By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:14 IST
1 / 7संपूर्ण श्रावण मासात महादेवाची उपासना म्हणून उपास, जप-जाप्य, पंचामृताचा अभिषेक, दान-धर्म, रुद्रपठण इत्यादी गोष्टी केल्या जातात. याच उपासनेचा एक भाग म्हणून आपण हे महादेवाचे श्लोक म्हणूया आणि आपल्या प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवून त्यांच्याकडून शिव उपासना करून घेऊया. 2 / 7भगवान महादेव यांना आशुतोष म्हटले जाते. आशु म्हणजे लवकर आणि तोष म्हणजे संतुष्ट होणारे! ही देवता भक्तांच्या निस्सीम भक्तीने लवकर प्रसन्न होते, असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे. महादेवाला भक्तिभावे दूध-पाण्याने, पंचामृताने अभिषेक केला किंवा साधे बेलाचे पान मनोभावे अर्पण केले तरी ते संतुष्ट होतात. मात्र कामाच्या वेळांमुळे शिव मंदिरात जाणे शक्य झाले नाही तर निदान बसल्या जागी दिलेले श्लोक मनोभावे म्हणा आणि शिव उपासना पूर्ण करा!3 / 7महामृत्युंजय मंत्रातील हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. ज्यात वर्णन केले आहे, की त्रिनेत्रधारी महादेव या संसाराचे रक्षक आहेत. त्यांची कृपादृष्टी आपल्यावरही झाली तर मृत्यूचे भय उरणार नाही शिवाय मोक्षप्राप्तीदेखील होईल.4 / 7ही रुद्र गायत्री आहे. गायत्री मंत्रात प्रचंड ताकद असते. त्यामुळे महादेवाची उपासना करताना इतर कोणतेही मंत्र, श्लोक म्हटले तरीदेखील रुद्र गायत्रीच्या या दोन ओळी म्हणूनच शिव उपासनेची सांगता केली जाते.5 / 7या श्लोकात महादेवाचे वर्णन केले आहे, तसेच त्यांच्या कर्तृत्त्वाचे गायनदेखील केले आहे. कैलासावर राहणारे भगवान शंकर, ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे, गळ्यात सापाचा हार आहे, ज्यांच्या नजरेत कारुण्य आहे, अशा महादेवा तुमच्या शिवाय आम्हाला कोण तारणार?6 / 7हा श्लोकदेखील भगवान शिवाची स्तुती करणारा आहे. ज्यांची कांती कापरासाठी धुरकट पांढऱ्या रंगाची आहे. जे करुणास्वरूप आहेत. संसाराचा ताप हरण करणारे आहेत, ज्यांना सापांच्या माळा गळ्यात हार म्हणून घालायला आवडतात, ज्यांच्या अस्तित्वाने प्रत्येक ऋतू वसंतासारखा मनोहारी वाटतो, त्यांच्या हृदय सिंहासनावर वसलेल्या भवानी मातेलादेखील आमचा नमस्कार असो.7 / 7या श्लोकात महादेवाकडे आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या पापांची कबुली दिली आहे. जे जीव आमच्या चालण्याने,बोलण्याने , कृतीने दुखावले गेले आहेत, त्या सर्व अपराधांची कबुली भगवंता तुझ्यासमोर देतो, तू करुणा निधी असल्याने आमचे अपराध पोटात घे आणि आम्हाला अभय दे, अशी विनंती केली आहे.