Mars in Aquarius 2022: मंगळाचा कुंभ प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी मंगलमय काळ, मिळतील अनेकविध लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 10:32 IST
1 / 9धार्मिक, वैज्ञानिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना अतिशय शुभ तसेच महत्त्वाचा मानला गेला आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात हिंदू नववर्षापासून झाली. तर, एप्रिल महिन्याचा शेवट हा सन २०२२ मधील पहिल्या सूर्यग्रहणाने होणार आहे. (Mars Transit in Aquarius 2022)2 / 9ज्योतिषीयदृष्ट्याही एप्रिल महिना दमदार मानला असून, एका महिन्यात सर्वच्या सर्व ग्रह आपापल्या विद्यमान राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहेत. नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह शनीचे स्वामित्व असलेल्या मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. (Mangal Gochar Kumbh Rashi 2022)3 / 9गुरुवार, ०७ एप्रिल २०२२ रोजी मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश होईल. कुंभ राशीत विराजमान असलेल्या शुक्राशी मंगळाची युती होईल, असे सांगितले जात आहे. मंगळ ग्रह पराक्रम, साहस, शौर्य, जीवन यांचा कारक मानला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुभ स्थानी मंगळ असेल, तर अशी व्यक्ती ऊर्जावान असल्याचे म्हटले जाते. 4 / 9मंगळ ग्रहाचा होणार राशीबदल हा महत्त्वाचा मानला गेला असून, १२ राशींपैकी ५ राशीच्या व्यक्तींना आगामी काळ लाभदायक आणि उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींना हा कालावधी मंगलमय असू शकेल, ते जाणून घेऊया...5 / 9मंगळाचा कुंभ प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींना अनकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. आगामी काळात महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास यांच्यात वाढ होऊ शकेल. कार्यक्षेत्रात यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. वरिष्ठांचे उत्तम सहकार्य लाभू शकेल. व्यापारी वर्गाला फायदा मिळू शकेल. विद्यार्थ्यांसाठी संकटमुक्तीचा काळ ठरू शकेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळू शकेल. 6 / 9मंगळाचा कुंभ प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. कुटुंबात शुभ कार्याचे आयोजन करू शकाल. दाम्पत्य जीवन उत्तम राहू शकेल. स्वतःला सिद्ध करण्याच्या संधी मिळू शकतील. आर्थिक आघाडी चांगली राहू शकेल. नवीन यशोशिखर गाठू शकाल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा प्राप्त होऊ शकेल. 7 / 9मंगळाचा कुंभ प्रवेश कन्या राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल. प्रवास घडू शकतील. आरोग्यात सुधारणा दिसून येऊ शकेल. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल. गुंतवणुकीचे निर्णय योग्य ठरू शकतील. जुनी येणी वसूल होऊ शकतील. मेहनतीचे चीज होईल. हितशत्रूंपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. 8 / 9मंगळाचा कुंभ प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींना लाभप्रद ठरू शकेल. सामाजिक कार्यात सक्रीय सहभागी होऊ शकाल. आपले कौतुक केले जाईल. धार्मिक कार्ये हातून घडू शकतील. दानधर्म, मदत करू शकाल. नवीन नोकरी, रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. मात्र, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतील. 9 / 9मंगळाचा कुंभ प्रवेश धनु राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. नवीन व्यवसायाच्या योजना आखू शकाल. व्यापारी वर्गाला हा कालावधी फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक स्थिती उत्तम राहू शकेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा प्राप्त होऊ शकेल. दाम्पत्य जीवन सुखकारक ठरू शकेल. शुभ कार्ये, नातेवाइकांच्या भेटी होण्याचे योग जुळून येऊ शकतात.