शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून शनिदेवाची कृपा होणार आणि 'या' सहा राशींचे भाग्य बदलणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 16:12 IST

1 / 7
अलीकडेच म्हणजे शनिवारी २२ जानेवारीला शनिअस्त झाला आणि २४ फेब्रुवारी रोजी शनीउदय आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह उगवतो किंवा मावळतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. अशा स्थितीत शनिदेवाच्या उदयाचा सर्व राशींवरही परिणाम होईल, परंतु काही राशींसाठी शनिदेवाचा उदय शुभ राहील. चला जाणून घेऊया त्या राशींबद्दल.
2 / 7
कर्म घरामध्ये शनीचा उदय होणार आहे. मंगळ देव भाग्य स्थानावर विराजमान आहे. अशा स्थितीत शनि-मंगळाच्या संयोगाने आनंद मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल. पगारदार लोकांना प्रमोशनचा लाभ मिळू शकतो. व्यवसायिकांसाठी सुगीचा काळ आहे.
3 / 7
शनीचा उदय या राशीसाठी अपार आनंद देणारा ठरेल. शनि उदयाच्या काळात व्यवसायात प्रचंड नफा होईल. ज्या कामाला सुरुवात कराल त्या कामात यश मिळेल. पैसा आणि लाभाचे अनेक स्त्रोत असतील.
4 / 7
सप्तम भावात शनिचा उदय होणार आहे. सातवे घर वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. तसेच भागीदारीच्या कामातही भरपूर यश मिळेल.
5 / 7
चौथ्या भावात शनिचा उदय होईल. चतुर्थ घर हे वाहन सुख, माता आणि घराचे मानले जाते. अशा परिस्थितीत या काळात आर्थिक स्थितीत कमालीची सुधारणा होईल. मातृपक्षाकडून धनलाभ होईल. नोकरीतील कामगिरी चांगली राहील. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल.
6 / 7
शनीच्या उदयाने मकर राशीत त्रिकोणी राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे व्यवसायात आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. नोकरीत बढतीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
7 / 7
कुंभ राशीच्या लोकांवर शनी उदयाचा जबरदस्त प्रभाव राहील. वास्तविक, या राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत शनीच्या उदयामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष