शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Makarsankranti 2021: मकर संक्रांतीला होतील 'छोट्या' दानाचे 'मोठे' फायदे!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 13, 2021 5:28 PM

1 / 6
घृत म्हणजे तूप. देवघरातील बाळकृष्णाला तुपाने स्नान घालावे. नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्याची पूजा करावी. तसेच गुरुजींना यथाशक्ती तुपाचे दान करावे. आपल्या पापांचा नाश होऊन सूर्यलोक मिळावा म्हणून हे दान करतात.
2 / 6
उत्तम वंशासाठी हे दान करतात. यानुसार नारळाच्या बारा जोड्या, बारा ब्राह्मणांना दान कराव्यात.
3 / 6
गुरुजींना न सांगता म्हणजे वाणीने न उच्चारता, एखादे फळ विशेषत: नारळ, पाण्याने भरलेल्या भांड्यात टाकून नंतर गुरुजींना दान करावा. दानकर्माचा असा अनोखा विधी उत्तम अपत्यप्राप्तीसाठी करतात.
4 / 6
कुठल्याही धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ व दुसऱ्या भांड्यात पायस (तांदुळाची खीर) भरून ते पात्र गुरुजींना दान करावे. हे दान केल्याने मनःशांती मिळते.
5 / 6
म्हणजे हळदी कुंकवाचे दान. डोळे मिटून कुंकवाचा वास घेतला, तर हळदीचा आला पाहिजे आणि ओलं कुंकू लावून हात धुतल्यावर लाल रंग पूर्णपणे निघून गेला पाहिजे ही खऱ्या कुंकवाची ओळख आहे. ह्या हळदी कुंकवाला काही वाण किंवा वायनदान द्यायची पद्धत आहे. आणि हे वाण `लुटायचे' असे म्हणतात. म्हणजे तिथे कंजूषपणा नको. मुक्तपणे वाण लुटण्याचा आनंद आपण घ्यायचा आणि इतरांनाही द्यायचा. हे वाण देताना खालील मंत्र म्हणायला विसरू नका. गौर्या विनिर्मितं पूर्व सर्वमंगलकारणम् | स्त्रीणां सौभाग्यसुखदम् हरिद्रादि समर्पये।।
6 / 6
१) दान ज्याला द्यायचे आहे ती व्यक्ती सत्पात्र असावी. याशिवाय मदत म्हणून गोरगरिबांना यथाशक्ती मदत करावी. २) दानात दिलेले वाण उत्तम गुणवत्तेचे असावे. ३) एकदा दान दिले, की `इदं न मम' म्हणजे त्यावरचा हक्क व अधिकार सोडला असे अभिप्रेत आहे. त्यामुळे एकदा दिलेल्या दनाविषयी कोणतीही आसक्ती असू नये.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती