By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 18:23 IST
1 / 6आपल्या अपार कष्टांना जोवर नशिबाची साथ आणि लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभत नाही, तोवर कष्टाचे चीज होत नाही आणि यशस्वी म्हणून आपली गणनाही लोक करत नाहीत. मात्र पुढील चार राशींसाठी ही संधी आयती चालून आली आहे तर त्यांनी त्याचा निश्चित लाभ करून घ्यावा!2 / 6यंदा १४ आणि १५ सप्टेंबर अशा दोन दिवसांत श्रावण अमावस्या विभागून आली आहे. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ९ मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. तरीही अमावस्येची तिथी १५ तारखेचा सूर्योदय पाहून संपणार असल्याने हा दिवस विशेषत: चार राशींचे भले करूनच जाणार आहे. अमावस्या असूनही ती बाराही राशींसाठी अनुकूल असणार आहे, तरीदेखील पुढील चार राशी अधिक भाग्यवान म्हटल्या पाहिजेत!3 / 6वृषभ राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. एखादी चांगली बातमी मिळू शकते. जे नवीन काम सुरू करत आहेत, त्यांना खूप फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील.4 / 6श्रावणी शुक्रवार भाग्यपालट करणारा ठरेल. नशीब त्यांना साथ देईल. पदोन्नती होऊ शकते, पगारवाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सर्व आर्थिक समस्या संपतील. लवकरच एखाद्या सहलीला जाण्याचा योग येईल आणि आनंद दुणावेल.5 / 6धनु राशीच्या लोकांची आतापर्यंत रखडलेली कामे आता पटापट आणि निर्विघ्नपणे पूर्ण होतील. जीवनात सुख-सुविधा वाढतील. आर्थिक अडचणींवर मात करता येईल. आनंदवार्ता समजतील!6 / 6मकर राशीच्या लोकांना जुन्या त्रासातून, आजारातून, आर्थिक प्रश्नातून सुटका मिळेल. शत्रूंवर विजय मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळेल. आर्थिक वाढ होण्याची दाट शक्यता आहे.