By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:03 IST
1 / 13यंदा देवीचे वाहन हत्ती आहे आणि हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे. त्यावर स्वार होऊन येणारी देवी कृषी उद्योग आणि व्यवसायाला भरभरून आशीर्वाद देणार आहे. त्याबरोबरच उत्तम ग्रहस्थिती आणि सर्वार्थ सिद्धीसारखे शुभ योग अनेक राशींना शुभ परिणाम देणार आहेत. तुमची रास त्यापैकी एक आहे का, ते जाणून घ्या. 2 / 13मेष: अडलेल्या कामांना चालना मिळेल. धनवृद्धी होईल. कमाईचे नवे मार्ग सापडतील. स्वास्थ्य उत्तम राहील. कौटुंबिक सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. काही निर्णय घरच्यांच्या व जोडीदाराच्या साथीने घ्या. हा काळ लाभाचा आणि इच्छापूर्तीचा आहे. कसून प्रयत्न करा, यश मिळेल.3 / 13वृषभ: नोकरदारांसाठी हा चांगला काळ आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांनी व्यवहार जपून करावेत. नवीन परिचयातून लाभाच्या संधी आहेत. कुटुंबसौख्य लाभेल. अंबाबाईच्या कृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि अडलेली कामे मार्गी लागतील. 4 / 13मिथुन: नात्यांमध्ये गोडवा येईल. मतभेद, वादविवाद विसरून एकोपा निर्माण होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुने विसरून नवीन गोष्टींना खुल्या दिलाने सामोरे जा. आगामी काळ आनंदाचा असणार आहे. नोकरी व्यवसायासाठीदेखील हा काळ अनुकूल असेल. मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. 5 / 13कर्क: नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करतील. पदोन्नती तसेच कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत. तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिकांना नाव, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक वृद्धी होईल. आरोग्य सुधारेल. कोणाशीही अकारण वैर घेऊ नका. गरज वाटल्यास मौन पाळा, पण शब्दाला शब्द वाढवू नका. काही काळ संयम ठेवा, गोष्टी मनासारख्या घडू लागतील.6 / 13सिंह: आरोग्य सुधारेल. सात्विक भोजन घ्या, मन सात्विक ठेवा आणि अध्यात्मिक उपासना करा. पैशांचा योग्य ठिकाणी विनिमय करा. अंबाबाईच्या कृपेने आगामी काळात धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. सकारात्मकतेने पुढे जा, यशस्वी व्हाल. मनासारखा जोडीदार मिळेल. कुटुंबसौख्य लाभेल.7 / 13कन्या: पैशांचा अतिरिक्त वापर टाळा आणि योग्य वेळी योग्य जागी गुंतवणूक करा. कलाक्षेत्रातील लोकांना आगामी काळात सुवर्ण संधी मिळेल. लेखक, तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठीही हा काळ परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणेल. जोडीदाराची साथ लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्या. मुलांकडून आनंद वार्ता समजतील. 8 / 13तूळ: देवीची नवरात्र तुम्हाला नवा उत्साह प्रदान करेल. अडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडल्याने आर्थिक स्थिती सुधारेल. आवडत्या विषयात काम करण्याची संधी मिळाल्याने प्रसन्न वाटेल. खाण्यावर, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सल्ला देताना, घेताना डोळसपणे विचार करा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. 9 / 13वृश्चिक: व्यापारात नफा देणारा काळ आहे. उत्पन्नाचे साधन वाढेल. नोकरदारांना अनपेक्षित पगारवाढ मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. घरात पाहुण्यांचे आगतस्वागत होईल. उत्साहाचे वातावरण राहील. नवीन परिचय लाभदायी ठरतील. वाहनसौख्य लाभेल. स्वतःचे घर घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कराल. हा स्वप्नपूर्तीचा काळ ठरेल. 10 / 13धनु: वैवाहिक जीवन आनंददायी होईल. आर्थिक लाभ होतील. अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून अडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या विषयात जोडीदाराचा सल्ला घ्या. अकारण वाद टाळा. नवे नाते जोडताना कोणी आपल्याला फसवत नाही ना याची खात्री करून घ्या. 11 / 13मकर: अंबाबाईच्या कृपेने आगामी काळ इच्छापूर्तीचा आहे. वाहनखरेदी तथा नवीन जागेची खरेदी करता येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. विवाहेच्छुकांना मनासारखे स्थळ मिळेल. विवाह होईल. करिअरमध्ये नवी उंची गाठता येईल. अपेक्षांचे ओझे कमी केले तर हा काळ कुटुंबसौख्य देणारा ठरेल.12 / 13कुंभ: नोकरदार तसेच व्यावसायिकांसाठी हा काळ सुखदायी काळ आहे. आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल. सहलीचे आयोजन कराल. घरात नवीन पाहुणा येईल. नातेसंबंध सुधारतील. आरोग्यावर लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. धावपळीचा पण आनंदाचा काळ ठरेल. 13 / 13मीन: अंबाबाईच्या कृपेने व्यवसाय वृद्धी होईल, अडलेली कामे मार्गी लागतील. आनंद, उत्साह, चैतन्याची अनुभूती येईल. नव्या जोमाने कामात प्रगती कराल. भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे संकेत या नऊ दिवसांत मिळू शकतील. नात्यामध्ये सबुरी ठेवा. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील, पण दुर्लक्ष करू नका. आवडत्या विषायात मन रमवा आणि देवीची उपासना करा.