Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:35 IST
1 / 7मूलांक म्हणजे काय? तर जन्मतारखेची बेरीज. जसे की, ज्यांची जन्मतारीख १, १०, १९, किंवा २८ असते, त्यांचा मूलांक १ असतो. ज्यांची जन्मतारीख ६, १५, किंवा २४ असते, त्यांचा मूलांक ६ असतो. अंकशास्त्रानुसार १ आणि ६ हे दोन्ही मूलांक भाग्यकारक समजले जातात. या मूलांकाच्या स्त्रियांचे वैशिष्ट्य पाहू. 2 / 7मूलांक १ ची स्वामी देवता सूर्य आहे, जो तेज, नेतृत्व आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या मुलींमध्ये नैसर्गिक नेतृत्व क्षमता असते. त्या स्वतःच्या कामातच नाही, तर पतीलाही योग्य मार्गदर्शन करतात. त्यांचा आत्मविश्वास पतीच्या कार्यक्षेत्रात सकारात्मकता आणतो. त्यांच्यामुळे पती कठोर परिश्रम करण्यास प्रेरित होतो आणि यशस्वी निर्णय घेतो. 3 / 7पतीला करिअरमध्ये मोठे ध्येय साधण्यासाठी त्या सतत प्रोत्साहन देतात. त्यांच्या येण्याने पतीची समाजात प्रतिष्ठा वाढते आणि त्याला नवीन संधी प्राप्त होतात, ज्यामुळे त्यांचा भाग्योदय होतो.4 / 7मूलांक ६ ची स्वामी देवता शुक्र आहे, जो धन, समृद्धी, सौंदर्य आणि भौतिक सुखांचा कारक आहे. या मुलींना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे या मुली आपल्या पतीच्या जीवनात धन, ऐश्वर्य आणि आर्थिक स्थिरता घेऊन येतात. त्यांच्या लग्नानंतर पतीच्या व्यवसायात किंवा नोकरीत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.या मुली खूप प्रेमळ, समजूतदार आणि कुटुंबवत्सल असतात. 5 / 7त्या घरामध्ये शांतता आणि गोडवा टिकवून ठेवतात. त्यांच्या या स्वभावमुळे पतीला मानसिक आधार मिळतो आणि कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करता येते. त्या कुटुंबात आनंदी आणि सुंदर वातावरण निर्माण करतात, ज्यामुळे पती प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरित होतो.6 / 7हे दोन्ही मूलांक भाग्यकारक मानले जातात. मूलांक १ च्या मुली पक्षात धैर्य, महत्त्वाकांक्षा आणि कठोर परिश्रम घेऊन येतात, तर मूलांक ६ च्या मुली प्रेम, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक आनंद घेऊन येतात.7 / 7हे दोन्ही मूलांक पतीच्या जीवनातील भौतिक आणि भावनिक गरजा पूर्ण करण्यास मदत करतात, ज्यामुळे पतीला केवळ करिअरमध्येच नाही, तर जीवनातही परिपूर्ण यश मिळते. त्यामुळे अंकशास्त्रानुसार, या दोन मूलांकाच्या मुली आपल्या पतीसाठी अत्यंत भाग्यवान सिद्ध होतात.