समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:36 IST
1 / 15Margashirsha Kalashtami December 2025: २०२५ चा डिसेंबर महिना सुरू आहे. सन २०२५ या वर्षाची सांगता अवघ्या काही दिवसांनी होणार आहे. मराठी वर्षातील अतिशय शुभ आणि पवित्र मानला गेलेला मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष गुरूवार हा लक्ष्मी देवीचे पूजन, नामस्मरणासाठी अतिशय उत्तम मानला जातो. त्यातच ११ डिसेंबर २०२५ या गुरूवारी कालाष्टमीचा योग जुळून आलेला आहे. 2 / 15दर महिन्यात येणारी कालाष्टमी तिथी ही महादेवाचा अवतार कालभैरव याला समर्पित असते. या मार्गशीर्ष गुरूवारी आलेल्या कालाष्टमी तिथीला गुरु आणि चंद्र यांचा वसुमान योग तर मंगळ आणि गुरू यांचा समसप्तक योग जुळून आलेला आहे. 3 / 15मार्गशीर्ष गुरूवार आणि कालाष्टमीला जुळून आलेले शुभ योग अनेक राशींसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे सांगितले जाते. अनेक राशींवर धनलक्ष्मीची अपार कृपा राहू शकेल. अनेकविध लाभ होऊ शकतील. विविध आघाड्यांवर यश, प्रगती साध्य करता येऊ शकेल. असे असले तरी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: नवीन संधी मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. कुणाला उसने पैसे देऊ नका. भावंडांशी मधुर संबंध राहतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमचा विचार केला जाईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. सामाजिक कार्यात थोडे जबाबदारीने व संयमाने वागण्याची गरज आहे. शुक्रवार आणि शनिवारी आरोग्याची काळजी घ्यावी. फार दगदग करू नका.5 / 15वृषभ: चंद्राचे भ्रमण यश देणारे ठरू शकेल. वडिलोपार्जित संपत्ती, व्यवसायातील व्यवहार यातून फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींकडून मदत मिळेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. शुक्रवारी, शनिवारी चांगले अनुभव येतील. भेटवस्तू मिळतील.6 / 15मिथुन: आर्थिक लाभ होतील. अतिशय उत्साही वातावरणात राहू शकेल. अचानक काही फायदे होतील. अडचणीतून मार्ग निघेल. प्रलंबित कामे आटोक्यात येतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. अनेक बाबतीतील गैरसमज दूर होतील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. मालमत्तेची कामे होतील. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जवळच्या प्रवासात सतर्क राहा. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. थोडे सावध राहा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल.7 / 15कर्क: अडचणी दूर होतील. अनुकूल वातावरण राहील. प्रत्यक्ष कामाऐवजी कामाच्या नियोजनावर भर द्यावा. प्रवासात गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च होईल. अडचणी दूर होतील. मनात आत्मविश्वास राहील. सल्ला लोकांना पटेल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. किरकोळ कारणावरून वाद वाढवू नका. व्यावसायिक उलाढालीतून फायदा होईल.8 / 15सिंह: हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. बचतीचे नियोजन नीट केले पाहिजे. धार्मिक कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची गरज आहे. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. काळजी दूर होईल. 9 / 15कन्या: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. नोकरी, घरातील कार्ये, धनलाभ, जनसंपर्क दृष्टीने चांगला काळ अनुभवायला मिळेल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील. घरात मंगलमय वातावरण राहील. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. पण, संयमाने वागण्याची गरज आहे; अन्यथा आर्थिक व्यवहारात नुकसान होईल. प्रवासात सतर्क राहा.10 / 15तूळ: आर्थिक लाभ होतील. मनात उत्साह राहील. नशिबाचा कौल बाजूने राहील. कलाकार मंडळींना पुरस्कार जाहीर होतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. कामातील बदल फायदेशीर ठरतील, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र व्यवहारात सतर्कता बाळगली पाहिजे. शुक्रवार, शनिवार लोकांना आश्वासने देऊ नका. कायद्याची बंधने पाळा. प्रवासात सतर्क राहा.11 / 15वृश्चिक: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. सगळ्या अडचणी दूर होऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल. एखादी चांगली बातमी कळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत जबाबदारी अंगावर पडेल. कामाचा ताण राहील. शुक्रवार, शनिवार अनुकूल परिस्थिती राहील.12 / 15धनु: संमिश्र ग्रहमान राहील. मनात उत्साह राहील. मोठ्या योजनांचे विचार मनात घोळत राहतील. लोकांकडून म्हणावी तशी दखल घेतली जाणार नाही. कामे पूर्ण झालीच पाहिजेत, असा अट्टहास करू नका. त्यातून दगदग होऊ शकते. प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाच्या वस्तू व कागदपत्रे सांभाळा. नोकरीत सहकारी वर्गाशी गोडीत वागा. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल.13 / 15मकर: भेटवस्तू मिळतील. दगदग झाली तरी यश देणारा काळ ठरू शकेल. सबुरीचे धोरण ठेवा. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. कामाचा उत्साह वाढेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. महत्त्वाच्या कामात अडथळा येईल. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शुक्रवारपासून नशिबाची साथ मिळेल. नोकरीत महत्त्व वाढेल. पगारवाढ व सोयी-सुविधा मिळतील.14 / 15कुंभ: मोठ्या योजना हाती घेण्यात रस राहील. मात्र अवास्तव अपेक्षा ठेवू नका. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. काही लोक गोड बोलून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. थोडे सावध राहा. तब्येतीला जपा. नोकरीत पारडे जड राहील. मात्र, स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. शुक्रवार, शनिवार दगदग करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. घाईघाईत कामे करू नका. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.15 / 15मीन: मुलांची प्रगती होईल. अनुकूल फळे देणारा काळ ठरेल. कामातील बदल फायदेशीर ठरतील. पगारवाढ व इतर अनेक लाभ होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. घराची शोभा वाढवणाऱ्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जवळचा प्रवास होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शुक्रवार, शनिवार अडचणी दूर होतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.