शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:31 IST

1 / 8
यंदा निर्जला एकादशी ६ आणि ७ जून रोजी विभागून आल्यामुळे कोणत्या दिवशी निर्जला एकादशीचा उपास करावा असा भाविकांना प्रश्न पडला आहे. ६ जून रोजी पहाटे ४.२८ मिनिटांनी ही तिथी सुरु होणार असली तरी ७ जूनचा सूर्योदय ती पाहणार असल्याने ७ जून ची निर्जला एकादशी(Nirjala Ekadashi 2025) उपासासाठी ग्राह्य धरली जाईल. या उपासनेचा लाभ भाविकांना मिळणार आहेच, शिवाय दोन दिवसांत विभागून आलेल्या तिथीचा लाभ आणि त्या दिवशी जुळून आलेल्या सर्वात मोठ्या राजयोगाचा परिणामही अनुभवता येणार आहे.
2 / 8
निर्जला एकादशी तिथी शुक्रवार ६ जून रोजी सुरु होत आहे. त्या दिवशी बुध ग्रह स्वराशि मिथुनमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग तयार होत आहे. वर्षभरातला हा सर्वात मोठा राजयोग म्हटला जात असून पाच राशींना त्याचा लाभ होणार असे भाकीत वर्तवले जात आहे.
3 / 8
या पाच राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात आणि विष्णु-लक्ष्मीच्या कृपेने आपपल्या क्षेत्रामध्ये भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच कुटुंबाचे वातावरण आनंदात राहील आणि उत्पन्नाच्या नव्या संधी चालून येतील. हे भरघोस दान कोणत्या राशींच्या पदरात पडणार ते पाहू.
4 / 8
भद्र राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या घरामध्ये मंगल कार्याचे योग जुळून येतील. धार्मिक कार्यही होतील. घर किंवा वाहन गुंतवणूकीसाठी हा काळ अनुकूल ठरेल. नोकरी तसेच व्यवसायात सहकाऱ्यांबरोबर सामंजस्याने वागावे लागेल. आरोग्यामध्ये सुधारणा होईल, गेल्या काही काळात आलेला मानसिक तणाव कमी होईल. वैवाहिक जीवनात गोडी वाढेल, अविवाहितांना चांगले स्थळ येईल, लग्न जुळेल.
5 / 8
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढवणारा ठरेल. निर्णय क्षमता वाढेल आणि तुमचे नेतृत्त्व लोकांना आवडेल. लोकप्रिय होण्याची संधी चालून येईल. नोकरदारांना वेतनवाढ तर व्यावसायिकांना आर्थिक लाभाच्या संधी आहेत. गुंतवणुकीतून भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्याचा हा काळ मुलांची प्रगती, जोडीदाराचा पाठिंबा आणि नात्यांमध्ये गोडवा आणणारा ठरेल.
6 / 8
नोकरदारांचे श्रम आणि त्याचा योग्य मोबदला मिळण्याचा हा काळ असेल. तुमच्या करिअरला विशिष्ट उंची देणारा ठरेल. व्यावसायिकांना व्यवहारात बक्कळ नफा लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दानधर्म होईल. आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येईल जिच्यामुळे तुमचा आर्थिक, सामाजिक आणि अध्यात्मिक विकास होईल. आयुष्य बदलून जाईल. सकारात्मक घटना घडतील.
7 / 8
वृश्चिक राशिच्या लोकांना आईच्या माहेरून धनलाभ होण्याचे योग आहेत. गुंतवणुकीतून लाभ तसेच व्यवसायात भरघोस उत्पन्न देणारा हा काळ असेल. नोकरदारांना बढती मिळेल, पगारवाढ होईल आणि कामाचा योग्य मोबदला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मात्र या काळात वाणीवर ताबा ठेवणे महत्त्वाचे. संयमाने, धीराने हा काळ पार केलात तर भविष्य उज्ज्वल होईल. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. दानधर्म करा, पुण्य कमवा.
8 / 8
मकर राशीच्या लोकांना व्यवसायात धनलाभाच्या संधी आहेत. सरकारी सेवा, बँकिंग, लेखन या क्षेत्रातील लोकांसाठी सुगीचे दिवस सुरु होतील. खर्चात वाढ होईल, पण हा खर्च धार्मिक कार्य, शिक्षण, प्रवास याच्याशी संबंधित असू शकतो, जो तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. आर्थिक दृष्ट्या आगामी काळ लाभाचा आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची उंची वाढेल. एकूणच संघर्ष संपून आगामी काळ तुमच्या यशाचा असणार आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यekadashiएकादशी