८ राशींना वृश्चिक संक्रांतीने सुबत्ता, १ उपायाने भरपूर भरभराट; सरकारी लाभ, परदेशातून फायदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 07:07 IST
1 / 15नवग्रहात सूर्याला अतिशय महत्त्व आहे. सूर्याला नवग्रहांचा राजा मानले जाते. सर्व बारा राशींमध्ये सूर्य वर्षभर भ्रमण करत असतो. प्रत्येक राशीत सूर्य साधारण एक महिना असतो. ज्या राशीत सूर्याचे संक्रमण असते, त्या राशीला संक्रांती म्हटले जाते. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सूर्याने तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.2 / 15सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश विशेष मानला जात आहे. आताच्या घडीला वृश्चिक राशीत मंगळ आणि बुध आहे. त्यामुळे दोन राजयोगांची निर्मिती होत आहे. बुधादित्य आणि आदित्य मंगल हे दोन राजयोग अतिशय शुभ मानले जातात. तसेच वृश्चिक राशीत त्रिग्रही योगही जुळून आलेला आहे. 3 / 15पुढील सुमारे महिनाभराचा काळ वृश्चिक संक्रांती म्हणून ओळखला जाईल. या कालावधीत एक उपाय करणे लाभदायक ठरू शकते. हा उपाय घरगुती आणि अतिशय सोपा असाच आहे. वृश्चिक संक्रांती, वृश्चिक राशीतील दोन राजयोग आणि त्रिग्रही योग यांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...4 / 15मेष: सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश मिश्र परिणाम देणारा ठरेल. या काळात वैयक्तिक जीवनात तसेच आर्थिक बाबींमध्ये काही आव्हाने येऊ शकतात. जीवनसाथीशी गैरसमज टाळा आणि वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. नात्यांमध्ये समन्वय राखणे आवश्यक असेल. या काळात खर्च वाढू शकतात. व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून अचानक लाभ होऊ शकतो. मुलांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या भविष्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. उपाय: सूर्याष्टकाचे पठण करणे लाभदायक ठरेल.5 / 15वृषभ: सूर्याचे वृश्चिक राशीतील गोचर आव्हानात्मक ठरू शकते. या काळात गृहस्थ जीवनात ताणतणाव संभवतो. कुटुंबीयांसह प्रवास होऊ शकतो. मुलांच्या आरोग्याची काळजी वाटू शकते, मात्र लोकांशी संबंध चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा आधार मिळेल, पण व्यावसायिक भागीदारांसोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चही वाढतील, त्यामुळे सतर्क राहा. उपाय: दररोज गायत्री मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.6 / 15मिथुन: सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश शुभ ठरेल. आत्मविश्वास वाढेल. भाग्य साथ देईल. केलेल्या कार्यात यश मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल असेल. व्यापाऱ्यांसाठीही हा काळ चांगला असेल. वैयक्तिक जीवन आनंदी राहील, शत्रू दुर्बल होतील, परदेशातून लाभ मिळेल. नाती अधिक मजबूत होतील. उपाय: आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरेल.7 / 15कर्क: सूर्याचे वृश्चिक राशीतील गोचर सकारात्मक राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंददायक राहील. परस्पर समज वाढेल. मात्र, वाणीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होईल, नवीन नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील, तरी खर्च वाढतील. उपाय: भगवान शिवाची पूजा करणे शुभ फलदायी ठरेल.8 / 15सिंह: सूर्याचे वृश्चिक राशीतील गोचर अत्यंत अनुकूल ठरेल. नातेसंबंध सुधारतील. जीवनसाथीशी सुसंवाद राहील. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल, बचतही शक्य होईल. मात्र, जमीन-जुमल्याच्या कामात घाई करू नका. उपाय: गायींना हिरवा चारा खाऊ घालणे शुभ ठरेल.9 / 15कन्या: सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथीशी गैरसमजांमुळे ताण येऊ शकतो. वर्तनात संयम ठेवा. जीवनशैलीत बदल होतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. अचानक खर्च संभवतात. व्यवसायात योग्य नियोजन करून पुढे जा. नोकरीत बदलाची शक्यता आहे. उपाय: दररोज कुमकुममिश्रित जलाने सूर्यदेवाला अर्घ्य द्या.10 / 15तूळ: सूर्याचे वृश्चिक राशीत गोचर लाभदायक ठरेल. मात्र मनात बेचैनी निर्माण होऊ शकते. जीवनसाथीशी गैरसमज टाळा आणि विश्वास ठेवा. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत राहील. करिअरच्या दृष्टीने वेळ अनुकूल आहे. प्रवासातून लाभ मिळेल. धनप्राप्ती होईल, पण खर्चही वाढतील. व्यवसायात शहाणपणाने निर्णय घ्या. उपाय: सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.11 / 15वृश्चिक: सूर्यदेवाने याच राशीत प्रवेश केला आहे. पुढील सुमारे महिनाभर सूर्य याच राशीत असेल. नातेसंबंध चांगले राहतील, प्रेम आणि सामंजस्य टिकेल. पार्टनरसह वाद टाळा. थोडा अहंभाव वाढू शकतो, पण कामावर लक्ष केंद्रित केल्यास लाभ होईल. सरकारी कामांमधून फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यापारात नवीन संधी मिळतील. उपाय: सूर्याष्टकाचे पठण करणे शुभ फलदायी ठरेल.12 / 15धनु: सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश मिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. अहंभाव टाळा, अन्यथा वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. नात्यांत समजूतदारपणा ठेवा. उत्पन्न वाढेल पण खर्चही होतील. व्यवसायासाठी प्रवासाचे योग आहेत. शत्रू दुर्बल राहतील, परदेशाशी संबंधित कामांत प्रगती होईल. उपाय: गायत्री चालीसाचे पठण करणे लाभदायक ठरेल.13 / 15मकर: सूर्याचे वृश्चिक राशीत गोचर शुभ राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जीवनसाथीशी संबंध चांगले राहतील, पण प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगा. पितृसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. नवीन नोकरी किंवा व्यावसायिक संधी मिळेल. अचानक धनप्राप्ती होऊ शकते. उपाय: दररोज सूर्यदेवाला कुमकुममिश्रित जलाने अर्घ्य द्या.14 / 15कुंभ: सूर्याचे वृश्चिक राशीत गोचर लाभदायक ठरेल. जीवनसाथीशी संबंध अधिक मजबूत होतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि बचत वाढेल. नवीन लोकांशी ओळखी होतील, सहकाऱ्यांचा आधार मिळेल. नवी जबाबदारी किंवा भागीदारी लाभदायक ठरेल. उपाय: भगवान शिवाचे अभिषेक करा आणि गरीबांना दान करा.15 / 15मीन: सूर्याचा वृश्चिक राशीतील प्रवेश शुभ ठरेल. नातेसंबंध मजबूत होतील, भावंडांचा आधार मिळेल. जीवनसाथीशी समजुतीने घ्या. भाग्याची साथ लाभेल. कुटुंबासोबत धार्मिक प्रवास संभवतो. आर्थिक स्थिती सुधारेल पण खर्चही होतील. नोकरी व व्यवसायासाठी काळ चांगला आहे. उपाय: गरीबांना गव्हाचे दान करणे फायदेशीर ठरेल.