शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:07 IST

1 / 12
January 2026 Lucky Rashi Astrology: जानेवारी २०२६ मध्ये अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहे. शनिच्या मकर राशीत शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्य यांचा युती योग जुळून येणार आहे. तसेच बुधादित्य, शुक्रादित्य, मंगल आदित्य आणि लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहेत. तसेच समसप्तक योग, विपरीत राजयोगही जुळून येणार आहेत.
2 / 12
बुध आणि शुक्र ग्रहांच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होईल, ज्यामुळे संपत्ती, समृद्धी, वैवाहिक संधी आणि सुख-सोयींमध्ये वाढ होईल. शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होईल. मंगळ आणि सूर्याच्या युतीमुळे मंगल आदित्य योग निर्माण होईल, ज्यामुळे काही राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते.
3 / 12
तसेच गुरू आणि चंद्र यांच्या युतीने गजकेसरी योग जुळून येत आहे. २०२६ या नववर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिना अद्भूत योगांनी भरलेला असल्यामुळे याचा काही राशींना चांगला लाभ होऊ शकतो. काही राशी लकी ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव पाहायला मिळू शकतो, नोकरी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आर्थिक आघाडीवर नववर्षाचा पहिला जानेवारी महिना कसा असेल? जाणून घेऊया...
4 / 12
मेष: अनपेक्षित आर्थिक लाभासोबत परदेश प्रवासाची संधी देखील मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर चांगली बातमी मिळू शकते. भावंडांशी चांगले संबंध निर्माण होतील. मुलांच्या शिक्षणात आणि अभ्यासात काही समस्या उद्भवू शकतात. कालांतराने परिस्थिती सुधारेल. कामाच्या ठिकाणी अचानक आर्थिक लाभ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. शत्रूंना पराभूत करण्यात यशस्वी व्हाल. दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. अनेक क्षेत्रात यश मिळेल. प्रशासकीय किंवा सरकारी क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे.
5 / 12
वृषभ: हा कालावधी अनेक प्रकारे विशेष आणि फलदायी ठरू शकेल. धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्ता वाढेल. मुलाच्या तांत्रिक शिक्षण, करिअर आणि भविष्याशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. वडील, गुरु यांचे अनमोल मार्गदर्शन मिळू शकेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित योग सक्रिय होतात. वडिलोपार्जित मालमत्तेत जुने वाद मिटणे आणि लाभ होण्याचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती, पगारवाढ शक्य होऊ शकेल. प्रशासकीय किंवा राजकीय क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता निर्माण करते. स्पर्धा परीक्षा आणि सरकारी क्षेत्रात सहभागी असलेल्यांना विशेष लाभ मिळू शकतात. मानसिक शांतता लाभू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो.
6 / 12
मिथुन: नववर्षाची सुरुवात आनंद आणि समृद्धी देणारी ठरू शकेल. कामाच्या ठिकाणची नियोजित सर्व कामे सहजपणे पूर्ण कराल. खर्चात वाढ होऊ शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास आर्थिक परिस्थिती चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल. कामाचा तणाव जाणवू शकतो. परंतु, सहकाऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामे पूर्ण होण्यास मदत मिळू शकेल.
7 / 12
कर्क: नववर्षाचा सुरुवातीचा काळ यशाने भरलेला असेल. सोपवलेल्या कोणत्याही कामात सहज यशस्वी व्हाल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. आरोग्य लक्षणीयरीत्या सुधारेल. कोणताही प्रवास निश्चितच यशस्वी होईल. वडिलांच्या सल्ल्याचा खूप फायदा होऊ शकतो.
8 / 12
सिंह: नववर्षाची सुरुवात अनुकूल, सकारात्मक ठरू शकतो. कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल. त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. सर्व निर्णय पूर्ण संयम आणि शांततेने घ्याल. लगेच निकाल दिसतील. खर्च वाढू शकतात. तसेच अनपेक्षित नफा होण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारेल. कठीण काळातून बाहेर पडू शकाल.
9 / 12
कन्या: हा काळ खूप खास असू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. आर्थिक लाभ आणि राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवास किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. व्यवसाय, लॉटरी आणि शेअर बाजारातून नफा मिळू शकतो. नोकरीत पदोन्नती आणि वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. मानसिक शांतता लाभू शकेल. नवीन प्रयत्नांमध्ये यश मिळू शकते. जोडीदारासोबतच्या नातेसंबंधातून फायदा होऊ शकतो.
10 / 12
धनु: लॉटरी, शेअर बाजार, व्यापार यांमध्ये अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता असते. नशिबाची साथ लाभू शकेल. वडिलोपार्जित मालमत्ता, भावंडांशी संबंधित बाबी आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी हा काळ अनुकूल मानला जात आहे. परंतु, आर्थिक स्थिती आणि खर्चाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे केल्यास बचतीच्या योजना यशस्वी होऊ शकतील. एकंदरीत, हा काळ प्रगती आणि संधींनी भरलेला आहे.
11 / 12
मकर: वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याच्या मजबूत शक्यता निर्माण होत आहेत. भाग्याची भक्कम साथ लाभू शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. गूढ विद्येत रस निर्माण होऊ शकतो. परदेशाशी संबंधित गोष्टींमध्ये खर्च होऊ शकतो. भावंड आणि जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे, म्हणून संयम राखणे आवश्यक आहे. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. नोकरीत लाभाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकNew Yearनववर्ष 2026