शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:50 IST

1 / 12
Nag Panchami 2025: श्रावणी मंगळवारी विशेष मंगळागौरी पूजन केले जाते. यंदाच्या पहिल्या श्रावण मंगळवारी नागपंचमी आहे. नागपंचमीचा सण देशभरातत साजरा केला जातो. नाग हे शिवाचे एक प्रतीक असून, देशभरात पूजनीय आहे. नागपंचमीचे धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, शास्रीयदृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जाते.
2 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा सेनापती मंगळ कन्या राशीत प्रवेश करत आहे. यातच चंद्र ग्रह कन्या राशीत असणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी राजयोग जुळून येत आहे. तसेच बुध नक्षत्र गोचर करत आहे. मंगळ, राहु-केतु आणि शनि यांचे अशुभ योग संपुष्टात येत आहेत.
3 / 12
मंगळ ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केल्यावर मीन राशीत असलेल्या शनि ग्रहाशी समसप्तक योग जुळून येत आहे. नागपंचमीचा सण आणि या ग्रहमानाचा काही राशींना चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. सकारात्मकता, अनुकूलता लाभू शकते, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 12
मेष: शत्रूंना पराभूत करू शकाल. मान-सन्मान वाढू शकेल. आंतरराष्ट्रीय व्यापार आहे त्यांना भरपूर नफा मिळू शकतो. परदेशात सुरू असलेल्या व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आयात-निर्यात व्यवसायात खूप चांगले परिणाम दिसू शकतात. नशिबाची साथ मिळू शकते. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर अनेक क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.
5 / 12
मिथुन: सुखसोयी आणि सुविधा वाढतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता. कोणतेही प्रलंबित पेमेंट मिळू शकते. पैशाचा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्तेचा आनंद घेऊ शकता. कारकिर्दीत नवीन यश मिळू शकेल.
6 / 12
कर्क: लांब पल्ल्याचे प्रवास करू शकता. आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. मीडिया, वकील इत्यादी व्यवसायांशी संबंधित लोकांना खूप फायदे मिळू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना फायदे मिळू शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असू शकतो. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवू शकता.
7 / 12
सिंह: नोकरीत बढती मिळू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकेल. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता. नशिबाची साथ मिळू शकेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंददायी अनुभव येतील. जोडीदाराशी नाते अधिक गोड होईल. इच्छा पूर्ण होऊ शकतील.
8 / 12
तूळ: गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. प्रवास, पर्यटन किंवा परदेशी व्यापारातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार आणि भागीदारीची शक्यता आहे.
9 / 12
वृश्चिक: मंगळ या राशीचा स्वामी आहे. हा कालावधी शुभ फलदायी ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नफा मिळण्यासोबतच मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक मोठे व्यवसायिक करार करू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकेल.
10 / 12
धनु: नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. नवीन संधी मिळू शकतात. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. विवाहेच्छुकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. सर्जनशील किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगला आहे. योजना यशस्वी होतील. चांगली बातमी मिळू शकते.
11 / 12
मकर: परदेशात आयात-निर्यात व्यवसायात, जमीन, घर किंवा रिअल इस्टेटमधून नफा मिळू शकतो. खर्च वाढू शकतात. परंतु हा खर्च चांगल्या कामासाठी ठरू शकेल. मालमत्ता खरेदी करू शकता. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात कोणत्याही प्रकारचा वाद टाळावा.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Nag PanchamiनागपंचमीAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक