शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:43 IST

1 / 13
Chandra Grahan September 2025 Astrology: यंदाच्या चातुर्मासातील भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. खग्रास चंद्रग्रहण म्हणजे असे चंद्रग्रहण ज्यामध्ये पृथ्वीच्या पूर्ण सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो आणि चंद्र काही काळासाठी गडद रंगाचा किंवा लालसर दिसतो. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि चंद्र पृथ्वीच्या गडद सावलीतून जातो, तेव्हा खग्रास चंद्रग्रहण होते.
2 / 13
२०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत, असे सांगितले जात आहे. रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून, मध्यरात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे.
3 / 13
शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून मृत्यू पंचक सुरू झाले आहे. या चंद्रग्रहणाला ५०० वर्षांनी काही अद्भूत शुभ योग जुळून आले आहेत. बुधादित्य राजयोग, दोन समसप्तक योग असेही काही योग जुळून आलेले आहेत. मृत्यू पंचकात लागणारे २०२५ मधील चंद्रग्रहण काही राशींना शुभ, तर काही राशींना अशुभ ठरू शकते, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...
4 / 13
मेष: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहण खूप चांगले राहणार आहे. आर्थिक बाबतीत फायदा होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता असेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. यश, प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल. चंद्रग्रहण संपल्यानंतर दान केले तर यातून खूप शुभ परिणाम मिळू शकतात. भाग्याची साथ लाभू शकेल. व्यवसाय आणि नोकरीत नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनात सर्व बाजूंनी आनंद येईल.
5 / 13
वृषभ: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहण सकारात्मक ठरू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कला, लेखन, संगीत किंवा सादरीकरण यासारख्या सर्जनशील क्षेत्रात प्रतिभा चमकेल आणि यश मिळेल. या काळात प्रवास फायदेशीर ठरतील, विशेषतः जर परदेशाशी संबंधित काम करत असाल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते किंवा नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते.
6 / 13
मिथुन: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. मुलांशी संबंधित चिंता त्रस्त करू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध चांगले राहणार नाहीत. कामाचा खूप ताण असेल. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अधिकारी काम करण्याच्या पद्धतीवर खूश दिसणार नाहीत. परंतु, नोकरीत प्रमोशन मिळू शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. धनलाभ होऊ शकतो.
7 / 13
सिंह: कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. जोडीदाराशी संबंध चांगले राहणार नाहीत. वैवाहिक जीवनात समस्या येतील. जोडीदार पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. भांडणे होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद राखण्यात खूप अडचणी येतील. भावंडांसोबतच्या नातेसंबंधातही अंतर येऊ शकते. खूप संयमाने काम करावे लागेल.
8 / 13
कन्या: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहणाने शुभ लाभ होतील. आर्थिक लाभ होतील. कर्ज फेडण्यात यश मिळू शकेल. काही कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही यश मिळेल. गुंतवणुकीद्वारे लाभ मिळेल. शत्रू पराभूत होतील. स्वतःला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यात यशस्वी व्हाल.
9 / 13
तूळ: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. खर्च खूप वाढू शकतील. कामात खूप विलंब होऊ शकतो. एकाच वेळी एक नाही तर अनेक कामे हातात घेऊन बसल्याने गोंधळ उडू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना सल्ला दिला जातो की, इतरांवर विश्वास ठेवू नका. जवळचे नुकसान करण्याचा कट रचू शकतात. योजना गुप्त ठेवा. कालांतराने परिस्थिती सुरळीत होऊ शकेल. कामे मार्गी लागतील. पैसे बचतीचा मार्ग सापडू शकेल.
10 / 13
वृश्चिक: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहणाने शुभ लाभ प्राप्त होऊ शकतील. बऱ्याच काळापासून काम बिघडत असेल किंवा वारंवार अडथळ्यांचा सामना करावा लागत असेल, तर आता या सर्वांपासून मुक्त होऊ शकता. यशाच्या मार्गावर पुढे जाल. व्यवसाय क्षेत्रातही नफा मिळविण्याच्या सुवर्ण संधी मिळतील, गुंतवणुकीतून नफा मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जीवनात सुख-समृद्धी येईल.
11 / 13
धनु: मृत्यू पंचकातील चंद्रग्रहण खूप शुभ राहणार आहे. आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा मिळवण्याची संधी मिळेल. प्रगती होईल. करिअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सर्व सदस्यांच्या पाठिंब्यामुळे काम सोपे होईल.
12 / 13
कुंभ: याच राशीत विराजमान असलेल्या राहु आणि चंद्र ग्रहामुळे खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवतील, विरोधात कट रचतील. कारकिर्दीत खूप उलथापालथ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा त्रासदायक ठरेल. या काळात बोलण्यावर थोडे नियंत्रण ठेवण्याचा आणि सभोवतालच्या गोष्टींकडे थोडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
13 / 13
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक