By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 10:51 IST
1 / 12Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.2 / 12फेब्रुवारी महिन्यात नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध दोनवेळा राशीपरिवर्तन करणार आहे. ११ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तर लगेचच १२ फेब्रुवारी रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 3 / 12बुधाच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर बुध आणि शनि यांचा युती योग जुळून येईल. तसेच सूर्याच्या कुंभ राशीतील प्रवेशानंतर बुध आणि सूर्याचा बुधादित्य राजयोग आणि बुध, सूर्य, शनि यांचा त्रिग्रही योग जुळून येईल. याचा प्रभाव सर्व मूलांकांवर पडत असतो. बुध हा मूलांक ५चा स्वामी आहे. तर सूर्याकडे मूलांक १चे स्वामित्व आहे. तुमचा मूलांक कोणता तुम्हाला बुधादित्य राजयोगाचा काळ कसा ठरू शकेल? जाणून घ्या...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. काही समस्यातून दिलासा मिळू शकेल. जोडीदार किंवा जवळचा मित्र तुमच्या मदतीला येईल. काही प्रलोभनांचा प्रतिकार करावा लागेल. वैयक्तिक आघाडीवर किरकोळ समस्या उद्भवू शकतात. सर्व निर्णय काळजीपूर्वक घ्यावे. आर्थिक स्थितीही चांगली राहील. प्रियजनांसोबत वेळ चांगला जाईल. प्रेम आणि पैशाच्या बाबतीत हा काळ शुभ ठरू शकेल. मन आनंदी आणि प्रसन्न राहू शकेल.5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. संघर्ष आणि गैरसमज यामुळे थोडे दुःखी होऊ शकाल. कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण वाटू शकते. अधिक परिपक्व आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला तर यातून नक्कीच मार्ग काढू शकाल. कामाच्या ठिकाणी प्रगती करू शकता. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीत हुशारीने गुंतवणूक करू शकता. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रमाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करू शकाल. 6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. आनंददायी घटना घडू शकतील. जुन्या मित्रांसोबत घालवाल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावे. दुर्लक्ष करू नये. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मान-सन्मान वाढेल. जलद निर्णयक्षमतेमुळे प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहाल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. विचारपूर्वक घेतलेले निर्णय शुभ परिणाम देऊ शकतील.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. सहजपणे नवीन काम सुरू करू शकता किंवा जुना रखडलेले काम पुन्हा सुरू करू शकता. पैसे अडकले असतील, ते परत मिळण्याची शक्यता आहे. मिळणाऱ्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अनुकूल आणि सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतात.8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अनावश्यक वाद टाळा. कार्यालयातील नियम आणि कायदे पाळा. गैरसमजांमुळे जोडीदारातील अंतर वाढू शकते. दृष्टिकोन बदलल्याने संबंध सुधारण्यास मदत होईल. अधिक सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी प्रयत्न आणि मेहनत वाढवणे आवश्यक ठरू शकेल.9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. जवळच्या मित्राशी वाद होऊ शकतो. सावधगिरी बाळगा. कामाशी संबंधित काही समस्या चिंता वाढवू शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ आनंद देणारा ठरू शकेल.आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होत आहे. चांगल्या भविष्यासाठी योजना आखाल. 10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत तेव्हा तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटू शकते. विचार आणि मते अधिक स्पष्टपणे व्यक्त करून हे टाळता येऊ शकेल. कालांतराने गैरसमज दूर होतील. तणावमुक्त वाटेल. मिळणाऱ्या संधींचा फायदा घ्यावा. सुख आणि समृद्धीचे शुभ योग निर्माण होतील. आर्थिक बाबींसाठी शुभ काळ ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. यशाच्या मार्गावर पुढे जाल.11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. दानधर्म करण्याच्या अनेक संधी मिळतील. यामुळे बरे वाटेल. व्यावसायिक विकासात येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नवीन मित्र मिळतील, जे वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाडीवर मदत करतील. मित्र नाराज होणार नाहीत, याची खात्री करा. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कठोर परिश्रमाच्या जोरावर बरेच काही साध्य करू शकाल. आर्थिक बाबींसाठी काळ शुभ आहे. धनलाभ होऊ शकेल. शुभ वार्ता मिळू शकेल.12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे आणि ते साध्य करता येऊ शकेल. वैयक्तिक स्तरावर अनेक बदल होताना दिसतील. हे बदल बहुतेक सकारात्मक असतील. आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली दिसत आहे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळल्यास चांगले परिणाम मिळतील. आनंद आणि समृद्धीचे शुभ योगायोग निर्माण होऊ लागतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.