शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:11 IST

1 / 15
Shravan 2025 First Guruwar: व्रतांचा राजा श्रावण सुरू आहे. ३१ जुलै २०२५ रोजी पहिला श्रावण गुरुवार आहे. गुरुवार हा सद्गुरू, दत्तगुरू, स्वामींच्या विशेष पूजनाचा, नामस्मरण, उपासनेचा मानला जातो. श्रावणातील गुरुवारी बृहस्पती पूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. जिवतीच्या कागदावर बुध-बृहस्पती यांना स्थान देण्यात आले आहे.
2 / 15
कोट्यवधी लोक गुरुवारी मनापासून स्वामी सेवा करतात. श्रावणातील गुरुवारी केलेले पूजन विशेष मानले जाते. यंदाच्या पहिल्या श्रावण गुरुवारी गजलक्ष्मी योगासह काही शुभ योग जुळून आलेले आहेत. तसेच ३ अशुभ योगांची सांगताही झालेली आहे.
3 / 15
या ग्रहमानाचा काही राशींना अत्युत्तम लाभ मिळू शकतो. सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकतात. धनलक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकते, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर स्वामींची कालातीत कृपा राहू शकेल, ते जाणून घेऊया...
4 / 15
मेष: काळ अनुकूल राहील. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी सुरुवातीला असतील. या अडचणींचाच विचार करीत राहिल्यास संघर्ष वाढेल. त्यामुळे ताण न घेता सकारात्मक पद्धतीने विचार करा. आहाराचे पथ्य पाळा. तणावाला आवर्जून दूर ठेवा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारपासून परिस्थिती आटोक्यात येईल. उत्साह वाढेल. नोकरीत वरचढ राहाल.
5 / 15
वृषभ: आर्थिक जोखीम टाळा. सतत व्यस्त राहाल. यश मिळेल; पण स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार नाही. स्वत:साठी वेळात वेळ कसा काढायचा, याचे नियोजन करा. सोशल मीडियावर सक्रीय राहणे, प्रतिक्रिया देणे शक्यतो टाळा. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. काहींना अचानक धनलाभ होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल.
6 / 15
मिथुन: कार्यक्षेत्रात एखाद्या नवीन प्रकल्पात व्यस्त राहाल. त्यात जसा फायदा होईल तसेच काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. ताण-तणाव व्यवस्थितपणे हाताळण्याची गरज आहे. व्यवसायात ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. अधिकारी वर्गाची नाराजी ओढवून घेऊ नका. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल.
7 / 15
कर्क: कामात उत्साह राहील. मनावरील दडपण निघून गेलेले असेल. एखाद्या बाबतीत आपल्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मालमत्तेची कामे करताना कागदपत्रे नीट वाचून घ्यावी. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. बोलण्याचा वेगळाच अर्थ काढला जाऊ शकतो. गैरसमज होऊ शकतात. अचानक प्रवास करावा लागेल. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नवीन जबाबदारी मिळेल.
8 / 15
सिंह: मनात विचारांचे काहूर माजलेले राहील. समोर अनेक संधी असतील. मात्र, एकाच वेळी अनेक आघाड्यांवर कामे करताना दमछाक उडेल. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. धनलक्ष्मीची कृपा राहील. व्यवसायात अनुकूल स्थिती राहील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. व्यवहारात कुणी तुम्हाला चुकीचा सल्ला देईल. विचारपूर्वक महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत. खाण्या-पिण्याची चंगळ राहील.
9 / 15
कन्या: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. थोडे सावधपणे राहण्याची, वागण्याची गरज आहे. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे. ऐनवेळी नियोजित कार्यक्रमात बदल होऊ शकतात. मात्र, घाईने कामे करू नका.
10 / 15
तूळ: खर्चावर नियंत्रण ठेवा. संयमाने वागण्याची गरज आहे. काही अनपेक्षित खर्च उपस्थित होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. मित्र, मैत्रिणींच्या भेटी होतील. एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. व्यवहार जपून करा. नोकरीत पारडे जड राहील. नियमानुसार कामे होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. बेपर्वाई नको. अचानक प्रवास करावा लागेल. शुक्रवारपासून परिस्थिती नियंत्रणात येईल.
11 / 15
वृश्चिक: नोकरीत काही बदल होऊ शकतात. मात्र, सबुरीचे धोरण ठेवल्यास परिस्थितीतून लगेच मार्ग निघेल. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. चांगले अनुभव येतील. अडचणी दूर झाल्यामुळे हलके हलके वाटेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. एखादे महत्त्वाचे काम यशस्वीपणे पूर्ण होईल. शुक्रवार, शनिवार प्रवासात सावध राहा. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका.
12 / 15
धनु: संघर्षातून सरतेशेवटी यश देणारे वातावरण राहील. जनसंपर्क चांगला राहील. लोकांकडून संमिश्र स्वरूपाचे अनुभव येतील. काही लोक अनपेक्षितपणे सहकार्य करतील. काही लोकांकडून विरोध सहन करावा लागेल. थोडी तटस्थता ठेवली पाहिजे. जीवनसाथीची साथ राहील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. मात्र, त्यातून फायदा होणार असल्याने कामाचे काही वाटणार नाही. शुक्रवार, शनिवार महत्त्वाची कामे होतील.
13 / 15
मकर: जनसंपर्क चांगला राहील. काही अडचणी असतील. इतरांच्या भानगडीत पडू नका. मध्यस्थी करायला जाल आणि भांडणारे बाजूला राहतील. मनस्ताप सहन करावा लागेल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. भाग्याची चांगली साथ राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. कार्यक्षेत्रात बदल होतील.
14 / 15
कुंभ: अनपेक्षित लाभ होतील. मनात कुणाबद्दल अढी किंवा गैरसमज ठेवून वागू नका. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. वादविवादात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. शुक्रवार, शनिवार सामाजिक मान-सन्मान मिळेल. नशिबाचा कौल बाजूने राहील. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल.
15 / 15
मीन: 'श्रद्धा आणि सबुरी' हे लक्षात घेऊन वाटचाल चालू ठेवा. संयमाची परीक्षा पाहणारे ग्रहमान राहील. महत्त्वाची कामे सावधपणे करा. गडबड, घाई करून चालणार नाही. कालांतराने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व वाढेल. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. शुक्रवार, शनिवार वाहन जपून चालवा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिकshree swami samarthश्री स्वामी समर्थ