५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:17 IST
1 / 15शनि हा नवग्रहांचा न्यायाधीश ग्रह आहे. आताच्या घडीला शनि मीन राशीत विराजमान आहे. मीन राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. सुमारे १४१ दिवसांनी वक्री असलेला शनि याच मीन राशीत मार्गी होणार आहे. शनिचे मार्गी होणे अनेक राशींना सर्वोत्तम सुखदायक, लाभकारक आणि सुख-सौभाग्याचे ठरू शकते, असे म्हटले जात आहे. 2 / 15सुमारे १४१ दिवसांनी शनि मार्गी होत असताना हंस महापुरुष, रुचक, हर्ष, वसुमान आणि नवमपंचम असे राजयोग जुळून आलेले आहेत. शनि हा सर्वांत मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असणार आहे. आताच्या घडीला कुंभ, मीन, मेष या राशींची साडेसाती सुरू आहे. 3 / 15मीन राशीत शनिचे मार्गी होणे आणि राजयोगांचा जुळून आलेला महासंयोग अनेक राशींना नोकरी, व्यवसाय, करिअर, आर्थिक आघाडी अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात यश-प्रगती देणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. थोरा मोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. समाजात महत्त्व वाढेल. विवाहाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. मात्र, बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. आर्थिक आवक चांगली राहील.5 / 15वृषभ: प्रसिद्धी, सन्मान मिळेल. काही अडचणी असतील. त्या दृष्टीने सबुरीने वागण्याची गरज आहे. कालांतराने परिस्थिती आटोक्यात येईल. अडचणी दूर झाल्यामुळे हलके वाटेल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. काही लोक चुकांकडे बोट दाखवतील. कामे चालू ठेवा. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे कामाचा ताण वाढेल.6 / 15मिथुन: उत्साह राहील. पण, काही अडचणी जाणवतील. चंद्र-प्लूटो युतीमुळे थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहन जपून चालवा. कालांतराने अडचणी दूर होतील. काही लोक कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे बराच वेळ वाया जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रिकामटेकड्या दोस्त मंडळींपासून चार हात दूर राहणेच योग्य राहील.7 / 15कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. एखाद्या बाबतीत अपेक्षाभंग होऊ शकतो. स्वतःबद्दल अवास्तव कल्पना बाळगू नका. आत्मविश्वासाने कामे करीत राहा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.8 / 15सिंह: मान-सन्मान मिळेल. उत्सवी वातावरण राहील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोक मान देतील. प्रवासाचे योग येतील. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. मुले प्रगती करतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. मोठेपणा मिळेल. आर्थिक लाभही होतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. व्यावसायिक अंदाज चुकू शकतात. जीवनसाथीशी गैरसमज टाळा.9 / 15कन्या: अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे पहिल्या टप्प्यात आटोपून घ्यावी. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन केले जाईल. विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण राहील. समाजसेवा करणाऱ्यांना मोठेपणा मिळेल. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. योजना गुप्त ठेवा. तब्येतीची काळजी घ्यावी. 10 / 15तूळ: चंद्राचे भ्रमण फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभ, व्यावसायिक सफलता, गृहसौख्य, कार्यक्षेत्रातील संथी या दृष्टीने चांगला काळ आहे. बोलण्याचा प्रभाव पडेल. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. मात्र, गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत पगारवाढ मिळेल.11 / 15वृश्चिक: चंद्र भ्रमणाची अनुकूल फळे मिळतील. शुक्राचे राशी परिवर्तन प्रथम स्थानातून होईल. गुरुचे भाग्य स्थानातील भ्रमण मनातील आत्मविश्वास वाढवणारे ठरेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. मनात प्रसन्न विचार राहतील. भेटवस्तू प्राप्त होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. महत्त्वाची कामे पूर्वार्धात आटोपून घ्या. 12 / 15धनु: चांगले अनुभव येतील. मनात सकारात्मक विचार राहतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. हाती पैसा येईल. भेटवस्तू मिळतील. चैन व मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. आरोग्याची देखभाल करण्यासाठीही पैसा खर्च कराल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. जवळचे प्रवास होतील. प्रवासात सतर्क राहा. गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी गैरसमज होतील, नोकरीत बदलाचे संकेत मिळतील.13 / 15मकर: थोडी दगदग होईल. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. अनुकूलता अनुभवायला मिळेल. अडचणी दूर होतील. जीवनसाथीचा सहयोग मिळेल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. बोलण्याचा प्रभाव पडेल. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. पगारवाढ व तत्सम लाभ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल, मात्र खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. 14 / 15कुंभ: ग्रहमान अनुकूल राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. पैसा खर्च करण्याकडे कल राहील. ग्रहमान अनुकूल राहील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ, सोयी-सुविधा, मान-सन्मान इत्यादी दृष्टीने चांगला काळ आहे. शब्दाला मान दिला जाईल. वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. नियमानुसार कामे करा. वाहने जपून चालवा. इतरांच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.15 / 15मीन: महत्त्व वाढेल. आर्थिक बाजू बळकट राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. मुलांच्या प्रगतीसाठी व नोकरीत अनुकूल वातावरण राहील. काही अनुकूल बदल होतील. थोडी दगदग होईल. सबुरीचे धोरण ठेवा. लोकांच्या उपयोगी पडण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.