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढते आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधीही मिळते.
7 / 8
श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेत गणपतीची मूर्ती ठेवलेली दिसेल. यामागील कारण म्हणजे गणपती सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणून पूजनीय आहे. त्याच्या मंगलमय अस्तित्त्वाने बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. आणि त्याच्या उपस्थितीने प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते.
8 / 8
श्रीमंत लोकांच्या घरात लक्ष्मीची मूर्ती असते. मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघराजवळ ठेवली जाते. तिची नित्यनेमाने पूजा केली जाते. ज्यांना ही मूर्ती घेणे शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरी मोठा लाभ होतो.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजनHome Decorationगृह सजावट