1 / 15पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता. अनेक माताभगिनींचे कुंकू (सिंदूर) त्या दिवशी पुसले गेले. भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे अवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करीत उद्ध्वस्त केले, तसेच त्यातील १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. परंतु, आता ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होणार असल्याचे संकेत ग्रहांच्या गोचरामुळे मिळत आहे.2 / 15मे महिना अनेकार्थाने महत्त्वाचा ठरणारा आहे. या महिन्यात नवग्रहातील तब्बल ६ ग्रह गोचर करणार आहे. यामुळे केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडणार आहे. यातच भारताकडून पाकिस्तानविरोधा ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवण्यात आले. यानंतर हेच ‘ऑपरेशन सिंदूर’ आता युद्धाचे कारण ठरू शकेल का? याबाबत ग्रहांच्या गोचराने काही संकेत मिळत असल्याचे म्हटले जात आहे. 3 / 15भारताच्या या कारवाईनंतर आता पाकिस्तान काहीतरी मोठे करू शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास यावेळेसही ग्रहांचे होत असलेले गोचर महाभारत युद्धाच्या वेळी घडलेल्या घटनेसारखेच असल्याचे म्हटले जात आहे.4 / 15२०२५ च्या मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर होणार आहे, त्यात बुध, सूर्य, गुरु, राहु-केतु, शुक्र या ग्रहांचा समावेश आहे. १४ मे २०२५ रोजी नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे यंदा २०२५ मध्ये गुरु अतिचार गतीने गोचर करणार आहे. २०३२ पर्यंत गुरु अतिचारी गतीने गोचर करणार आहे.5 / 15१९६५ आणि १९७१ च्या सुरुवातीला जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते, तेव्हाही गुरु अतिचारी गतीने गोचर करत होता. तर, १८ मे २०२ रोजी राहु कुंभ राशीत आणि केतु सिंह राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि राहु-केतुच्या गोचरानंतर गुरु आणि राहुचा नवमपंचम योग जुळून येणार आहे.6 / 15ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून गुरु आणि राहुचा नवमपंचम योग शुभ मानला जात नाही. १८ मे २०२५ पर्यंत शनि आणि राहुचा पिशाच योग सुरू आहे. पिशाच योग हा अशुभ योगांपैकी एक आहे. जेव्हा पिशाच योग तयार होतो तेव्हा तणाव, आर्थिक समस्या आणि सार्वजनिक जीवनावर नकारात्मक परिणाम निर्माण होत असतो. 7 / 15आताच्या घडीला शनि आणि राहु मीन राशीत विराजमान आहेत. उत्तर आणि पश्चिम भारताचा अधिपती राशी मकर आहे. पुढील काही दिवस भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर युद्धसदृश परिस्थिती कायम राहील, असे ज्योतिषीय संकेत आहेत. अशा परिस्थितीत, ७ जूनपर्यंत मंगळ कर्क राशीत आहे. त्यामुळे ७ जूनपर्यंतचा काळ अतिशय संवेदनशील आहे.8 / 15तसेच सन १९६५ आणि सन १९७१ मध्ये जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते, तेव्हाही अशाच प्रकारचे ग्रहांची स्थिती होती. आताही मे २०२५ मध्ये अशीच ग्रहस्थिती जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. 9 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, महाभारताच्या वेळीही ग्रहांचे असेच प्रतिकूल गोचर होते. शनि रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा शकट भांग योग तयार होतो, तो २०३० मध्ये तयार होत आहे. महाभारताचे महायुद्ध याच शकट भांग योगात झाले होते, त्यामुळे २०३० चा काळ खूप तणावपूर्ण असू शकतो. 10 / 15अनेक भविष्यवेत्त्यांनी देश आणि जगाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आधीच भाकिते केली आहेत. भविष्य मालिका यांनी केलेले भाकित चर्चेचा विषय ठरलेला आहे. या भविष्यवाणीत तिसऱ्या महायुद्धाच्या संदर्भात दावे करण्यात आले आहेत. 11 / 15भविष्य मलिका अंदाजानुसार, २९ मार्च २०२५ रोजी शनि ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी शनि उत्तरभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्याच्या प्रभावामुळे संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. 12 / 15भविष्य मलिकानुसार, दुसरे महायुद्ध आणि १९६५ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान अशाच प्रकारचे ग्रह योग जुळून आले होते. 13 / 15२०२५ ते २०२८ दरम्यान तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते, असा मोठा दावा करण्यात येत आहे. या युद्धात इतर देशही सामील होऊ शकतात. चीन आणि १३ इस्लामिक देश भारताला विरोध करू शकतात. या युद्धाचे रूपांतर अणुयुद्धातही होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आहे.14 / 15भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारला भक्कम पाठिंबा दिला आहे. आता यापुढे काय होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.15 / 15- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.