शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:36 IST

1 / 9
नोव्हेंबर महिना ज्योतिषीय दृष्टिकोनाने विचार केल्यास अनेकविध अद्भूत योगांचा शुभ महिना ठरला. इंग्रजी वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिनाही असाच काहीसा चांगला तसेच सकारात्मक ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात ३ ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.
2 / 9
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. याच महिन्यात बुध दुसऱ्यांदा रास बदलून शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत प्रवेश करेल. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात बुध दोनवेळा रासबदल करणार आहे.
3 / 9
यानंतर नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य धनु राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला धनु संक्रांत असे म्हटले जाते. याशिवाय शुक्र ग्रहही गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. या तीन ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना अनुकूल ठरू शकेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. व्यावसायिकांना शुभ परिणाम मिळतील. उत्पन्नाचे इतर स्त्रोत वाढू शकतील. रिअल इस्टेटमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. वैवाहिक जीवनात सुधारणा होईल.
5 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना लाभदायक ठरू शकेल. जमीन आणि स्थायी मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभाचे योग येतील. वाहन खरेदीची योजना पूर्णत्वास जाऊ शकेल. बिघडलेली आणि अपूर्ण कामेही पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला समन्वय राहील. महिन्याच्या शेवटी तुम्हाला आनंदाची अनेक कारणे मिळतील.
6 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना अनुकूल ठरू शकेल. साडेसाती सुरु असूनही परिस्थितीत बरीच सुधारणा होईल. तुम्हाला लाभ आणि पदोन्नतीसाठी अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील. डिसेंबरमध्ये तुम्हाला नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांशी चांगला समन्वय राहील. पालकांच्या मदतीने तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिक कामामुळे धावपळ होईल.
7 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना शुभ ठरू शकेल. कुंभ राशीचीही साडेसाती सुरू आहे. तरीही शुभ फल मिळेल. आर्थिकदृष्ट्या चिंतामुक्त होऊ शकाल. तुम्ही नवीन कार्य सुरू करू शकता. अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांना अधिकारी वर्गाचे पूर्ण सहकार्य मिळेल. खर्च नियंत्रणात ठेवल्यास फायदा होईल.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना डिसेंबरचा महिना अनुकूल ठरू शकेल. तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यताही वाढेल. सतत मेहनत केल्याने पैशांशी संबंधित समस्या दूर होतील. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे बराच काळ अडकलेला पैसा परत मिळू शकतो. तुम्ही मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनवू शकता. डिसेंबरमध्ये तुमच्या आयुष्यात आनंदाच्या अनेक संधी येतील. नोकरदार लोकांच्या पद आणि प्रभावात वाढ होईल. पती-पत्नीचे नाते आनंदी राहून घट्ट होईल.
9 / 9
डिसेंबर महिन्यात सूर्य बुध आणि शुक्र ग्रहांच्या संयोगामुळे अनेक शुभ योग जुळून येत आहेत. याचा अनेक राशींना उत्तम लाभ होऊ शकतो. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य