शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Palmistry: तळहातावर शंख, कमळ, मासा, धनुष्य यांसारखी चिन्ह देतात राजयोगाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:50 IST

1 / 7
हस्तसामुद्रिक शास्त्रात काही चिन्हांना 'महाभाग्यशाली' मानले गेले आहे. ही चिन्हे पूर्वपुण्याईने किंवा सत्कर्मामुळे हातावर उमटतात असे मानले जाते. चला जाणून घेऊया, तुमच्या तळहातावरील चिन्हांचा अर्थ काय होतो ते पाहू.
2 / 7
कमळ हे माता लक्ष्मीचे प्रिय आसन आहे. ज्यांच्या हातावर कमळाचे स्पष्ट चिन्ह असते, त्यांच्यावर लक्ष्मीची अखंड कृपा असते. असे लोक शून्यातून विश्व निर्माण करतात. त्यांना आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासत नाही. हे लोक धार्मिक आणि समाजात मान-सन्मान मिळवणारे असतात.
3 / 7
तळहातावर, विशेषतः आयुष्य रेषेच्या शेवटी किंवा केतू पर्वतावर माशाचे चिन्ह असणे अत्यंत शुभ असते. माशाचे चिन्ह हे परदेश प्रवासाचे आणि अचानक धनलाभाचे संकेत देते. असे लोक खूप बुद्धिमान असतात आणि त्यांचे वृद्धकाळ अत्यंत सुखात जातो.
4 / 7
शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे. ज्यांच्या तळहातावर किंवा बोटांच्या अग्रभागी शंखाचे चिन्ह असते, ते लोक नशीबवान मानले जातात. शंखाचे चिन्ह असणारे लोक उत्तम वक्ते किंवा प्रशासकीय अधिकारी बनतात. त्यांच्या शब्दाला समाजात वजन असते आणि त्यांच्याकडे ऐश्वर्याची कमतरता नसते.
5 / 7
हे चिन्ह संघर्षातून विजयाचे प्रतीक आहे. ज्यांच्या हातावर धनुष्य किंवा बाणाचे चिन्ह असते, त्यांची इच्छाशक्ती प्रचंड असते. कितीही संकटे आली तरी हे लोक त्यावर मात करून आपले ध्येय गाठतात. हे लोक साहसी आणि पराक्रमी असतात.
6 / 7
स्वस्तिक हे मांगल्याचे आणि गणेशाचे प्रतीक आहे. हातावर स्वस्तिक असणे म्हणजे ईश्वरी संरक्षण असणे. असे लोक अत्यंत नीतिमान असतात आणि त्यांच्या हातून नेहमी समाजहिताची कामे घडतात.
7 / 7
हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार, ही चिन्हे हातावर स्पष्ट आणि कोणत्याही रेषेने न कापलेली असावीत, तरच त्यांचा पूर्ण लाभ मिळतो. जर चिन्हे पुसट असतील, तर त्यांचा प्रभाव कमी जाणवतो.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष