शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षांनी मंगळ-युरेनस योग: ‘या’ राशींना जबरदस्त लाभ, स्वप्नपूर्ती काळ; अनपेक्षित बदल शक्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 09:09 IST

1 / 15
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ वृषभ राशीत विराजमान झाला आहे. याच राशीत असलेल्या गुरुशी मंगळाचा युती योग जुळून आला आहे. गुरु आणि मंगळ या ग्रहांचा युती योग महत्त्वाचा मानला गेला आहे. तसेच १५ जुलै रोजी युरेनस म्हणजेच अरुण ग्रह आणि मंगळ जवळच्या अंतरावरून गोचर करणार आहेत. मंगळ आणि अरुण ग्रहाचा हा योग विशेष मानला गेला आहे.
2 / 15
ज्योतिषशास्त्रातील नवग्रहांमध्ये अरुण ग्रहाचा समावेश करण्यात आलेला नसला, तरी जन्मकुंडलीत अरुण ग्रहाचा समावेश करण्यात येतो. अरुण ग्रहाचे कुंडलीतील स्थान आणि त्याचा जातकावर पडणारा प्रभाव पाहिला जातो. हा सूर्यमालेमध्ये सूर्यापासून सातव्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे.
3 / 15
युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. अरुणाला २७ नैसर्गिक उपग्रह चंद्र आहेत, असे म्हटले जाते. मंगळ आणि अरुण ग्रहाचे जवळच्या अंतरावरुन गोचर करणे काही राशींना सकारात्मक, अनपेक्षित बदल, दिलासादायक ठरू शकते? तुमची रास कोणती? जाणून घ्या...
4 / 15
मेष: मंगळ आणि अरुण ग्रहाचा हा योग जीवनात आनंद आणू शकेल. अनेक समस्यांतून दिलासा मिळू शकतो. मानसिक शांतता लाभू शकेल. आयुष्यात अचानक अनेक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकेल.
5 / 15
वृषभ: मंगळ आणि अरुण ग्रहाच्या योगाने जीवनात आनंद, उत्साह आणि उत्सवाचे वातावरण राहू शकेल. नवीन बदल स्वीकारण्यास तयार रहावे. या काळात ऊर्जा आणि आत्मविश्वासाची कमतरता भासणार नाही. आयुष्यात अनेक रोमांचक वळणे येण्याची शक्यता आहे. या काळात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका, असा सल्ला दिला जात आहे.
6 / 15
मिथुन: स्वतःवर विश्वास ठेवा. या काळात आध्यात्मिक कार्यातील आवड वाढू शकेल. सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतील. वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न करावा. आळस झटकून कामाला लागावे. सकारात्मकतेने जीवनात पुढे जावे. करिअरमधील नवीन संधींचा पुरेपूर फायदा घेणे यश, प्रगतीकारक ठरू शकेल.
7 / 15
कर्क: मंगळ आणि अरुण ग्रहाच्या या योगामुळे जीवनात अनपेक्षित बदल होऊ शकतील. जीवनात नवीन अनुभव मिळतील. सामाजिक मान आणि प्रतिष्ठा वाढू शकेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात वातावरण अनुकूल ठरू शकेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. ज्याच्याशी स्वभाव आणि विचार जुळतील.
8 / 15
सिंह: मंगळ आणि अरुण ग्रहाच्या या योगामुळे सकारात्मकता वाढू शकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करावे. व्यावसायिक जीवनात मोठी कामगिरी करण्याची संधी मिळू शकेल.
9 / 15
कन्या: प्रवासाचे योग येतील. जीवनात नवीन अनुभव मिळतील. जीवनात नवीन गोष्टींचा शोध घ्याल. अध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. व्यक्तिमत्व सुधारेल. व्यवसायात लाभ होईल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे बदल होतील.
10 / 15
तूळ: अनेक सरप्राईज मिळू शकतील. जोडीदाराशी नाते घट्ट होईल. प्रेम आणि आर्थिक बाबतीत नशीब पूर्ण साथ देऊ शकेल. जीवनात अनेक अनपेक्षित बदल होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. अनेक आनंददायी घटना घडू शकतील.
11 / 15
वृश्चिक: मंगळ आणि अरुण ग्रहाच्या या योगामुळे नातेसंबंधात नवीन गोष्टींचा उलगडा होऊ शकेल. नात्यात परस्पर समंजसपणा आणि समन्वय अधिक चांगला राहू शकेल. करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक सुवर्ण संधी मिळतील. धार्मिक कार्यात लक्ष देऊ शकाल. काही वाद संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
12 / 15
धनु: जीवनात अनेक सकारात्मक बदल होतील. मंगळ आणि युरेनसच्या संयोगामुळे हितकारक गोष्टी घडू शकतील. ऑफिसमध्ये सर्वोत्तम कामगिरी करू शकाल. कामाचे अपेक्षित परिणाम मिळतील. सुख-सुविधांनी युक्त जीवन जगू शकाल.
13 / 15
मकर: मंगळ आणि अरुण ग्रहाच्या योगामुळे सर्जनशील कौशल्यात सुधारणा होऊ शकेल. ऑफिसमध्ये प्रतिभा आणि सर्जनशीलतेची प्रशंसा होऊ शकेल. उद्दिष्टांबद्दल सकारात्मकतेने वाटचाल करू शकाल.
14 / 15
कुंभ: कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. जीवनात किरकोळ गडबड होऊनही मन शांत राहील. नवीन अनपेक्षित बदलांसाठी तयार रहा. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करा.
15 / 15
मीन: आयुष्यात अचानक अनेक मोठे बदल होतील. बोलण्यात सौम्यता राहील. अनेक आश्चर्यकारक बातम्या मिळतील. भावंडांशी संबंध चांगले राहतील. जुने मित्र भेटतील. मानसिक तणावातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य