शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शनी अमावास्या: असे करा शनिदेवाला प्रसन्न; मिळवा सुख-समृद्धी, मान-सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 7:13 PM

1 / 7
३० एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे आणि याच दिवशी या वर्षाचं पहिलं सूर्यग्रहणही लागणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. अमावस्या शनिवारी असल्यानं याला शनी अमावस्याही म्हटलं जातं. शनिदेव हे न्यायाचे देवता असून कर्मानुसार फळ देतात.
2 / 7
ज्याच्याकडे चांगले कर्म आहेत ते चांगले फळ देतात आणि वाईट कर्म वाईट परिणाम देतात. ज्योतिष शास्त्रात शनि अमावस्येला मान-समृद्धी मिळविण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात, तसेच जीवनात आर्थिक समृद्धी देखील प्राप्त होते. चला जाणून घेऊया हे उपाय.
3 / 7
ज्योतिष शास्त्रानुसार शनि अमावस्येच्या दिवशी गाईची पूजा करा. पूजेच्या वेळी तिला आठ बुंदीचे लाडू खाऊ घाला आणि नंतर सात वेळा प्रदक्षिणा घाला. असे केल्याने शनिदोष दूर होतो आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व दुःख, संकटे दूर होतात.
4 / 7
हनुमंताची किंवा शनी देवाची उपासना सुरू ठेवावी. यथाशक्ती दान धर्म करावा. कोणालाही दुखवू नये. अपमान करू नये. शक्य तेवढी ज्येष्ठांची सेवा करावी. दुसऱ्यांना मदत करावी. शिस्तीने वागावे. अनैतिक कर्म करू नये. धार्मिक कार्यात सहभागी व्हावे. कर्तव्यात कसूर करू नये!
5 / 7
शनिवार हा हनुमंतांना समर्पित असल्यामुळे या दिवशी शनीसह मारुतीचे पूजन, नामस्मरण, उपसना, मंत्र, स्तोत्रे म्हणावीत. असे केल्याने शनीच्या प्रतिकूल प्रभाव काहीसा कमी होण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते. शनी साडेसाती, महादशा, अंतर्दशा, ढिय्या प्रभाव असलेल्या व्यक्तींनी आवर्जुन यासंबंधीचे उपाय करावेत, त्याचा लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते.
6 / 7
शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाला दूध आणि जल अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या पानावर पाच प्रकारची मिठाई ठेवून ती झाडाकडे ठेवा. यानंतर दीप ठेवा आणि झाडाला पाच प्रदक्षिणा घाला. शक्य असल्यास पिंपळाचं एक छोटं झाड लावा आणि रविवार सोडून दररोज पाणी घाला. असं केल्यानं शनी दोषापासून मुक्ती मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होते.
7 / 7
शनीदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी नवग्रह मंदिरात जाऊन पूजा करा. यासोबतच शनी चालीसा आणि शनी स्तोत्राचं पठण करा. त्यानंतर शनी मंत्राचा जप करा. शनिदेवावर तेल, काळे तीळ, निळ्या रंगाचे फूल अर्पण करा. असं केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते. सदर माहिती ज्योतिषीय, धार्मिक मान्यता आणि सामान्य गृहीतकांवर आधारित असून, आपापले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, परंपरा यांप्रमाणे करण्याचा सल्ला दिला जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषsolar eclipseसूर्यग्रहण