शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 09:01 IST

1 / 15
चातुर्मास सुरू आहे. गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी चातुर्मासातील पहिली आषाढ अमावास्या आहे. आषाढ अमावास्या दीप अमावास्या म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. शुक्रवार, २५ जुलै २०२५ पासून श्रावण सुरू होत आहे.
2 / 15
चातुर्मासातील पहिली दीप अमावास्या, श्रावण महिन्याची सुरुवात याच वेळी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. शिवाय गुरुवारही आहे. त्यामुळे या दिवसांचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे. गुरुपुष्यामृत योग विशेष शुभ मानला जातो.
3 / 15
गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. गुरुवार हा दिवस स्वामी, दत्तगुरू यांच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...
4 / 15
मेष: धनलाभ, मौजमजा, खाणे-पिणे, खरेदी, प्रलंबित कामे पूर्ण करणे, जवळच्या लोकांच्या भेटीगाठी, जवळचा प्रवास, व्यवसाय इत्यादी अनेक बाबतीत अनुकूल फळे मिळतील. फावला वेळ मिळेल. स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. आवश्यक त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न कराल. भावंडांशी मधुर संबंध राहतील. काहींना सहलीला जाण्याची संधी मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
5 / 15
वृषभ: ग्रहमान अनुकूल असले तरी बेफिकीरपणाने वागू नका. एखाद्या व्यवहारात कुणी हातोहात फसवू शकते. सावधपणे वागण्याची गरज आहे. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. व्यवसायात तुमचा अंदाज चुकू शकतो. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी.
6 / 15
मिथुन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. नवीन लोकांच्या संपर्कात याल. प्रत्येकावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कालांतराने उत्तम लाभ होतील. नवीन कल्पना विकसित होतील. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. व्यवहार जपून करा. नोकरीतील राजकारणात पडू नका.
7 / 15
कर्क: अचानक मोठी संधी मिळेल. त्यात फायदा होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू मिळतील. मित्र-मैत्रिणींच्या सहवासात मजेत वेळ जाईल. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. मनात आध्यात्मिक विचार राहतील. काहींना तीर्थयात्रा करण्याचा योग येईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
8 / 15
सिंह: योजना सफल होतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात महत्त्वाच्या घडामोडी घडतील. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. घरी पाहुणे मंडळी येतील. कामाचा ताण आणि घरातील कामे यांचा समतोल सांभाळाल. धनलक्ष्मीची कृपा राहील. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात भरभराट होईल. जनसंपर्क चांगला राहील. लोकांशी सकारात्मक संवाद राहील. थोडे सावध राहण्याची गरज आहे.
9 / 15
कन्या: प्रगती होईल. नशिबाचा कौल बाजूने राहील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. समाजात तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. पुरस्कार जाहीर होईल. नोकरीत महत्त्व वाढेल. तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल. पगारवाढ मिळेल. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. अनपेक्षित लाभ होतील.
10 / 15
तूळ: मान-सन्मान मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. मात्र, बेफिकीरपणे वागू नका. वेळेचे नियोजन नीट करा. वाहन जपून चालवा. अनुकूलता अधिक वाढेल. एखादी चांगली बातमी कळेल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. सामाजिक प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळतील. कौतुक होईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यामुळे वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल.
11 / 15
वृश्चिक: मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. मात्र, किरकोळ कारणावरून गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. व्यवसायात भरभराट होईल. थोडे सावधपणे वागण्याची गरज आहे. वाहन हळू चालवा. चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासात राहा. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. आश्वासने देऊन शब्दात अडकू नका.
12 / 15
धनु: साधक-बाधक अनुभव येतील. काही अडचणी येतील. थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. जीवनसाथीशी वाद टाळा. योजना गुप्त ठेवा. अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात अनुकूल परिस्थितीचा अनुभव येईल. वाहन जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा.
13 / 15
मकर: चांगली बातमी कळेल. मन आनंदून जाईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. प्रवासाचा योग येईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. आहाराचे पथ्य पाळा. व्यवसायात मोठ्या उलाढाली होतील. जपून व्यवहार केल्यास फायदा होईल. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
14 / 15
कुंभ: पगारवाढ मिळेल. अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत नवीन संधी चालून येईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. करारातील अटी नीट वाचून घ्याव्या. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील. विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल.
15 / 15
मीन: नवीन संधी मिळेल. ग्रहमानाची चांगली साथ मिळेल. व्यवसायात सतत व्यस्तता राहील. हाती पैसा खेळता राहील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. भावंडांशी गैरसमज होऊ शकतात. नोकरीत नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने चांगले दिवस ठरतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. नातेवाईक घरी येतील. मुलांना योग्य मार्गदर्शन करा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासShravan Specialश्रावण स्पेशलspiritualअध्यात्मिकLaxmi Pujanलक्ष्मीपूजन