शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:14 IST
1 / 13नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह आताच्या घडीला मीन राशीत आहे. शनि मीन राशीत वक्री असून, नोव्हेंबर महिन्यात शनि मार्गी होणार आहे. शनि सुमारे १३८ दिवस वक्री असणार आहे. शनिचे मीन राशीतील गोचर अनेक शुभ योग निर्माण करत आहे.2 / 13शनिचा विपरीत राजयोग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच गुरु आणि शनिचा शतांक योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय शनि मंगळ अरुण यांचाही योग जुळून येत आहे, असे म्हटले जात आहे. शनि गोचरामुळे जुळून आलेल्या योगांचा अनेक राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. 3 / 13शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. असे असले तरी काही शुभ फले शनिची मिळू शकतात. या राशींसह अन्य कोणत्या राशींना शनिकृपा लाभू शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...4 / 13मेष: शनि वक्री असल्याचे प्रतिकूल परिणाम कमी होऊ शकतात. अनेक क्षेत्रात यश मिळू शकते. जीवनातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या हळूहळू संपू लागतील. अनावश्यक खर्च कमी करण्यात यशस्वी होऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. जुने कौटुंबिक मतभेद दूर होण्याची शक्यता आहे. कामात किंवा परदेशांशी संबंधित संधींमध्ये लाभ मिळू शकतात. जीवनात नकारात्मकता कमी होईल. मानसिक शांतता लाभू शकेल.5 / 13वृषभ: विशेषतः सकारात्मक परिणाम मिळतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाशी जुने मतभेद संपू शकतात. अनेक क्षेत्रात यश मिळेल. बऱ्याच काळापासून अडकलेल्या कामांना गती मिळू शकते. गुंतवणूक चांगले फायदे देऊ शकते. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, ज्यामुळे अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळण्याची अपेक्षा आहे. समाजात प्रतिष्ठा आणि आदर वाढेल.6 / 13मिथुन: काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळेल. संधीचे सोने करणे हिताचे ठरू शकेल. वडिलोपार्जित व्यवसायात चांगला नफा कमवू शकता. कौटुंबिक संबंध चांगले राहू शकतील. दीर्घकाळ प्रलंबित कामे आता पूर्ण होऊ शकतात. कामाचे कौतुक होईल. पगार वाढण्याचीही दाट शक्यता आहे.7 / 13सिंह: विपरीत राजयोग अनेक क्षेत्रात लाभ मिळवून देऊ शकतो. दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षातून मुक्तता मिळू शकते. वक्री शनि सर्वोच्च, सर्वोत्तम यश देऊ शकेल. विविध क्षेत्रात प्रगती होऊ शकेल. यशाचा मार्ग मोकळा होऊ शकेल. नोकरी आणि व्यवसायात उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे.8 / 13तूळ: वक्री शनि सकारात्मकता देऊ शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल, नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. लांब पल्ल्याचे प्रवास फायदेशीर ठरू शकतील. नियोजित योजना यशस्वी होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकाल. 9 / 13वृश्चिक: शनि योग लाभदायक ठरू शकतील. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात खूप फायदे मिळू शकतात. भावंडांशी चांगले संबंध निर्माण होतील. एकत्र खूप चांगला वेळ घालवू शकाल. बऱ्याच काळापासून थांबलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. नवीन मित्र बनवाल. नोकरी करणाऱ्या लोकांनाही खूप फायदे मिळू शकतात. मन शांत राहील. मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकेल.10 / 13मकर: शनि योग फलदायी ठरू शकतील. बऱ्याच काळापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. समस्यांतून दिलासा मिळू शकेल. व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळण्याची चिन्हे आहेत. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. मुलांसोबत सुरू असलेले मतभेद दूर होऊ शकतात. संबंध सुधारतील. एकंदरीत, हा काळ यश, प्रगतीचा ठरू शकतो.11 / 13कुंभ: शनि या राशीचा स्वामी आहे. विविध क्षेत्रांत लाभ मिळू शकेल. धनलाभाचे योग आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरू शकतो. परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. परदेशी व्यापारातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. संवाद कौशल्य अधिक प्रभावी होऊ शकेल.12 / 13मीन: नकारात्मक परिणामांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कष्ट वाया जाणार नाहीत. कामाचे योग्य आणि सकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यवसाय, संपत्ती, नोकरी, कुटुंब आणि मुलांच्या शिक्षणाशी संबंधित क्षेत्रात लाभ, नफ्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. जे निर्णय घेऊ शकला नाहीत, ते आता धैर्याने आणि आत्मविश्वासाने घेऊ शकाल. व्यक्तिमत्त्वात दृढता, स्थिरता आणि आत्मविश्वास वाढेल. सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमातून परदेशांशी संबंधित व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ संतुलन, नफा आणि स्पष्टता घेऊन येणारा ठरू शकेल.13 / 13- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.