२०२५च्या पहिल्या एकादशी, प्रदोषला २ राजयोग: ९ राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न; लाभच लाभ, शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 08:50 IST
1 / 15२०२५ वर्ष सुरू झाले आहे. नववर्षातील पहिली एकादशी आणि प्रदोष व्रत आहे. पौष महिन्याच्या शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशी १० जानेवारी २०२५ रोजी आहे. तर, ११ जानेवारी २०२५ रोजी पहिले प्रदोष व्रत आहे. या दोन्ही व्रतांवेळी गजकेसरी योग आणि धन योग जुळून येत असल्याचे सांगितले जाते आहे.2 / 15सन २०२५ ची पहिले एकादशी आणि प्रदोष व्रत तसेच चंद्र, गुरु आणि मंगळ यांचा गजकेसरी आणि धनयोग राशींसह अनेक मूलांकांसाठी सर्वोत्तम वरदान काळाप्रमाणे ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.3 / 15कोणत्या राशींना हा कालावधी चांगला जाऊ शकतो. कुटुंब, शिक्षण, आर्थिक आघाडी, करिअर, नोकरी, व्यवसाय, व्यापार या आघाड्यांवर कसा प्रभाव पडू शकतो? जाणून घेऊया...4 / 15मेष: शुभ फळे मिळतील. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सुरुवातीला काही अडचणी असतील. एखाद्या कामात थोडी दमछाक होईल. थोडे सबुरीने वागण्याची गरज आहे. धनलक्ष्मी प्रसन्न राहील.5 / 15वृषभ: व्यवसायात दमदार वाटचाल सुरू राहील. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. समाजात वावरताना कुणी एखादा प्रस्ताव ठेवू शकतो. एकदम हुरळून न जाता शांतचित्ताने व तटस्थपणे विचार करून लोकांच्या प्रस्तावावर निर्णय घ्यावा. जीवनसाथीचा सल्ला उपयुक्त ठरेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. देवाणघेवाण करताना खबरदारी घ्यावी. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्यावे. इतरांच्या भानगडीत पडू नका. सकारात्मक अनुभव येतील.6 / 15मिथुन: सतत कशात ना कशात व्यस्त राहाल. कार्यक्षेत्रात इतरांवर छाप पडावी, यासाठी मोठी जबाबदारी घ्याल. त्यामुळे दमछाक होऊ शकते. त्यामुळे झेपतील तेवढीच कामे अंगावर घ्यावी. एखाद्या व्यवहारात फायदा होईल. मात्र, आर्थिक व्यवहार जपून करा. अवास्तव आत्मविश्वास नको. धार्मिक कार्यासाठी प्रवास घडून येईल.7 / 15कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मात्र लोक कामात चुका काढण्याचा प्रयत्न करतील. लोकांकडे किती लक्ष द्यायचे याचा विचार करा. नोकरीत अचानक काही बदल होऊ शकतात. सकारात्मक पद्धतीने विचार केला तर उल्लेखनीय कामगिरी होईल. शेजारच्या लोकांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गुरु-चंद्र युतीमुळे चांगले अनुभव येतील.8 / 15सिंह: थोडी दगदग होईल. सावधपणे वागण्याची गरज आहे. नेहमीची कामे वेळच्या वेळी करत राहा. इतरांच्या भानगडीत पडू नका. 'सोशल मीडिया'वर सावधपणे प्रतिक्रिया द्यावी किंवा प्रतिक्रिया देणेच टाळा. कार्यक्षेत्रात प्रगतीला पूरक वातावरण राहील. नवीन संधी मिळेल. काहींना अचानक पुरस्कार जाहीर होतील.9 / 15कन्या: सावधपणे वागण्याची गरज आहे. व्यवसायात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. त्या दृष्टीने काळजी घ्या. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. कार्यक्षेत्र गाजवाल. पण वादात पडू नका. अनेक अडचणी दूर होतील. अचानक मोठी संधी मिळेल. मौजमजा कराल.10 / 15तूळ: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. तसेच विरोधकांच्या कारवाया वाढतील. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करेल. अचानक धनलाभ होऊ शकतो.11 / 15वृश्चिक: सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरातील जबाबदाऱ्या व कामधंद्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुलांची काळजी घ्यावी. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. त्यांच्याशी संवाद ठेवा. परीक्षा देणाऱ्यांनी वेळ वाया घालविणाऱ्या रिकामटेकड्या मित्रांपासून दूर राहावे. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा. आरोग्याची काळजी घ्यावी. अचाट साहस करणे टाळा. विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे.12 / 15धनु: नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. नवीन शिकण्यासाठी वेळ द्यावा. शांत चित्ताने कामे करत राहा. काही कारणाने गैरसमज होऊ शकतात. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना चांगला काळ आहे. बुद्धिमत्तेची छाप पडेल. अचानक प्रवास करावा लागेल. मोहापासून दूर राहा. हलका-फुलका व सकस आहार घ्यावा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जीवनसाथीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न कराल तर वाद होतील.13 / 15मकर: अनुकूलता बाजूने राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. प्रवासात सतर्क राहा. व्यवसायात बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. सावधपणे गुंतवणूक करा. भावंडांशी गैरसमज होतील.14 / 15कुंभ: अनुकूल परिस्थिती राहील. मात्र आर्थिक उलाढाल करताना थोडे सतर्क राहण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारात नीट माहिती घ्या. कागदपत्रे वाचून घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. काहींना अचानक प्रवास करावा लागेल. प्रवासाचे नियोजन नीट करा. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. अडलेली कामे गती घेतील. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत अनुकूल बदल होतील.15 / 15मीन: महत्त्वाची कामे होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मात्र, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. प्रयत्नपूर्वक चांगले विचार करा. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. वादविवादापासून स्वतःला मुत्सद्दीपणाने दूर ठेवा. अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.