४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 08:53 IST
1 / 15भाद्रपद शुद्ध एकादशीला परिवर्तिनी एकादशी व्रत आचरले जाते. मराठी वर्षात प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात एकादशी व्रत केले जाते. एकादशीचे व्रत श्रीविष्णूंना समर्पित असते. त्यामुळे या दिवशी केलेले श्रीहरि विष्णूंचे पूजन अत्यंत पुण्यफल लाभदायी मानले जाते.2 / 15यावर्षी ०३ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद शुद्ध परिवर्तिनी एकादशी आहे. या एकादशीला बुधादित्य, गजकेसरी, धन योग, वसुमान योग असे विविध उत्तम शुभ, राजयोग जुळून येत आहेत. या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.3 / 15गणेशोत्सव सुरू आहे. काही दिवसांनी गणेशोत्सवाची सांगता होत आहे. या कालावधीतील ग्रहमान कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक, शुभ-पुण्य फलदायी ठरू शकेल? कुटुंब, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यापार, आर्थिक आघाडीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...4 / 15मेष: नवीन संधी मिळेल. काही अडचणी असतील. मात्र, सबुरीचे धोरण ठेवा. त्यामुळे हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. ओळखीचे फायदे होतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. सामाजिक कार्यात मन रमेल. लोक कामाची प्रशंसा करतील. काहींना प्रवास घडून येईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. 5 / 15वृषभ: प्रगती होईल. नवनवीन कल्पना मनात येतील. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. मालाची विक्री चांगली होईल. मात्र, थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रश्नात गुंतून पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. गुरुवारपासून चांगल्या काळाचा अनुभव येईल. अडचणी दूर होतील. काहींना प्रवास घडून येईल. मुलांची प्रगती होईल.6 / 15मिथुन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. लोकांच्या भरवशावर विसंबून राहू नका. काही लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर बसवून त्यांचा स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कुणी प्रशंसा केली म्हणून हुरळून जाऊ नका. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. व्यवसायात तुमचे अंदाज बरोबर ठरतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. गुरुवार, शुक्रवार वाहन जपून चालवा. कुणाची हमी घेऊ नका.7 / 15कर्क: शिक्षणात प्रगती होईल. चांगली बातमी समजेल. मनात सकारात्मक विचार राहतील. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. नवीन लोकांच्या संपर्कात याल. व्यवसायात आक्रमक धोरण राहील. मात्र, आपल्या योजनांच्या बाबतीत गुप्तता बाळगली पाहिजे. आरोग्याची काळजी घ्यावी. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भेटवस्तू प्राप्त होतील, शनिवारी वाहन जपून चालवा. लोकांना अवास्तव आश्वासने देऊन शब्दात अडकू नका.8 / 15सिंह: नवीन जबाबदारी मिळेल. सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. वेळेचे नियोजन नीट केले तर चांगले राहील. लोकांना अवास्तव आश्वासने देऊ नका. कधी-कधी स्पष्ट नकार देणेच आपल्या फायद्याचे ठरते. नोकरीत अचानक आधीपेक्षा जास्त कार्यमग्न व्हाल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी विशेष वेळ द्यावा लागेल. मुलांना योग्य संधी मिळेल. त्यांना मार्गदर्शन करा. शेवटच्या टप्प्यात स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्यावी. मसालेदार पदार्थ खाणे टाळा.9 / 15कन्या: भरभराट होईल. ग्रहमान चांगले आहे. मात्र, इतरांकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या, तर त्यातून निष्कारण तणाव वाढू शकतो. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे मनात आनंदी विचार राहतील. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत योग्यतेची दखल घेतली जाईल. पगारवाढ व मनासारखे पद मिळू शकते. मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. 10 / 15तूळ: चंद्राचे शुभ स्थानातील भ्रमण यश देणारे ठरेल. धनलाभ, जमिनीचे व्यवहार, प्रवास, कार्यक्षेत्रातील फायदे, मंगलकार्य इत्यादी बाबतीत चांगली फळे मिळतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नोकरीत अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये जा चालू राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. व्यवसायात भरभराट होईल.11 / 15वृश्चिक: मोहात अडकू नका. अनेक अडचणी दूर होतील. मनात उत्साह राहील. थोडे सावध राहा. एखादे महत्त्वाचे काम पूर्वार्धात हातावेगळे कराल. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. प्रवासात सतर्क राहा. शनिवारी नोकरीत अधिकार मिळाले तरी कामाचा ताण राहील. सहकारी वर्गाशी मधुर शब्दांत संभाषण करा.12 / 15धनु: अनुकूल परिस्थिती राहील. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. चंद्राचे व्यय स्थानातून होणारे भ्रमण अकारण दगदग वाढवणारे ठरू शकते. नोकरीत बदल आणि ताणतणाव राहू शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बुधवारपासून अनुकूलता अनुभवायला मिळणार आहे. विवाहेच्छूसाठी अनुकूल वातावरण राहील. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील.13 / 15मकर: नोकरीत प्रगतीपूरक वातावरण राहील. त्यामुळे स्वतःसाठी केलेले प्रयत्न फायदा देणारे ठरतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. इतर अनेक लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. व्यय स्थानातील चंद्र भ्रमणामुळे थोडी काळजी घ्यावी. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. गुरुवारपासून मनासारख्या घटना घडतील. काहींना प्रवास घडून येईल. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील.14 / 15कुंभ: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. महत्त्वाची कामे पहिल्या टप्प्यात आटोपून घ्यावी. सुरुवातीला एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. थोडी धावपळ होईल. काहींना अचानक बदलीला सामोरे जावे लागेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी येतील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक उठाठेव करू नका.15 / 15मीन: भरभराट होईल. सतत यश मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोक कामाची प्रशंसा करतील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. शैक्षणिक प्रगतिपुस्तक झळकते राहील. मुलांची प्रगती होईल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. पगारवाढ, बढती, अशी फळे मिळतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे.