गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 10:41 IST
1 / 12Gaj Kesari Gurupushyamrut Yoga July 2025: चातुर्मास सुरू आहे. गुरुवार, २४ जुलै २०२५ रोजी चातुर्मासातील पहिली आषाढ दीप अमावास्या आहे. शुक्रवार, २५ जुलै २०२५ पासून श्रावण सुरू होत आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. विशेष म्हणजे एकाच दिवशी गजकेसरी आणि गुरुपुष्यामृतयोग जुळून आलेले आहेत.2 / 12गुरुपुष्यामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजून ४३ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृतयोग आहे. मिथुन राशीतील गुरु आणि चंद्र ग्रहाच्या युतीने गजकेसरी राजयोग जुळून आला आहे. 3 / 12गजकेसरी आणि गुरुपुष्यामृत एकाच दिवशी येणे हा दुग्धशर्करा योग असून, हे दोन्ही योग अतिशय शुभ, पुण्य फलदायी, लाभदायी असेच आहेत. गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आल्याचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल. धन-वैभव, पद-पैसा-प्रतिष्ठा मिळून धनलक्ष्मीची कृपा राहू शकेल? जाणून घेऊया...4 / 12मेष: शुभ आणि लाभदायक काळ ठरू शकेल. अधिक फायदे मिळू शकतात. आनंद होईल. मन प्रसन्न राहू शकेल. व्यवसायाच्या बाबतीत काळ अनुकूल राहणार आहे. वाहनाचे सुख मिळू शकते. रिअल इस्टेट, वाहतूक इत्यादी कामात अतिरिक्त फायदे मिळू शकतात. निश्चय दृढ होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल.5 / 12मिथुन: विशेषतः फायदा लाभू शकेल. आत्मविश्वास वाढेल. कामे पूर्ण होतील. अडकलेल्या योजनांना गती मिळेल. सुख-सोयींवर खर्च कराल. मान-सन्मान आणि आदर वाढेल. राजकारण आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला राहू शकेल. पद आणि प्रतिष्ठेचा लाभ मिळू शकेल. व्यक्तिमत्त्व सुधारेल. यश पाहून तुमचे प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदारासोबत वाद संपून नात्यात गोडवा निर्माण होऊ शकेल.6 / 12कर्क: अपेक्षेपेक्षा अधिक लाभ प्राप्त होऊ शकेल. व्यक्तिमत्त्वात एक वेगळीच चमक दिसून येईल. आत्मविश्वास वाटेल. अडकलेली कामे जलद होतील. आदर वाढेल. योग्य निर्णय घेऊ शकाल. सोयी-सुविधा वाढतील. धैर्य आणि लवचिकता दोन्ही दिसून येईल. कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल. जोडीदाराशी तुमचे नाते मजबूत होईल. प्रत्येक पावलावर जोडीदाराचा पाठिंबा मिळेल.7 / 12कन्या: धनलक्ष्मीची कृपा राहू शकेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. पैसे वाचवू शकाल. संसाधने वाढवण्याची योजना आखू शकता. नवीन नोकरी शोधात असतील तर चांगली बातमी मिळू शकते. जवळच्या मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. काही फायदेशीर योजनेबद्दल माहिती मिळू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहू शकेल.8 / 12तूळ: विशेष लाभ प्राप्त होऊ शकतील. हाती घेतलेले काम, योजना पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळू शकेल. सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. काम अडकले असेल तर त्यात प्रगती दिसू शकते. कंत्राटी काम करणाऱ्यांना एखादी नवीन निविदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराशी नात्यात गोडवा राहू शकेल.9 / 12वृश्चिक: भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. चौफेर लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील योजना यशस्वी होऊ शकतात. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी ओळख होऊ शकते. नफा कमावण्याची संधी मिळू शकते. अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहणार आहे. आशेचा किरण दिसू शकतो. प्रयत्नांना पाठबळ मिळू शकते. धार्मिक कार्यात रस असेल. जोडीदाराशी मजबूत संबंध टिकवून ठेवता येतील.10 / 12कुंभ: व्यवसायात अपेक्षित निकाल मिळू शकतात. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळू शकते. चित्रपट, कला, गायन, नृत्य, डिझायनिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगळी ओळख मिळू शकते. कोणाच्याही प्रभावाशिवाय निर्णय घेऊ शकाल. जो निर्णय घ्याल, त्यात फायदाही होण्याची शक्यता वाढू शकेल. कुटुंबात आनंद आणि शांतता राहू शकेल. जोडीदाराशी संबंध गोड असतील.11 / 12गुरुपुष्यामृतयोग वारंवार येत नाही. अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी 'गुरुपुष्यामृत' योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे.12 / 12- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.