शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 14:25 IST

1 / 12
जून महिन्यात अनेक शुभ योग जुळून येत आहेत. सूर्य, बुध आणि शुक्र यांच्या राशीपरिवर्तनामुळे दोन राजयोग जुळून येत आहेत. शुक्र स्वराशीतून म्हणजेच वृषभ राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या मिथुन राशीत विराजमान झाला आहे. तर, १४ जून रोजी नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश केला आहे.
2 / 12
सूर्य, बुध आणि शुक्र या तीन ग्रहांच्या मिथुन राशीतील प्रवेशाने त्रिग्रही योग जुळून आला आहे. तसेच या तीन ग्रहांच्या संयोगाने बुधादित्य, शुक्रादित्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग जुळून येत आहेत. हे राजयोग अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहेत.
3 / 12
आगामी काही काळासाठी हे राजयोग असणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस यातील काही राजयोगांची सांगता होणार आहे. या राजयोगांमुळे काही राशींना उत्तम लाभ, फायदा, नफा, यश, प्रगती तसेच सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
वृषभ: विविध संधी मिळू शकतात. करिअरमध्ये पालकांचे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईकांशीही मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित कराल. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला राहील. व्यवसायात प्रेरणा मिळू शकेल. जमीन किंवा मालमत्तेतून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खूप उत्तेजित होऊन भान हरवणार नाही याची काळजी घ्यावी.
5 / 12
मिथुन: नियोजित योजना यशस्वी होऊ शकतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. अविवाहित लोकांना चांगली स्थळे येऊ शकतात.
6 / 12
कर्क: वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वीरित्या समतोल साधू शकाल. बरेच सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मालमत्ता खरेदी करण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक जीवन खूप चांगले राहील. अनेक चांगल्या संधी मिळतील. जे लोक नोकरी किंवा करिअर बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी काळ चांगला आहे.
7 / 12
सिंह: उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरदारांना मेहनतीचे शुभ फळ मिळू शकेल. आयात-निर्यातीशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ लाभदायक राहील. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजार आणि लॉटरीमधून पैसे मिळू शकतील.
8 / 12
कन्या: करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. सरकारी कामात यशासोबत काही चांगली बातमी मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढू शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. अधिक पैसे कमवू शकता. बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात.
9 / 12
तूळ: वेळोवेळी नशिबाची साथ मिळेल. नोकरीत आर्थिक लाभ होऊ शकतील. समाधान वाटेल. कोणतेही काम करा. कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. देश-विदेशात प्रवास करू शकता, जे शुभ ठरू शकेल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
10 / 12
धनु: मुलांकडून काही आनंदाची बातमी मिळू शकेल. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. शैक्षणिक क्षेत्रातही लाभ मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
11 / 12
कुंभ: विविध क्षेत्रात यश मिळू शकेल. मानसिक स्थिती चांगली राहू शकते. करिअरमध्ये काही चढ-उतार येऊ शकतात. पण मेहनतीचे फळ मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. नात्यात लाभ मिळण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण राहील.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य